युनिसेफ – पूर्वी युनिसेफला युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्डरेन्स फंड म्हणून ओळखलं जातं असे.
1953 साली युनिसेफला संयुक्त राष्ट्रांच् कायम सदस्यत्व मिळाल्यानंतर त्याच नाव थोडं लहान करण्यात येऊन ते युनाटेड नेशन्स चिल्डरेन्स फंड असे ठेवण्यात आले.
युनिसेफ स्थापना ह्या विचराने व उद्देश्याने झाली आहे की जगातील प्रत्येक लहान मुलाचा हा मूलभूत अधिकार आहे की त्याला चांगला आहार, चांगलं शिक्षण व पुरेशी सुरक्षितता ही दिली गेली पाहिजे.
युनाटेड नेशन्स चिल्डरेन्स फंड हा संयुक्त राष्ट्रांन कडून चालविला जात असलेला विशेष असा कार्यक्रम असून ह्यात गरीब ,होतकरू व गरजू लहान मुलांना व आया ना (mothers ) त्यांचं शिक्षण आरोग्य व एकंदरीतच जीवनमान उंचावण्यासाठी साठी मदत केली जाते .
युनिसेफ कोणत्या क्षेत्रात काम करते?
- आरोग्य
- आजार , व्याधी
- हिंसाचार
- युद्धजन्य परिस्थिती
- नैसर्गिक आपत्ती
ह्याचा इतिहस काय आहे?
- आज साधारणतः 190 पेक्ष्या जास्त देशात युनिसेफ चे मदतकार्य सूर असतात
- 1946 मध्ये 11 डिसेंबर ला ,दुसऱ्या महायुद्धात युरोपात मोठी जीवितहानी झाल्यानंतर बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त राष्ट्रांच्या साधारण सभेने ह्याची स्थापना केली
- पुन्हा युनिसेफ चे कार्य फक्त युरोप करता मर्यादित न ठेवता संपूर्ण जगातील अविकसित व विकसनशील देशातील स्रिया ,आया व बालकांना मदत मिळावी म्हणहून ह्याच कार्य वाढवल गेल व प्रसार केला गेला.
- तळागाळातील तसेच गरजू व्यक्तीपर्यंत योग्य ती मदत पोहचण्या करता युनिसेफ त्या त्या देशातील स्थानिक संस्था, स्वयंसेवी संस्था , त्या देशातील सरकार ह्यांचा सोबत मिळून आकस्मिक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत बालकांना मदत करण्यासाठी राबत असते