तलाठी भरती २०२३ करीता जाहीरात झाली प्रसिद्ध तब्बल ४६४४ पदांची भरती केली ह्या दिवसापासून होणार भरतीसाठी फाॅम भरायला सुरुवात talathi bharti 2023 maharashtra in Marathi
अनेक दिवसांपासून तलाठी भरती २०२३ ची जाहीरात प्रसिद्ध होण्याची अनेक उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते.
तलाठी भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात कधीपासून होईल ह्या प्रतिक्षेत सर्व उमेदवार होते.
पण आता आपली ही प्रतिक्षा संपुष्टात आली आहे कारण तलाठी भरती २०२३ करीता जाहीरात प्रसिद्ध झाली आहे.हया भरती दरम्यान तब्बल ४६४४ पदांसाठी भरती केली जाणार आहे.असे ह्या जाहिराती मध्ये सांगितले गेले आहे.
सदर जाहीरात सविस्तर पणे वाचण्यासाठी आपण mahabhumi.gov.in वर जायचे आहे.हया लिंकवर ही जाहीरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जाहीरातीत असे म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागांतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता
जमाबंदी आयुक्त अणि भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्यातील एकुण ३६ जिल्ह्यांच्या केंद्रावर आॅनलाईन पदधतीने संगणक आधारीत परीक्षा(computer based test) घेण्यात येणार आहे.
संवर्ग -तलाठी
विभाग -महसूल व वन विभाग
वेतन श्रेणी -s८२५५००-८११०० अधिक महागाई भत्ता अणि नियमानुसार इतर देय भत्ते
एकुण पदे -४६४४
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल?
तलाठी भरतीसाठी अर्ज सादर करायला २६ जुन २०२३ पासुन सुरूवात केली जाणार आहे.हा अर्ज आपणास आॅनलाईन पदधतीने सादर करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख –
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ असणार आहे म्हणजे हा अर्ज उमेदवारांना १७ जुलै पर्यंत सादर करावा लागेल.
१७ जुलै रोजी रात्री २३.वाजुन ५५ मिनिटे पर्यंत सादर करावयाचा आहे.
आॅनलाईन पदधतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख –
उमेदवारांना विहीत परीक्षा शुल्क १७ जुलै २०२३ पर्यंत भरायचे आहे.
१७ जुलै रोजी रात्री २३ वाजुन ५५ मिनिटांपर्यंत आॅनलाईन पदधतीने आपणास परीक्षा शुल्क भरता येईल.
परीक्षा शुल्क किती असणार आहे?
तलाठी पेसा क्षेत्राबाहेरील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये इतकी फी भरावी लागेल अणि राखीव प्रवर्ग,मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना ९०० रूपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
तलाठी पेसा क्षेत्रातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाहीये.
अणि तलाठी पेसा क्षेत्रातील राखीव प्रवर्ग,मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना ९०० रूपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
परीक्षा शुल्क नाॅन रिफंडेबल असणार आहे.उमेदवार आॅनलाईन पदधतीने क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेटबॅकिग इत्यादी दवारे पेमेंट करू शकतात.
परीक्षेची तारीख तसेच कालावधी काय असणार आहे?
परीक्षेची तारीख काय असेल हे mahabhumi.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना कळविण्यात येणार आहे तसेच उमेदवारांना प्रवेशपत्रादवारे देखील याबाबत कळविले जाईल.
म्हणजे परीक्षा कधी होईल हे अजुनही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नाहीये.
शैक्षणिक पात्रता –
जाहीरातीत असे म्हटले आहे की २६ जुन २०२३ पर्यंत खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रता अहर्ता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कुठल्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी हिंदी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे.
उमेदवाराने संगणक तसेच माहीती तंत्रज्ञान विषयात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.जसे की एम एस सी आयटी,ट्रीपल सी इत्यादी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जर उमेदवाराकडे एम एस सी आयटी ट्रीपल सी इत्यादी कंप्युटरचे सर्टिफिकेट नसेल तर अहर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत कंप्युटर सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.
माजी सैनिकांसाठी शैक्षणिक पात्रता –
पदवी ही पात्रता असलेल्या अणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस एससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांकरीता अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा –
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १७/७/२०२३ असणार आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा किमान १८ अणि जास्तीतजास्त ३८ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ पेक्षा कमी नसावे अणि ४३ पेक्षा जास्त नसणे.
पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा अट जास्तीत जास्त ५५ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.स्वातंत्र्य सैनिक यांना ४५ खेळाडूंसाठी ४३, दिव्यांग उमेदवारांना ४५ वर्षे, प्रकल्प ग्रस्त भुकंपग्रस्त ४५,माजी सैनिकांना ४५ वयोमर्यादा जास्तीत जास्त ठेवण्यात आली आहे.
भरतीसाठी इतर पात्रतेच्या अटी नियम तसेच लागणारी आवश्यक कागदपत्रे-
उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.त्याच्याकडे महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र domicile certificate असायला हवे.
ज्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नाही असे उमेदवार महाराष्ट्र राज्यातील आपला जन्म दाखला देखील दाखवू शकता.रहिवासी १५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असणे आवश्यक असणार आहे.
कॅटॅगरी मधील उमेदवारांना caste certificate देणे अनिवार्य असणार आहे.निवडीअंती caste validity certificate देखील सादर करावे लागेल.किंवा नियुक्ती आधी निर्गमित केलेल्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.
तलाठी भरतीसाठी आॅनलाईन अर्ज करायला लागणारी आवश्यक कागदपत्रे –
१)अर्जातील नावाचा पुरावा म्हणून दहावीचे मार्कशीट लागणार आहे.
२)वयाचा पुरावा- आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड इत्यादी पैकी एक
३)आपण कशात पदवी घेतली आहे त्याचा पुरावा देण्यासाठी पदवीचे प्रमाणपत्र लागणार आहे.
४) सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास मागासवर्गीय असल्याचा पुरावा लागणार आहे.
५) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास त्याचा पुरावा देखील लागणार आहे.
६) अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणार नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागणार आहे.
७) दिव्यांग असल्यास पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा लागणार आहे.
८) माजी सैनिक असल्यास पात्र माजी सैनिक व्यक्ती असल्याचा पुरावा लागणार आहे
९) खेळाडु असल्यास खेळाडु आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागणार आहे.
१०) अनाथ असल्यास अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागणार आहे.
११) प्रकल्प ग्रस्त असलेल्या व्यक्तींना पात्र प्रकल्प ग्रस्त असल्याचा पुरावा लागणार आहे.
१२) भुकंपग्रस्त असलेल्या व्यक्तींना पात्र भुकंपग्रस्त असल्याचा पुरावा लागणार आहे.
१३) अंशकालीन पदवीधर कर्मचारी असल्यास अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागणार आहे.
१४)एस एससी मध्ये नावात बदल झाला असल्यास त्याचा पुरावा लागणार आहे.
१५) मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
१६) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
१७) अनुभव प्रमाणपत्र
१८) अराखीव महिला यांना आरक्षणाचा दावा करण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे.
जाहीरातीत देण्यात आलेल्या काही सर्वसाधारण सुचना –
उमेदवाराकडील अर्ज फक्त आॅनलाईन पदधतीने स्वीकारले जातील इतर कुठल्याही माध्यमातून केलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
उमेदवारांना फक्त कुठल्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे.तो वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे अर्ज सादर करू शकत नाही.एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज सादर करतील अशा उमेदवाराचे अर्ज अपात्र ठरवले जातील.
अणि समजा एखाद्या उमेदवाराने एकाच जिल्ह्यात एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले तर उमेदवाराने सादर केलेल्या ह्या सर्व अर्जापैकी पण अंतिम अर्ज गृहित धरला जाणार आहे.
उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे अधिकृत संकेतस्थळ mahabhumi.gov.in हे असेल.अर्ज सादर करण्या बाबदच्या सुचना देखील ह्याच अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.
अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय उमेदवाराचा अर्ज भरतीसाठी स्वीकारला जाणार नाही.
अर्ज भरण्याची परीक्षा शुल्क भरण्याची तारीख संगणकाद्वारे निश्चित केली गेली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेत बंद करण्यात येणार आहे म्हणून उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत परीक्षा शुल्क अणि अर्ज शुल्क भरायचे आहे.
अपंगांना, दिव्यांगांना.अनुसुचित जाती,अनाथांना, खेळाडुंना माजी सैनिकांना भुकंपग्रस्त पदवीधर इत्यादी सर्व जणांना इथे आरक्षण दिले गेले आहे.
परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे?
तलाठी भरती परीक्षा साठी मराठी हिंदी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित ह्या विषयावर परीक्षा घेतली जाणार आहे.
सर्व विषयांची परीक्षा प्रत्येकी ५० गुणांची असणार आहे.प्रत्येक विषयासाठी २५ प्रश्न विचारले जातील.
चारही विषय मिळुन एकुण २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील.
परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
परीक्षेचा कालावधी –
परीक्षेचा कालावधी २ तास १२० मिनिटे इतका असणार आहे.
महत्वाची सूचना –
सर्व सरळ सेवा परीक्षा टीसीएस आयबीपीएस मार्फत होणार आहे अणि आत्ता निघालेली तलाठी भरती परीक्षा टीसीएस द्वारे घेतली जाणार आहे.
ह्या भरतीचा अभ्यास करण्यासाठी आपण टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण अणि विश्लेषण हे पुस्तक विकत घेऊ शकतात.
हे पुस्तक अॅमेझाॅन फ्लिपकार्ट वर देखील आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे.