एसबीआय ची अमृत कलश योजना काय आहे? SBI Amrut Kalash yojana in Marathi

एसबीआयची अमृत कलश योजना काय आहे?SBI Amrut kalash yojana in Marathi

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बॅक म्हणून परिचित असलेली एसबीआय बॅक आपल्या ग्राहकांसाठी, गुंतवणूक दारांसाठी,खातेधारकांसाठी नेहमी नवनवीन फायदेशीर अणि अधिक परतावा देत असलेल्या योजना घेऊन येत असते.

अमृत कलश ही सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांसाठी सुरू केलेली अशीच एक नवीन फायदेशीर गुंतवणूक योजना आहे.

ही योजना बंद करण्याची शेवटची तारीख १५ आॅगस्ट २०२३ अशी निर्धारित करण्यात आली होती.

पण हया योजनेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे एसबी आयने ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत अधिक वाढ करण्याचे ठरवले आहे.

याबाबदची अधिकृत घोषणा देखील एसबीआयने आपल्या आॅफिशिअल वेबसाईट वरून केली आहे.

एसबीआयच्या सांगण्यानुसार आता ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना ३१ आॅगस्ट २०२३ पर्यंत खाते उघडता येणार आहे.अणि ह्या योजनेचा फायदा प्राप्त करता येईल

म्हणजे आता ह्या योजनेत गुंतवणूक दारांना गुंतवणूक करण्यासाठी चार महिने इतका अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.

एसबीआयच्या अमृत कलश ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आपण आॅनलाईन अणि आॅफलाईन अशा दोघे पद्धतीचा अवलंब करू‌ शकतो.

अमृत कलश ह्या योजनेवर बॅकेने १२ एप्रिल २०२३ पासुन नवीन व्याजदर लागू केले होते.

SBI Amrut Kalash yojana in Marathi
SBI Amrut Kalash yojana in Marathi

एसबीआय अमृत कलश योजना काय आहे?

एसबी आय बॅकेच्या अमृत कलश ह्या योजनेमध्ये गुंतवणूक दारांना इतर योजनांच्या तुलनेत सर्वाधिक व्याज प्रदान केले जाते.

अमृत कलश योजना मध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी –

  • ह्या योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी ४०० दिवस इतका ठेवण्यात आला आहे.
  • ह्या योजनेतुन जर आपल्याला ४०० दिवसाचा कालावधी संपण्याच्या आधी पैसे काढायचे असतील तर आपणास ०.५० ते १ टक्का इतके दंड द्यावे लागेल.
See also  पॅन कार्ड मध्ये टीडीएसची रक्कम कशी तपासायची? How to check tds amount in pan card

अमृत कलश योजने मध्ये गुंतवणूक केल्यावर किती व्याज प्राप्त होते?

  • हया योजनेत गुंतवणूक केलेल्या सामान्य गुंतवणूक दारांना ७.१० टक्के तर सिनिअर सिटीझन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के इतके व्याज देण्यात येईल.
  • ह्या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की यात ज्येष्ठ नागरिकांना सामान्य गुंतवणूक दारांपेक्षा अधिक व्याज प्राप्त होते.
  • अमृत कलश योजनेची वाढती लोकप्रियता अणि लोकांकडून ह्या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता ह्या योजनेच्या शेवटच्या तारखेमध्ये आतापर्यंत दोन वेळा मूदतवाढ झालेली आपणास पाहावयास मिळते.
  • १२ एप्रिल २०२३ रोजी सुरू करण्यात आलेल्या ह्या योजनेची अंतिम तारीख २३ जुन २०२३ अशी होती.पण अंतिम तारीख येण्याच्या आधीच ह्या मूदतीत १५ आॅगस्ट २०२३ पर्यंत वाढ करण्यात आली होती.
  • दिवसेंदिवस लोकांकडून ह्या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद मागणी बघुन एसबीआयने पुन्हा एकदा ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी नागरीकांना मुदतवाढ देण्याचे ठरवले आहे.
  • आता अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपणास ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.म्हणजे तब्बल चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
  • अमृत कलश योजना मध्ये सर्वप्रथम मॅच्युरिटी इंटरेस्ट अणि टीडीएस कापुन घेतला जातो मग ह्या योजनेची रक्कम आपल्या बॅकेतील एफडी खात्यात जमा करण्यात येत असते.
  • अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान १९ वय असलेली व्यक्ती किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती आपले अकाऊंट ओपन करू शकतो.
  • अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणूक करणारया गुंतवणूक दारांना मासिक, तिमाही, सहामाही पदधतीने व्याज दिले जाते.
  • एसबीआयच्या अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपणास एसबीआयच्या बॅकेत जावे लागेल किंवा आपण नेट बँकिंग एसबीआय योनो अॅपचा वापर करून देखील एफडी सुरू करू शकतो.

अमृत कलश योजनेचे फायदे –

  • एसबीआयच्या अमृत कलश योजना मध्ये गुंतवणूक दारांना २ कोटी रूपये इतकी गुंतवणूक करता येते.
  • अमृत कलश योजनेतुन आपण याची मुदत संपण्याच्या आधी सुद्धा पैसे काढु शकतो.
  • अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या प्रकारच्या कोड उत्पादनाची आवश्यकता देखील भासत नाही.
  • अमृत कलश योजना मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना एसबीआय योनो अॅपचा उपयोग करता येतो.
  • अमृत कलश योजना मध्ये गुंतवणूक केल्याने आपणास कर्ज देखील प्राप्त होते.हा एक विशेष फायदा ह्या योजनेत गुंतवणूक करण्याचा आहे.
See also  बँक से संबंधित जरूरी शब्द और उनका मतलब - Bank Related Words And Their Meaning In Hindi