घातक हार्ट अटॅक बंदुक ?- The CIA Heart Attack Gun

The CIA Heart Attack Gun

1950 ते 1960 च्या दशकात अमेरीका आणि रशिया दरम्यान शीतयुद्ध सुरू असताना अमेरिकेच्या गुप्तहेर संस्था Central Intelligence Agency   ने बरच संशोधन करून एक घातक हार्ट अटॅक बंदुक तयार केली.

 या शीतयुद्धाच्या दरम्यान ही संस्थेचे संपूर्ण लक्ष हे अमेरीकेतल्या उच्च राजकिय पदस्थ व्यक्तीच्या हत्या घडवून आणल्या जातील अशी चिंता नेहेमी भेडसावत असे, त्यामुळे परदेशी संस्था कडून अश्या संभाव्य हत्या रोखण्यासाठी Central Intelligence Agency चे प्रयत्न सुरू असत.

हे उपकरण अतिशय गुप्तता व सावधगिरी बाळगत Central Intelligence Agency ने हे बंदूक तयार केली जिच्या द्वारे समोर च्या हव्या त्या व्यक्तीवर गोळी झाडल्या  नंतर त्या व्यक्तीला तात्काळ हृदय विकारचा जबरदस्त झटका येऊन 2 मिनिटात त्याचा मृत्यू होत असे.

घातक हार्ट अटॅक बंदुक- The CIA Heart Attack Gun
घातक हार्ट अटॅक बंदुक- The CIA Heart Attack Gun

हे पाहून की ही Heart Attack Gun बंदुक नेमकी कशी काम करत असे,  

या Heart Attack Gun बंदुकी चा खटका दाबल्या नंतर एक विशिष्ठ रित्या तयार केलेला अगदी छोटासा बाण जो गोठवलेल्या शेलफिश च्या विषा पासून तयार केलला असायचा तो बंदुकीतून समोरील व्यक्ती च्या शरीरात छेदत् आत घुसायचा.

हा बाण एकदा निशाण्यावर वर मारला ,की तो कपडे व कातडी छेदत शरीरात घुसन तात्काळ त्या बाणातील विष रक्तप्रवाह मिसळत असे. ज्याने त्या व्यक्तीला चा तात्काळ काही मिनिटातच हार्ट अटॅक येऊन मृत्यू ओढवला जायचा ,एक प्रकार ही बेमालूम पणे हत्याच असायची.

सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे ये विष यानंतर अगदी क्षणार्धात विघटन होत असल्याने ,हत्या करण्यात आल्याचा संशय किंवा काही पुरावा ,धागादोरा मिळण्याची शक्यता मावळली जायची. 

दुसरं म्हणजे ही गोळी, बाण 100 मीटर इतक्या लांब अंतराहून  झाडता येत असल्याने आणि सायलेन्सर सोबत असल्याने गोळी चा आवाज कुणाला ऐकू येत नसे. या कारणाने ही बंदूक तेव्हा खूप च घातक असे शस्त्र मानलं गेले.

See also  फ्रेंच विद्यार्थ्यांना का दिली जात असे वाईन? - French School children Drink Wine

पुढे जाऊन 1975 मध्ये सिनेटर फ्रॅंक चर्च यांच्या एका कमिटी सुनावणी दरम्यान अशी बंदूक असल्याचा उलगडा देशाला तसेच जगासमोर झाला. आणि अश्या बंदूक असतात या अफवा ,गप्पा आणि भीतीवर एकदाच पडदा पडला.

यावरून एक मात्र दिसून आले की जगभरात असलेल्या गुप्तहेर संस्था आपल्या शत्रूराष्ट्रना नामोहरम करण्या करता किती मोठया प्रमामावर सायसन्स आणि टेक्नॉलॉजी चा वापर करू शकतात.

source