रतन टाटा यांना मिळाला महाराष्ट्र राज्यातील पहिला उद्योगरत्न पुरस्कार Udyog Ratna Award meaning in marathi

रतन टाटा यांना मिळाला महाराष्ट्र राज्यातील पहिला उद्योगरत्न पुरस्कार Udyog Ratna award meaning in Marathi

महाराष्ट्र शासनाकडुन प्रथमतः सुरू करण्यात आलेला उद्योगरत्न पुरस्कार हा टाटा कंपनीचे मालक रतन टाटा यांना देण्यात आला आहे.

रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी करीता अणि महाराष्ट्र राज्यातील विकासात पार पाडलेल्या उत्तम भुमिकेसाठी विविध क्षेत्रात दिलेल्या आपल्या उत्तम आर्थिक अणि सामाजिक योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या हस्ते रतन टाटा यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन शनिवारच्या दिवशी १९ आॅगस्ट २०२३ रोजी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

या वर्षांपासून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.हा पुरस्कार देण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा आहे.

महाराष्ट्र शासनाकडुन सुरू करण्यात आलेल्या उद्योग रत्न पुरस्काराचे प्रथम मानकरी हे भारतातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा ठरले आहेत.

उद्योग रत्न पुरस्कारासोबत महिला उद्योजक,युवा उद्योजक,अणि मराठी उद्योजक यांना देखील तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.

रतन टाटा यांनी महाराष्ट्र सरकारकडून स्वीकारलेल्या उद्योग रत्न पुरस्कारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की रतन टाटा यांना देण्यात आलेल्या ह्या उद्योग पुरस्काराने उद्योग रत्न पुरस्काराचा मान वाढला आहे.

उद्या रविवारी होत असलेल्या सत्कार समारंभात २० आॅगस्ट २०२३ रोजी आदर पुनावाला यांना उद्योग मित्र पुरस्कार तर विलास शिंदे यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक

रतन टाटा यांना मिळाला महाराष्ट्र राज्यातील पहिला उद्योगरत्न पुरस्कार Udyog Ratna Award meaning in marathi
रतन टाटा यांना मिळाला महाराष्ट्र राज्यातील पहिला उद्योगरत्न पुरस्कार Udyog Ratna Award meaning in marathi

गौरी किर्लोस्कर यांना उदयोगिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

याआधी काही महिन्यांपूर्वी रतन टाटा यांना आॅस्टेलिया मधील आॅडर आॅफ आॅस्ट्रेलिया ह्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

रतन टाटा यांना आपल्या सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी करीता आतापर्यंत अनेक मोठमोठ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

See also  जागतिक अन्न सुरक्षा दिवसा विषयी माहीती - World food safety day information in Marathi

रतन टाटा यांना २०००साली केंद्र सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.