महिलांसाठी 14 सर्वोत्तम नोकरीअणि करीअरचे पर्याय – 14 Best jobs and career options for women in 21 century in Marathi

21 व्या शतकातील महिलांसाठी 14 सर्वोत्तम नोकरया अणि करीअरचे पर्याय 14 Best jobs and career options for women in 21 century in Marathi

आजच्या लेखात आपण महिलांसाठी सर्वोत्तम असलेल्या जाॅब तसेच करीअर आॅप्शन विषयी थोडक्यात माहिती जाणुन घेणार आहोत.

हे काही असे करीअर आॅप्शन आहेत ज्यात महिला आपले चांगले करिअर घडवू शकतात.

1) Entrepreneurship – उद्योजकता

सध्या बाजारात आपणास जागोजागी नवनवीन महिला उद्योजक निर्माण होताना दिसुन येत आहेत.आज महिला पुरूषांच्या बरोबरीने उद्योग क्षेत्रात आपले नाव कमवताना दिसुन येत आहेत.

उद्योजकते मध्ये मोजकेच जोखीम घेणे,लोकांना समजुन घेणे,लोकांच्या समस्या सोडवणे,त्यांना ध्येयाबाबद योग्य ते मार्गदर्शन करणे आहे अणि ह्या सर्व कला कौशल्यात स्त्रिया अत्यंत निपुण असतात.

आज छोट मोठे दुकान चालवण्यापासुन मोठमोठ्या आयटी कंपनी स्टार्ट अप उद्योग व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात महिला उद्योजक दिसुन येत आहेत.

आज सरकार देखील देशात महिला उद्योजकांचे प्रमाण वाढावे म्हणून महिलांना उद्योग व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे.

भारत सरकारच्या सुक्ष्म,लघु,मध्यम मंत्रालयाच्या तर्फे विशेषकरून महिलांमधील उद्योजकता वाढीस लागावी म्हणून उद्यम सखी हे पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे.

आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य प्राप्त करण्यासाठी प्रत्येक महिला ह्या पोर्टलचा वापर करू शकते.

२) Career counselling – करिअर समुपदेशन

करिअर काऊन्सिलिंग हा देखील महिलांसाठी करीअरचा एक उत्तम पर्याय आहे.

यात आपणास विद्यार्थ्यांना शिक्षणात करिअरमध्ये गाईडन्स करायचे असते.विदयार्थ्यांना आपला यशाचा मार्ग शोधता यावा तो गाठता यावा यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे,मदत करण्याचे काम करीअर काऊंसिलर करत असते.

आज विविध करिअर समुपदेशन संस्था,शाळा अणि एनजीओ मध्ये विद्यार्थ्यांना करीअर गाईडन्स करण्यासाठी करीअर समुपदेशक म्हणून नोकरी महिला करू शकतात.

विद्यार्थ्यांना त्यांची आवड निवड लक्षात घेऊन ते कशात चांगले आहेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार शैक्षणिक पात्रतेनुसार,त्यांच्या अंगी असलेल्या कला कौशल्यानुसार त्यांनी कोणते क्षेत्र करिअरसाठी निवडायला हवे.

कोणते क्षेत्र त्यांच्यासाठी एकदम योग्य अणि उत्तम आहे याविषयी मार्गदर्शन करण्याचे काम करीअर काऊंसिलरचे असते.

३) Teaching -शिक्षिका बनुन मुलांना शिकवणे

ज्या महिलांचे एम ए,बीएड डीएड वगैरे झाले आहे अशा महिलांसाठी टिचिंग हा देखील उत्तम करीअरचा पर्याय आहे.

Best jobs and career options for women

टिचिंग हे एक असे प्रोफेशन आहे ज्यात विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम करत असतो.देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी येणारया आपल्या भावी पिढीला घडविण्याचे काम शिक्षक करतात.

See also  LIC जीवन आझाद पॉलिसी २०२३ विषयी माहिती - Lic jeevan Azad policy 2023 information in Marathi  

यात महिला एखाद्या सरकारी किंवा खाजगी शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षिका म्हणून नोकरीला लागु शकतात.

इथे जवळपास ३५ हजार ते एक लाखापर्यंत वेतन आपण प्राप्त करू शकतो.पण आपल्या अनुभवानुसार पात्रतेनुसार पदानुसार आपले वेतन ठरविण्यात येत असते.ह्या प्रोफेशन मध्ये वेतन देखील चांगले मिळत असते.

समजा आपण एम फिल पीएचडी केली तसेच सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झालो तर प्रोफेसर बनुन आपणास महाविद्यालयात अध्यापनाचे काम करता येते.

एवढेच नव्हे तर महिला एखाद्या कोचिंग क्लासेस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.किंवा स्वताचे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस देखील सुरू करू शकतात.लहान मुलांना घरबसल्या ट्युशन देण्याचे काम करता येते.

यावरून आपणास लक्षात येईल टिचिंग हे निःसंशयपणे महिलांसाठी करीअरचा एक उत्तम पर्याय आहे.

४) आरोग्यसेवा तसेच औषध क्षेत्रात महिलांसाठी असलेले बेस्ट करीअर आॅप्शन –

स्त्रिया ह्या जन्मतःच एकदम काळजीवाहू केअरींग अणि समजुतदार स्वभावाच्या असतात.म्हणुन आरोग्य सेवा ह्या क्षेत्रात आज अशा काही नोकरया आहेत जिथे पुरूषांना नव्हे फक्त महिलांनाच विशेष प्राधान्य दिले जाते.

Best jobs and career options for women

उदा,स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट इत्यादी.हया आरोग्य सेवेतील अशा नोकरी आहेत ज्यात महिलांना करिअरच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेल्थ केअर क्षेत्रात देखील महिलांसाठी भरपुर करीअर आॅप्शन नोकरीच्या संधी आहेत.ज्यात प्रसुती अणि स्त्रीरोग क्षेत्रातील फिजिशियन सल्लागार फिजिशियन यांचा विशेष समावेश होतो.

५) मानव संसाधन विभाग ह्या क्षेत्रात महिलांसाठी असलेले बेस्ट करीअर आॅप्शन – HUMAN RESORCE

ज्या महिलांना काॅर्पोरेट क्षेत्रात काम करण्याची इच्छा तसेच आवड आहे.अणि त्यांना लोकांच्या त्यांच्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी मदत करायला आवडते अशा महिलांसाठी हे एक बेस्ट करीअर आॅप्शन आहे.

यात महिलांना एमबीए तसेच पीजीडीएम देखील करता येते.

योग्य त्या उमेदवारांची निवड करणे, यानंतर निवड केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांना नोकरीवर नियुक्त करणे कामाचे प्रशिक्षण देणे,एवढेंच नव्हे तर कर्मचारी वर्गाचे वेतन ठरवणे,त्यांच्या समस्या दुर करणे सोडवणे, नवनवीन धोरणे तयार करणे

ही सर्व कामे मानव संसाधन विभागात कामाला असलेल्या कर्मचारी वर्गाला करावी लागत असतात.

६) फायनान्स अणि बॅकिंग क्षेत्रात महिलांसाठी असलेले बेस्ट करीअर आॅप्शन –

फायनान्स अणि बॅकिंग क्षेत्र देखील महिलांसाठी करीअरचा उत्तम पर्याय आहे.

फायनान्स अणि बॅकिंग ह्या सेक्टर मध्ये करीअर करण्यासाठी आवश्यक असलेली दोन महत्वाची कौशल्ये महिलांमध्ये नैसर्गिकरीत्या असतात.ती कौशल्ये म्हणजे संयम ठेवणे patience अणि लोक व्यवस्थापन करणे people management skills होय.

See also  एमटी वासुदेवन नायर यांना केरळचा सर्वोच्च नागरी सन्मान

म्हणुन फायनान्स अणि बॅकिंग क्षेत्रात स्त्रिया उत्तम कामगिरी पार पाडू शकतात.

फायनान्स अणि बॅकिंग क्षेत्रात महिलांसमोर करीअरचे विविध पर्याय उपलब्ध आहेत जसे की फायनान्शिअल अॅनॅलिस्ट,रिलेशनशिप मॅनेजर,सनदी लेखापाल म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटंट,कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह.

७) न्युट्रीशन फिटनेस क्षेत्रात महिलांसाठी असलेले बेस्ट करीअर आॅप्शन –

कोरोना सारख्या नवनवीन महामारी तसेच आरोग्य विषयक उदभवत असलेल्या नवनवीन समस्या जसे की ताणतणाव डिप्रेशन,वाढता लठ्ठपणा, वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक मानसिक विकार इत्यादी मुळे तंदुरुस्त अणि निरोगी शरीर ठेवण्याबाबत लोकांमध्ये जागृकता अधिक प्रमाणात वाढते आहे.

ज्याचे परिणाम स्वरुप पोषण,आहारशास्त्र फिटनेस,योगा इत्यादी क्षेत्रात करिअरच्या संधी देखील झपाट्याने वाढत आहे.

ह्या क्षेत्रात महिला डायटेशिअन,न्युट्रीशिअनिस्ट,फिटनेस तसेच योगा प्रशिक्षक अशा विविध क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात.

८) समाजकार्य क्षेत्रात महिलांसाठी असलेले बेस्ट करीअर आॅप्शन –

ह्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी आपल्या मनात इतरांच्या विषयी सहानुभूतीची भावना असायला हवी.वेगवेगळया गट तसेच समुहाच्या तसेच समाजातील महिलांच्या अडचणींचे समस्यांचे देखील आपणास ज्ञान असणे आवश्यक आहे.

समाजकार्य क्षेत्रात महिलांसाठी असलेले बेस्ट करीअर आॅप्शन पुढीलप्रमाणे आहेत –

  • सामाजिक कार्यकर्ता
  • प्रकल्प सहाय्यक
  • प्रकल्प समन्वयक
  • मानसोपचार / मानसिक आरोग्य सामाजिक कार्यकर्ता

९) इंटेरियर डिझाईनिंग –

महिला वर्ग आपल्या स्वताच्या घराच्या आतील सर्व साज सजावटीपासुन ते रूम सेट करण्यापर्यंत सर्व बाबतीत एकदम नियोजन बदध असतात.स्त्रियांना डिझाईन सौंदर्यशास्त्राची अधिक जाणीव अणि नाॅलेज असते.

ह्या क्षेत्रात आवश्यक असलेली सर्व कौशल्ये महिलांमध्ये नैसर्गिकरीत्या असल्याने महिलांना ह्या क्षेत्रात करीअरची उत्तम संधी आहे.

ज्या महिलांना ह्या क्षेत्रात करीअर करायचे आहे ज्या महिलांना आपल्या सर्जनशीलतेचा वापर प्रोडक्टिव्ह फॅशन करीता करायचा आहे.अशा महिलांकरिता ह्या क्षेत्रात विपुल प्रमाणात करिअरच्या संधी आहेत.

ह्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी आपणास इंटेरियर डिझाईनिंगचा कोर्स तसेच डिप्लोमा करणे आवश्यक आहे.

यात महिलांना एखाद्या मोठ्मोठया प्रशस्त कंपनीत नोकरी करण्याची संधी प्राप्त होते.किंवा महिलांना यात स्वताचा उद्योग व्यवसाय देखील सुरू करता येतो.

१०) आयटी क्षेत्रात महिलांसाठी असलेल्या करिअरच्या संधी –

ज्या महिलांना कंप्युटरची आवड आहे अणि त्यांना आयटी क्षेत्रात आपले उत्तम करीअर घडवायचे आहे अशा महिलांना माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात अणि कंप्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

ह्या क्षेत्रात महिला आयटी साॅफ्टवेअर इंजिनियर,साॅफ्टवेअर डेव्हलपर,साॅफ्टवेअर टेस्टर,बिझनेस तसेच डेटा अॅनॅलिस्ट,सायबर सिक्युरिटी अॅनेलिस्ट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर इत्यादी पदावर काम करू शकतात.

See also  महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 भरती - Mpsc Combine Bharti 2023 In Marathi

११) पत्रकारिता क्षेत्रात महिलांसाठी असलेल्या करिअरच्या संधी –

ज्या महिलांचे संवाद कौशल्य उत्तम आहे अणि त्यांचा स्वभाव निर्मितीशील सर्जनशील आहे अशा महिलांसाठी मिडिया तसेच पत्रकारिता क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

पत्रकारितेच्या क्षेत्रात महिला रिपोर्टर,कंटेट रायटर,काॅपी राईटर,एडिटर इत्यादी पदावर काम करू शकतात.

१२) फॅशन डिझायनिंग –

ज्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल कपडे डिझाईन करायला आवडते.अशा महिलांसाठी फॅशन डिझायनिंग हे करीअरचे बेस्ट आॅप्शन आहे.

फॅशन डिझायनिंग मध्ये महिला नोकरी देखील करू शकतात किंवा स्वताचा व्यवसाय देखील सुरू करू शकता.यासाठी महिलांना फॅशन डिझायनिंगचा कोर्स किंवा डिप्लोमा करणे आवश्यक आहे.

१३) मेक अप आर्टिस्ट –

आजकाल प्रत्येक महिलेला आपण इतरांपेक्षा अधिक सुंदर दिसावे असे वाटते.

मेक अप आर्टिस्ट हे एक असे करीअर आॅप्शन आहे ज्यात आपण महिलांना सुंदर बनवून पैसे कमावू शकता ह्या क्षेत्रात करीअर करू शकतात.आज अनेक महिला तसेच पुरूष सुंदर दिसण्यासाठी मेकअप आर्टिस्टची मदत घेत असतात.

कोणाच्या चेहर्यावर कसा मेक अप सुट करेल एखाद्याचा चेहरा सुंदर दिसण्यासाठी त्याचा कसा मेक अप करायचा हे मेक अप आर्टिस्टला उत्तम प्रकारे माहीत असते.

मेक आर्टीस्ट बनण्यासाठी आपणास कोणत्या चेहऱ्यावर कोणता मेक अप सुट करेल याचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणते काॅसमेटिक अधिक योग्य आहेत याचे देखील ज्ञान असणे आवश्यक आहे.

मेक अप आर्टिस्ट बनण्यासाठी आपणास मेक अप आर्टिस्टचा कोर्स तसेच डिप्लोमा करणे आवश्यक आहे.

१४) कंटेट क्रिएटर-

ज्या महिलांना कुठल्याही एका क्षेत्राचे उत्तम नाॅलेज आहे अशा महिला कुठल्याही एका विशिष्ट विषयावर स्वताचे युटयुब चॅनल तसेच ब्लाँग सुरू करून कंटेट क्रिएटर म्हणून आपले उत्तम करीअर घडवू शकतात.

आज अनेक महिला आपल्या अंगी असलेल्या पाककलेचा तसेच इत्यादी अनेक कला कौशल्याचा वापर करून युटयुब दवारे लाखोची कमाई करत आहे.

Best jobs and career options for women

यात आपल्याला ज्या क्षेत्राचे उत्तम नाॅलेज आहे अशा क्षेत्राविषयी इतरांना माहीती द्यायची असते.मग ते कुकिंग असो शिवणकाम विणकाम असो किंवा इतर कुठलेही काम असो.

ज्यात आपण निपुण आहे त्याचे इंटरनेट द्वारे इतरांना नाॅलेज देण्याचे काम आपणास करायचे आहे.कंटेट क्रिएटर बनल्यावर आपणास नाव पैसा प्रसिद्धी ह्या सर्व गोष्टी प्राप्त होतात.