बॅक ऑफिसजाॅब म्हणजे काय?What are back office jobs
जेव्हा आपण बॅक ऑफिसजाॅब हे नाव कोणाच्याही तोंडुन ऐकतो तेव्हा आपल्यातील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतो की हा आॅफिसचा कुठला एक नवीन प्रकार आहे ज्याला बॅक आॅफिस म्हणतात.
बॅक ऑफिस हा ऑफिस चा कुठलाही प्रकार वगैरे नसतो हा कंपनीचा तसेच ऑफिस चाच एक महत्वाचा भाग असतो.यात कंपनीतील प्रशासन अणि समर्थन कर्मचारी (administration and support personnel) यांचा समावेश होतो.
बॅक ऑफिस वर्कर कोणाला म्हणतात?बॅक ऑफिस वर्करचे काम काय असते?
आपल्यातील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आॅफिसच्या प्रशासनाला समर्थन कर्मचारी यांना (administration) बॅक आॅफिस असे का म्हटले जाते.
फ्रंट ऑफिस वर्कर कोणाला म्हणतात? फ्रंट ऑफिस वर्करचे काम काय असते?
एका कंपनीमध्ये खुप व्यक्ती कामाला असतात ज्यात काही जण सेल्स पर्सन मार्केटिंग पर्सन म्हणून सर्विस प्रोव्हाईडर म्हणुन काम बघतात.
फ्रंट आॅफिस मध्ये काम करणारे हे व्यक्ती कस्टमरशी समोरासमोर बसुन संवाद साधत असतात.चर्चा करीत असतात अणि कंपनीतील प्रोडक्ट सर्विसेसच्या सेलिंग आणि मार्केटिंगचे काम करीत असतात.म्हणुन कंपनीतील अशा कर्मचारी वर्गाला front office workers असे संबोधिले जाते.फ्रंट ऑफिसचा मुख्य हेतु हा कंपनीच्या महसुलात वाढ करणे हा असतो.
बॅक ऑफिस वर्कर कोणाला म्हणतात?बॅक ऑफिस वर्करचे काम काय असते?
कंपनीत कामाला असलेले बाकीचे इतर व्यक्ती जे कंपनीत आत बसुन पेपर वर्कचे काम करत असतात.कस्टमरच्या समोर जाऊन त्यांच्याशी समोरासमोर बसुन संवाद वगैरे साधत नसतात.कंपनीचे प्रोडक्ट सर्विस यांची सेलिंग मार्केटिंग वगैरे इत्यादी बाहेरची कामे करीत नसतात.
अशा कंपनीत काम करत असलेल्या आतील कर्मचारी वर्गाला back office workers असे म्हटले जाते.बॅक आॅफिसचा मुख्य हेतु कंपनीचा खर्च कमी करणे हा असतो.
हे बॅक आॅफिस वर्कस कंपनीच्या आॅफिसमधील आतील भागात बसुन डेटा एन्ट्री करणे, डेटा अपडेट करणे,डाॅक्युमेंट टाईप करणे,डेटा स्टोअर करण्याचे,डेटाचा रेकाॅर्ड जमा करण्याचे,डेटा रिस्टोअर करण्याचे तसेच डेटा मॅनयुफॅक्चरींग,अकाउंटिंग वगैरेचे काम करत असतात.
बॅक ऑफिस वर्कस कोणकोणते काम करीत असतात?
कोणत्याही गोष्टीचा निपटारा करणे,नोंदी ठेवणे,क्लिअरन्स करणे,अकाउंटिंग करणे इत्यादी आयटीशी संबंधित सर्व कामे बॅक आॅफिस वर्कस करीत असतात.
कंपनीतील ऑपरेशनशी संबंधित जेवढीही कामे असतात ते कंपनीतील बॅक ऑफिस कर्मचारी दवारे केली जातात.कंपनीतील अॅडमिनिस्ट्रेशन फंक्शनस हाताळण्याचे काम बॅक आॅफिस करत असते.
बॅक आॅफिस वर्कसचे मुख्य काम हे कंपनीतील रोजच्या अॅडमिनिस्ट्रेशन प्रोसेस कडे लक्ष देणे हे असते जेणेकरून कंपनीचा उद्योग व्यवसाय सुरळीतपणे चालेल.बॅक आॅफिस हे फ्रंट आॅफिस सोबत योग्यरीत्या समन्वय साधत आपले काम पुर्ण करीत असते.
कोणत्या क्षेत्रात बॅक ऑफिस मध्ये करीअर बनवता येते?
आपण खालील दिलेल्या क्षेत्रात बॅक ऑफिस मध्ये आपले चांगले करिअर घडवू शकतो.
१)आयटी क्षेत्र
२) अकाउंटिंग क्षेत्र
३) काॅल सेंटर
४) एच आर एम (human resource management)
5) हाॅस्पिटल्स
बॅक ऑफिस जाॅब प्राप्त करण्यासाठी आपल्यात कोणते कला कौशल्य गुण असणे आवश्यक आहे?
भारतात कुठेही बॅक आॅफिस मध्ये जाॅब प्राप्त करण्यासाठी आपणास मराठी सोबत हिंदी अणि इंग्रजी भाषेचे देखील चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
आपल्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे संगणक हाताळता येणे गरजेचे आहे.संगणकावर वेगाने टाईप करण्याची सवय असायला हवी.म्हणजे आपला टायपिंग स्पीड देखील बरा असायला हवा.
संगणकाचा एखादा चांगला शासनमान्य कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
एम एस वर्ड अणि एक्सेल मध्ये आपली चांगली कमांड असायला हवी.
आपली भाषाशैली देखील सौम्य स्वरूपाची असावी.
आपण चांगल्या गुणांनी इंटरमिजिएट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याचसोबत आपणास बॅक आॅफिस मध्ये काम करण्याचा किमान तीन चार वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
बॅक ऑफिस मध्ये किती वेतन प्राप्त होते?
बॅक आॅफिस वर्कमध्ये फ्रेशर्सला १५ ते २० हजार इतके मासिक वेतन दरमहा साधारणत दिले जाते.
पण समजा आपल्याला बॅक आॅफिस कामाचा चांगला अनुभव असेल,आपल्या अंगात उत्तम स्कील असेल अणि आपले शिक्षण देखील चांगले झाले असेल तर ह्या कामात आपणास २५ ते ३० हजारांपर्यंत वेतन सहजपणे प्राप्त होते.