टी एस एचचा फुलफाँर्म काय होतो?- TSH FULL FORM IN MARATHI

टी एस एचचा फुलफाँर्म काय होतो?- TSH FULL FORM IN MARATHI

टी एस एचचा फुलफाँर्म Thyroid Stimulating Hormone असा होत असतो.

टी एस एच म्हणजे काय?Tsh Meaning In Marathi

थायराँईड स्टीम्युलेटींग हार्मोनचा अर्थ थायराँईडला उत्तेजित करणारे संप्रेरक असा होत असतो.

T3 T4 Tsh Test Full Form In Marathi

टी फोरचा फुलफाँर्म Thyroxine थायरोसाईन असा होत असतो

टी थ्रीचा फुलफाँर्म Triiodothyronine असा होत असतो.

टी एस एच टेस्टचा फुलफाँर्म Thyroid Stimulating Hormone Test असा होत असतो.

थायराँईड म्हणजे काय?Thyroid Meaning In Marathi

थायराँईड ही मानवी शरीरातील एक अत्यंत महत्वाची ग्रंथी आहे.थाँयराँईड ही ग्रंथी आकाराने फुलपाखरासारखी असते अणि ही ग्रंथी आपल्या मानवी शरीरामध्ये गळयाच्या नजीक असते.

थायराँईड ह्या ग्रंथीच्या माध्यमाने टी ३ टी ४ ह्या संप्रेरकांची म्हणजेच हार्मोन्सची निर्मिती होत असते.आपल्या शरीराची क्रिया सदैव कार्यरत ठेवण्यासाठी आपणास ह्या हार्मोन्सची आवश्यकता भासत असते.आपल्या शरीरातील सर्व क्रियांची गती ह्या संप्रेरकांवर आधारीत असते.

थायराँईड ग्रंथींचे महत्व –

● आपल्या थायराँईड ग्रंथींमधुन ज्या संप्रेरकांचे स्रवण होते त्यामुळे आपल्या शरीरातील तापमान हे नेहमी मर्यादित राहत असते.एवढेच नव्हे तर आपल्या शरीरात रक्तपेशी देखील निर्माण होत असतात.

See also  ॐ ह्या मंत्राचा रोज जप करण्याचे 11 फायदे - Om chanting benefits in Marathi

● आपले हदय तसेच पचन संस्था व्यवस्थित कार्य करते.आपल्या मेंदुचा विकास होत असतो.आपल्या स्नायुंचे अणि हाडांचे आरोग्य देखील नेहमी उत्तम राहत असते.

थायराँईड फँक्शन टेस्ट कशाला म्हणतात?

ही एक चाचणी आहे ज्यात आपल्या रक्तामधील टी ३ अणि टी ४ ची तसासणी करण्यात येत असते.ह्या टेस्टला थायराँईड प्रोफाईल टेस्ट असे सुदधा म्हटले जाते.

थायराँईड फँक्शन टेस्टचे महत्व तसेच फायदे –

थायराँईड फंक्शन टेस्टच्या साहाय्याने आपणास हे जाणुन घेता येते की आपली थायराँईड ग्रंथी कशा पदधतीने कार्य करत आहे ती जास्त प्रमाणात कार्य करू राहीली की कमी प्रमाणात.

हायपरथायराँडिझ्म कशाला म्हणतात?Hyperthyroidism Meaning In Marathi

जर थायराँईड ग्रंथी जास्त प्रमाणात कार्य करत असेल तर त्याला हायपरथायराँडिझम असे म्हटले जाते.ह्या स्थितीत शरीरातील थायराँईड हार्मोन्सची पातळी वाढत असते.

हायपरथायराँडिझ्मची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-

● डोळे मोठे होणे

● अचानक वजन कमी होणे

● घाम येऊ लागणे

● हदयाचे ठोके वाढणे अनियमित पदधतीने हदयाचे ठोके चालणे

● हदयात धडधड वाढणे

हायपो थायराँडिझ्म कशाला म्हणतात?Hypothyroidism Meaning In Marathi

जर थायराँईड ग्रंथी ह्या कमी प्रमाणामध्ये कार्य करत असतील तर त्यास हायपो थायराँडिझ्म असे म्हटले जाते.

ह्या स्थितीत शरीरातील थायराँईड हार्मोन्सची पातळी कमी कमी होत जाते.

हायपोथायराँडिझ्मची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-

● अचानक वजन वाढु लागणे

● त्वचा कोरडी पडु लागणे

● काँस्टिपेशनची समस्या निर्माण होणे म्हणजेच पोट साफ न होणे.

● अचानक थंडी वाजु लागणे

● हदयाचे ठोके कमी होणे

वरील लक्षण जेव्हा रूग्णात आढळुन येत असतात तेव्हा डाँक्टर त्यास टी ३ टी ४ टीएस एच तपासणी करण्यासाठी थायराँईड प्रोफ़ाइल टेस्ट करण्याचा सल्ला देत असतात.

थायराँईड टेस्ट  किती खर्च करावा लागतो?Thyroid Test Cost,Price In Marathi

महाराष्टात पुणे,मुंबई नाशिक इत्यादी ठिकाणी थायराँईड टेस्ट करायला किमान ५०० रूपये कमाल १००० रूपये लागत असतात.

See also  बिलिरूबीन टेस्ट म्हणजे काय?bilirubin test information

थायराँईड प्रोफाईल टेस्ट मध्ये T3,T4,अणि Tsh चे साधारणत प्रमाण किती यायला हवे?

Thyroid Profile Test Normal Range In Marathi

थायराँईड प्रोफाईल टेस्टमध्ये टी ३ टी ४ अणि टीएस एचचे साधारणत प्रमाण पुढीलप्रमाणे असायला हवे –

● टी ३ चे नाँरमल प्रमाण ८०-२०० एन जी/ डिएल

● टी ४ चे नाँरमल प्रमाण ४.५ -११.७ एम सीजी /डी एल

● टी एस एचचे नाँरमल प्रमाण ०.३-५ यु/एम एल

थायराँईड प्रोफाईल टेस्ट रिपोर्ट नाँरमल येणे म्हणजे काय?

थायराँईड प्रोफाईल टेस्ट नाँरमल येणे याचा अर्थ आपल्या शरीरातील थायराँईड ग्रंथी एकदम व्यवस्थित योग्यरीत्या कार्य करू राहील्या.

आपल्या शरीरातील टी ३,टी४ अणि टी एस एच या तिघांचे प्रमाण जर नाँरमल पेक्षा कमी असेल तर आपण काय समजायचे?

आपल्या शरीरातील टी ३,टी४ अणि टी एस एच या तिघांचे प्रमाण जर नाँरमल पेक्षा कमी असेल तर आपण समजायचे की आपल्याला पिटयुटरी हायपोथायराडिझम किंवा नाँन थायराईडल इलनेस हा विकार झाला आहे.

जर आपल्या शरीरातील टी ३ टी ४ चे प्रमाण नाँरमल पेक्षा जास्त दिसुन आले तर त्या रिपोटर्धुन आपणास काय सुचित होते?

जर आपल्या शरीरातील टी ३ टी ४ चे प्रमाण नाँरमल पेक्षा जास्त दिसुन आले तर त्या रिपोटर्धुन आपणास असे सुचित होते की आपणास हायपरथायराँडिझ्म,थायराँईडचा कँन्सर,सुबँकट थायराँडिसीस,टाँक्झिक मल्टीनोडुलर गोइटर इत्यादी विकार जडलेले आहेत.

जर आपल्या शरीरातील टी ३ टी ४ चे प्रमाण नाँरमल पेक्षा कमी दिसुन आले तर त्या रिपोटर्धुन आपणास काय सुचित होते?

जर आपल्या शरीरातील टी ३ टी ४ चे प्रमाण नाँरमल पेक्षा कमी दिसुन आले तर त्या रिपोटर्धुन आपणास असे सुचित होते की आपल्या शरीरात आयोडीनची कमतरता आहे किंवा त्याचे प्रमाण वाढले आहे.

किंवा आपल्याला पिटयुटरी डिस्फंकशन,आयडोपँथिक माईक्सडेमा इत्यादी थाँयराँईडशी संबंधित विकार जडलेले आहेत.

See also  Surrogacy म्हणजे काय ? प्रक्रिया,आव्हानं व फायदे - Surrogacy detailed information in Marathi

जर आपल्या शरीरातील टी ३ टी ४ चे प्रमाण नाँरमल दिसुन आले अणि टी एस एच पातळी वाढलेली असेल तर त्या रिपोटर्धुन आपणास काय सुचित होते?

जर आपल्या शरीरातील टी ३ टी ४ चे प्रमाण नाँरमल दिसुन आले अणि टी एस एच पातळी वाढलेली दिसुन येत असेल तर त्या रिपोटर्धुन आपणास असे सुचित होते की आपणास सौम्य स्वरुपाचा हायपोथायराडिझम झालेला आहे.

अणि जर टी एस एचचे प्रमाण खुप कमी असेल तर आपल्याला हायपरथायराडिझम झालेला असु शकतो.