उदगम पोर्टल काय आहे?udgam portal information in Marathi
उदगम पोर्टलचा फुलफाॅम unclaimed deposit gateway to access information असा होतो.
अशा ठेवी ज्यावर अद्याप दावा करण्यात आलेल्या नाहीये अणि त्या आपल्या देशातील बॅकेत बेवारस पणे पडुन आहेत अशा हक्क नसलेल्या ठेवींचा शोध घेण्यासाठी शासनाने उदगम पोर्टलची सुरूवात केली आहे.
डिपाॅझिट तसेच ठेवीमध्ये एफडी आरडी इत्यादींचा समावेश होतो.
जेव्हा आपण आपल्या डिपाॅझिट खात्यात दहा वर्षे कुठलाही पैशांचा देवाणघेवाणीचा व्यवहार करत नसलो तेव्हा बॅक हे अनक्लेम डिपाॅझिट आरबीआयकडे हस्तांतरित करत असते.
अशा वेळी हे डिपाॅझिट आरबीआयच्या डीईए एफ ह्या फंडमध्ये जाऊन लागत असते.
डीई ए एफचा फुलफाॅम depositor education and awareness fund असा होतो.ही योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती.
उदगम ह्या पोर्टल वर जाऊन आपण आपल्या बॅकेत पडुन असलेल्या ठेवींचा शोध घेऊ शकतो.यात आपल्याला एकापेक्षा जास्त बॅकेत ठेवलेल्या ठेवी शोधता येऊ शकतात.
दावा करण्यात न आलेल्या ठेवी बॅकेत दिवसेंदिवस वाढत असल्याने आरबीआयच्या वतीने हे नवीन पोर्टल हक्क नसलेल्या ठेवींचा शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
हे पोर्टल लाॅच करण्याबाबत अधिकृत घोषणा ६ एप्रिल २०२३ रोजी आरबीआयच्या वतीने करण्यात आली होती.
https://udgam.rbi.org.in/unclaimed-deposits/#/login
आपल्या दावा न केलेल्या विविध बॅकेतील ठेवींचा शोध घेण्यासाठी आपल्या ठेवी ठेवलेल्या बॅकेसोबत लवकरात लवकर ग्राहकांनी संपर्क साधावा असे आरबीआयने आवाहन केले आहे.
सध्या ह्या पोर्टलवर फक्त सात बॅकामध्ये ठेवलेल्या ठेवींचा तपशील आपणास उपलब्ध करून देण्यात आला आहे.उर्वरीत बॅकेत ठेवलेले ठेवीचे तपशील लवकरच ह्या पोर्टलवर अपलोड केले जाणार आहे.
आतापर्यंत आरबीआयकडे असा दावा करण्यात न आलेली हजार करोड पेक्षा अधिक रक्कम जमा आहे.हया दावा न करण्यात आलेल्या ठेवींचा शोध लावता यावा म्हणून आरबीआयने हे पोर्टल सुरू केले आहे.
उदगम पोर्टलचे फायदे कोणकोणते आहेत?
- उदगम पोर्टल दवारा आपण आपल्या दावा न केलेल्या बॅकेतील ठेवी शोधुही शकतो आणि त्यावर दावा देखील करू शकतो.
- उदगम पोर्टल दवारा आपण आपल्या घरातील एखाद्या नात्यातील एखाद्या मृत्यू झालेल्या डिपाॅझिट शोधु शकतो अणि त्यावर दावा करू शकतो.
- किंवा ज्या बॅकेत आपल्या दावा न केलेल्या ठेवी पडलेल्या आहेत ते खाते पुन्हा सक्रिय करू शकतो.
- ज्या मृत व्यक्तींची बॅकेत एफडी आरडी असते जी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर डिफ फंडमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे.अणि त्या एफ डी विषयी त्या व्यक्तीच्या घरच्यांना माहीत देखील नाहीये.
- अशा हक्क नसलेल्या दावा करण्यात आला नसलेल्या ठेवींचा शोध सदर व्यक्तीच्या घरच्यांना नातेसंबंधींना घेता यावा यासाठी आरबीआयने ह्या उदगम पोर्टल च्या स्वरूपात ह्या जनजागृती मोहीमेचा प्रारंभ केला आहे.