मैं समय हूं ! और आज महाभारत की अमर कथा सुनाने जा रहा हू | यह महाभारत कोई कुरुवंश की सीधीसाधी कथा नहीं है| कथा है भारतीय संस्कृती की उतार चढाव की|
हा आवाज होता भारतातल्या सर्वात प्रसिद्ध असा घरोघरी पोहचलेल्या Voice over कलाकार हरीश भिमानिचां होता.
तुम्ही आता इंटरनेट वर बरीच कौशल्य शिकू शकतात .इंटरनेट वर व्हिडिओजं चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.आणि इंटरनेट वापरकर्ते माहिती करता विडिओ प्राधान्याने पाहत असतात.
विडिओ बनवताना व्हॉईस ओव्हर महत्वाचा आहे.तुमच्या विडिओ चा कंटेंट कितीही चांगला असुदेत,पण तुमच्या व्हिडिओत वॊईस ओव्हर आर्टिस्ट च्या आवाजाची क्वालिटी कमी असली,तर लोक तुमचा विडिओ पाहणार नाहीत.व्यवसाय किंवा ब्रँड ला प्रमोट करण्यासाठी चांगल्या माहिती सोबत चांगला आवाज देणारा कलाकार असणे असणे गरजेचे आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट चा भारदस्त , आकर्षक आवाज असेल तर पाहणारे मन लावून ,एकाग्रतेने विडिओ मधील माहिती पाहत असतात.
ह्या लेखामध्ये आपण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.तुम्हाला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बद्दल किंचितही माहिती माहीत नसेल,तर हा लेख नक्की वाचा.
ज्यांचा आवाज गोड, आकर्षक , भारदस्त किंवा वेगळा आहे अश्या लोकांनी या संधी कडे नक्कीच seriously पाहिलं पाहिजे.
व्हॉईस ओव्हर म्हणजे काय ?
यात व्यावसायिक कारणाकरता उपयोगात येईल असा आवाज देण्याचं काम करणे .मग तर बऱ्याच प्रकारचं असू शकत ,
- नॅशनल जिग्रोफी वर मालिका मधला आवाज असो,,
- व्हिडीओ माहिती पट, गेम शो ,
- जाहिराती किंवा बरेच काही .
- पुस्तक वाचणे, audio books.
- Discovery चॅनेल वरील मालिका ,
- documentaries’ किंवा शैक्षणिक व्हिडिओ
आपण जेव्हा युट्यूब वर कोणाचीतरी डॉक्युमेंटरी, महितीपट बघतो तेव्हा कोणीतरी त्या डॉक्युमेंटरी मध्ये चांगल्या आवाजात माहिती देत असते,त्या गोड आवाजाच्या माहिती देणाऱ्याला पण पडद्या वर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणले जाते.
व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनण्यासाठी काही इन्स्टिट्यूट व्हॉइस ओव्हर चे शिक्षण देतात.तुम्हाला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनायचे असेल तर हे क्षेत्र खूप मोठे आहे तुम्ही कोणत्याही प्रकारात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करू शकता.जसे की, स्टोरी टेलिंग,नरेशन ,डबिंग,इत्यादी.
व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट कसे बनायचे ?- Voice Over Career Opportunities Marathi
- तुम्हाला जर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही दिवसात कमीतकमी 30 मिनिटे तरी पुस्तके वाचली पाहिजेत.तुम्ही नवीन प्रकरा ची पुस्तके,मॅगझीन, वर्तमानपत्र वाचली पाहिजेत.जेणेकरून तुमचा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट मधील कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल,हे तुम्हाला समजेल.
- आता नवनवीन टेक्नॉलॉजी आलीय.दररोज वाचण्याबरोबर तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकता.जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवाजातील होणाऱ्या चुका समजतील आणि नंतर तुम्ही त्या चुका दुरुस्त करू शकता.
- तुम्हाला बोलताना काही शब्द अवघड वाटत असतील किंवा काहींचा उच्चार वेगळा होत असेल तर तुम्ही त्या शब्दांची सारखे प्रॅक्टिस करा .याचबरोबर तुम्ही तोंडासंबंधी आणि श्वासासंबंधी व्यायाम केला पाहीजे.असे जर तुम्ही केले तुम्हाला काही दिवसातच तुमच्या आवाजामध्ये फरक जाणवेल.
- व्हॉइस ओव्हर स्किल शिकण्यामध्ये नकल करणे खूप महत्वाचे आहे.तुम्ही तुमच्या आवडीच्या अभिनेत्याच्या अभिनयाची नकल बरोबरच त्याच्या आवाजाची देखील नकल करा,त्याच्या बोलण्यातून उमटलेले सुख,दुःख,राग,प्रेम,हे तुमच्या बोलण्यातून उमटले पाहिजे.व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट साठी हा गुण फार महत्वाचा आहे ,कारण तुमच्या बोलण्यातून भाव उमटत नसतील, तर तुमचा आवाज एकणार्या व्यक्तीच्या मनापर्यंत तुम्ही जे बोलताय, ते कधीही जाणार नाही.पण जर तुमच्या बोलण्यातून भाव उमटत असतील तर,समोरचा ऐकणारा ही मनापासून तुमचा आवाज ऐकेल.
व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट चे ऑडिशन कसे द्यायचे ?
- आता तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे मग तुम्हाला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करण्यासाठी ऑडिशन द्यावे लागेल.तुम्ही तुमच्या आवाजाचा रेकॉर्ड केलेला विडिओ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जॉब च्या रिस्युम मध्ये देऊ शकता.
- काही अशी ही ठिकाणे असतात जिथे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट चे लाइव्ह ऑडिशन घेतले जाते.तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचे व्हॉइस ओव्हर चे ऑडिशन देऊ शकता.लाइव्ह ऑडिशन देताना तुम्हाला तुमचे स्किल सादर करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो, त्यामुळे न घाबरता ऑडिशन मध्ये तुमची कला प्रस्तुत करा .व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट साठी ऑडिशन चा कालावधी हा 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत असतो.
- शक्यतो तुम्हाला पहिल्या काही ऑडिशन मध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट चे काम मिळणार नाही.काम मिळाले नाही म्हणून थांबू नका,जोपर्यंत काम भेटत नाही तोपर्यंत ऑडिशन द्या.
- पहिल्या काही ऑडिशन मध्ये तुम्हाला आत्मविश्वासामुळे योग्यरीत्या तुमचे मत व्यक्त करता येणार नाही,जसे जसे तुम्ही जास्त ऑडिशन द्याल,तसे तसे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि ऑडिशन चा एक फायदा असा की,व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट साठी असलेल्या जॉबची जाहीरात कोणत्याही वर्तमानपत्रात येत नाही.ऑडिशन मुळे तुमची या क्षेत्रात ओळख ही वाढेल.
- तुम्ही लाईव्ह ऑडिशन व्यतिरिक्त वेबसाईटवर देखील तुमच्या ऑडिओ चा रेकॉर्ड किंवा विडिओ चे रेकॉर्ड टाकू शकता.आशा खूप साऱ्या वेबसाईट आहेत,जिथे तुम्ही तुमची माहिती आणि तुमच्या व्हॉइस ओव्हर ची रेकॉर्डिंग अपलोड करू शकता.अशा वेबसाईटवर क्लायंट येत असतात आणि त्यांना जर तुमचा आवाज आवडला,तर ते तुमच्याशी संपर्क साधतील.
- तुम्ही एका वेळी व्हॉइस ओव्हर आणि डबिंग दोन्ही काम करू शकता.तुम्हाला जंगल बुक ही मूवी माहीतच असेल,ही एक हॉलीवूड मूव्ही इंग्लिश भाषेत असून आपल्या भारतातील कलाकारांनी ही मूव्ही हिंदी मध्ये डबिंग केली आहे.आजकाल तर साऊथ मूवी,हॉलिवूड मूवी अन बॉलिवूड मूवी देखील 7 ते 8 भाषात डबिंग होत आहे,त्यामुळे भविष्यात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट चा स्कोप वाढणार आहे.
व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनण्यासाठी लागणारी पात्रता –
- व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनण्यासाठी कोणतीही पात्रता लागतं नाही पण कमीतकमी तुमचे 12 वि पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे आणि तुमचा आवाजही गोड असला पाहिजे.
- तुम्ही तुमचे व्हॉइस आर्टिस्ट स्किल वाढवण्यासाठी इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेऊ शकता.भारतामध्ये व्हॉइस ओव्हर स्किल शिकवणारे खूप इन्स्टिट्यूट आहेत.
- जसे की,भारतीय जनसंचार संस्थान ,व्हॉइस स्कुल मुंबई,झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड आर्टस्,मुंबई,एशियन अकॅडमी ऑफ फिल्म नोएडा,इत्यादी.तुम्ही गुगल वरून तुमच्या ठिकाणा जवळची व्हॉइस ओव्हर इन्स्टिट्यूट सर्च करू शकता.
व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट मध्ये सॅलरी किती मिळते ?
तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जॉब असणाऱ्या कंपनीमध्ये जॉबला लागून महिन्याला सॅलरी प्राप्त करू शकता किंवा फ्री लान्सर वेबसाईटवर क्लायंट चा प्रोजेक्ट पूर्ण करून पैसे कमवू शकता.ह्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटरी साठी 10-15मिनिटे ,जाहिरातीसाठी 1-2 मिनिटे वेळ लागतो.तुमची सॅलरी ही तुमच्या स्किल वरती आधारित आहे.तुम्हाला एका व्हॉइस ओव्हर प्रोजेक्ट साठी 10000 ते 2 लाखपर्यंत पैसे भेटू शकतात.