टीआरपी – TRP Full Form Marathi
गेल्या चार सहा महिन्यापूर्वी देशाचा आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रत सोशल मीडिया व वृत्त माध्यमात TRP प्रकरण ढवळून निघाल. काही नामवंत टेलिव्हिजन चॅनेल्स ह्या प्रकरणात गोवले गेलेत आणि नागरिक हे TRP नेमकं काय असेल ह्या बाबतीत माहिती घेताना दिसलेत .
ह्याच TRP FULL FORM आपण माहिती घेणार आहोत.
TRP FULL FORM काय?
TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स म्हणजे ह्याला मराठीत आपण दूरचित्रवाणी श्रेणी गुण अस म्हणू शकतो.
TRP च इतकं महत्व का आहे? ह्या TRP च खालील काही गोष्टी वरून महत्व कळत
- ह्या TRP रेटिंग वरून टेलिव्हिजन वर प्रसारित होणारे विविध कार्यक्रम किंवा मालिका हयापैकी कोणता कार्यक्रम किंवा मालिका सर्वात जास्त प्रेक्षकांनकडून पाहिल्या गेल्यात , प्रतिसाद मिळाला ह्याच मूल्यांकन केलं जाते , अभ्यास केला जातो.
- उदाहरण म्हणजे – रात्री 8 .30 वाजता विविध चॅनेल्स वर , विविध भाषेत कौटुंबिक मालिका प्रसारित होत असतात. TRP वरून माहिती मिळवली जाते की कोणती मालिका लोकांनी सर्वात जास्त पाहिली. कुठल्या मालिकेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला.
- TRP द्वारे निकालावरून लोकांच्या आवडीनिवडी चा अंदाज बांधला जातो. त्यावरून मालिकां यशस्वी झाल्यात का फेल झाल्यात ,लोकप्रियता मिळाली की नाही ह्या संबंधी महिती ही टेलिव्हिजन मालिका निर्मात्यांना मिळते.
TRP मोजल कसे जाते?
हे एक पीपल मीटर नावच यंत्र असते जे दूरचित्रवाणी संचाना जोडलेले असते , हे यंत्र काही मोजक्या निवडक लोकांच्या घरात दूरचित्रवाणी संचाशी जोडलेले असते. जसे निवडणूक पूर्वी निकाला चे सर्वे बांधले जातात व त्यासर्वे करता फक्त काही लोकांचा सहभाग असतो परुंतु त्यावरून कोणता पक्ष निवडून येईल. किती जागा मिळतील हा अंदाज बांधला येतो. तसाच हा प्रकार
काही शेकडो किंवा हजार घरातील निवडक टेलिव्हिजन संचाशी पीपल मीटर नावाचा एक लहान यंत्र जोडून ही सर्व माहिती डेटा मिळवला जातो. TRP जास्त असेल तर अर्थातच जास्त प्रेक्षक ती मालिका पाहात आहेत. ह्या TRP श्रेणीं वरून फक्त मालिका निर्मत्यानाच नाही तर जाहिरातदार असतात त्यांना खूप महत्त्वाची महिती मिळत असते. आपला प्रेक्षक कोण आहे ह्यावरून कुठल्या जाहिराती दाखवायच्या ह्याचा अभ्यास करून मार्केटिंग रणनीती ठरवली जाते.
TRP मोजण्याच्या दोन पद्धती :
PMC -पिक्चर मॅचिंग मेथड- ह्या पद्धतीत जे लहान पीपल मीटर यंत्र असते त्याद्वारे प्रेक्षक कुठला कार्यक्रम पाहत आहेत त्या कार्यक्रमचा छोटासा भाग रेकॉर्ड केला जातो व ती माहिती वर (INTAM) ला पाठविले जाते व त्यावरून TRP श्रेणी ठरवली जाते.
दुसरा प्रकार आहे- फ्रिक्वेन्सी मोनिटोरिंग टेक्निक- ह्या प्रकारात जे पीपल मीटर नावाचं यंत्र आहे ते काही निवडक हजारो लोकांच्या टेलिव्हिजन संचाला जोडलं जाते. ह्यात प्रेक्षक कुठला ठराविक कार्यक्रम किती वेळ,कोणत्या वेळी पाहतात ही सर्व माहिती गोळा करून पाठवली जाते. ह्यावरुन कोणत चॅनेल प्रेक्षक जास्त पहातात ह्याचा अंदाज येतो.
TRP श्रेणी कुणाला फायदा होतो ?
- ह्यावरून टेलिव्हिजन मालिका निर्मात्यांना माहिती मिळते की कोणत्या प्रकारचे कार्यक्रम लोकांना जास्त आवडतात ,त्यावरून पुढील मालिका निर्मिती बाबत निर्णय व योजना तयार केल्या जातात.
- जाहिरातदार जे असतात म्हणजे( ज्या जाहिराती आपण पाहतो मालिका दरम्यान ब्रेक मध्ये) त्यांना एक चांगला डेटा, माहिती मिळते. कोणत्याही कार्यक्रम ,किंवा मालिका दरम्यान जाहिराती न दाखवता फक्त जास्त लोकप्रिय कार्यक्रम दरम्यान जाहिराती दाखवून त्याना जाहिराती वर केलेल्या खर्च चा परतवा मिळतो.