Webinar म्हणजे काय ? What is a webinar information in Marathi

वेबिनार विषयी माहीती   – What is a webinar information in marathi

आज मोबाईल इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण जागोजागी दिवसेंदिवस अधिक वाढत चालले आहे.

इंटरनेटचा वापर आपण आत्तापर्यत आपल्याला हवी असलेली माहीती प्राप्त करण्यासाठी आणि युटयुबवर साँग,मुव्हीचे व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी,

आँनलाईन पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी करत आलो आहोत.

पण याचसोबत जसे शाळेत सर्व विदयार्थ्यांच्या, शिक्षकांच्या उपस्थितीत विविध सेमिनार आयोजित केले जात असतात.

एकदम त्याचप्रमाणे आज इंटरनेटवर देखील आँनलाईन पदधतीने एक मिटिंग आयोजित केली जात असते ज्याला इंटरनेटच्या भाषेत वेबिनार असे म्हटले जाते.

आणि जेव्हापासुन देशात कोरोनाचे रूग्ण वाढु लागले तेव्हापासुन सोशल डिस्टंटसिंगचे पालन करून आपले उद्योग,व्यवसाय चालवण्यासाठी तसेच विदयाथ्यांना शाळा काँलेजात न जाता आँनलाईन घरबसल्या शिकवण्यासाठी,शालेय तसेच महाविद्यालयीन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी झुम मिटिंग,गुगल मीट सारख्या वेगवेगळया व्हिडिओ काँन्फरसिंग अँपचा वापर केला जाऊ लागला.

तेव्हापासुन वेबिनार हा शब्द खुप प्रचलित झालेला आपणास दिसुन येतो.

आजच्या लेखात आपण ह्याच वेबिनारविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

वेबिनार म्हणजे काय? What is a webinar information in Marathi

वेबिनार एक आँनलाईन पदधतीने आयोजित केली जाणारी व्हिडिओ काँन्फरसिंगची मिटिंग असते.

ज्या पद्धतीने  शाळा काँलेजात जसे तसेच विशेष प्रसंगी मिटिंग आयोजित केल्या जात असतात.त्याचप्रकारची वेबिनार देखील एक आँनलाईन पदधतीने आयोजित केली जाणारी व्हिडिओ काँन्फरसिंगची मिटिंग असते.

See also  ब्रिजिंग लोन म्हणजे काय? - Bridging loan meaning in Marathi

 

वेबिनार हा एक प्रकारचा विशेष कार्यक्रम तसेच प्रक्षिक्षण शिबीर असते ज्यात आपण आपला मिटिंग आयडी टाकुन आपल्या अँड्राईड मोबाईल वरून देखील सहभागी होऊ शकतो.

 

आज वेगवेगळया शाळा,तसेच काँलेजातील विविध कार्यक्रमाचे आँनलाईन वेबिनार आयोजित केले जात असतात.ज्यात होस्ट हा बोलत असतो आणि बाकीचे आँडियन्स तो काय बोलतो आहे हे ऐकत असतात.

वेबिनारचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात? types of webinar

 वेबिनार हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात.

1)लाईव्ह वेबिनार :

2) रेकाँर्ड केलेला वेबिनार :

 

1)लाईव्ह वेबिनार :ह्या प्रकारच्या वेबिनारमध्ये एक किंवा दोन तीन होस्ट असतात जे इंटरनेटचा वापर करून व्हिडिओ काँन्फरसिंगद्वारे आपल्या आँडियन्ससमोर लाईव्ह येत असतात.

अशा प्रकारच्या वेबिनारमध्ये आँनलाईन क्लासेस,बिझनेस मिटिंग,तसेच ट्रेनिंग मिटिंग इत्यादींचा समावेश होत असतो.

2) रेकाँर्ड केलेला वेबिनार :

 ह्या प्रकारच्या वेबिनारमध्ये होस्ट लाईव्ह येत नसतो तर तो आपला व्हिडिओ आधीपासुन रेकाँर्ड करून चांगल्या पदधतीने एडिट करून ठेवत असतो.आणि मग हा व्हिडिओ वेबिनारमध्ये आँडियन्ससमोर पब्लिश करत असतो.

रेकाँर्ड वेबिनारमध्ये शाळा काँलेजातील महत्वाचे लेक्चर व्हिडीओ,महत्वाची स्पीच,मिटिंग इत्यादींचा समावेश होत असतो.

वेबिनार आयोजित करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? Requirements for webinars to work defectively ?

 

आँनलाईन वेबिनार आयोजित करण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टींची आवश्यकता असते.

1)चांगले इंटरनेट कनेक्शन

2) अँड्राईड मोबाईल,लँपटाँप किंवा कंप्युटर

3)वेबिनारसाठी एक प्लँटफाँर्म (गुगल मीट,झुम अँप)

4) प्रेंझेटेशन तयार करण्यासाठी चांगले प्रेझेंटेशन साँफ्टवेअर

Webinar Marketing Tools: An Uncommon Resource Guide to Reporting, Analytics, and Testing Strategies to Guarantee a Killer Webinar Kindle Edition

 

आँनलाईन वेबिनार कसे आयोजित केले जातात? How to create a webinar

 

  • आँनलाईन वेबिनार आयोजित करण्यापुर्वी जो होस्ट असतो ज्याला एखाद्या विषयावर आँडियन्ससमोर बोलायचे असते त्याने त्याला ज्या विषयावर बोलायचे त्या विषयावर लाईव्ह बोलण्याची चांगली पुर्वतयारी करायला हवी.
See also  Discount Broker की Full Service Broker कोणता निवडावा: शेअर मार्केट  ? Difference in discount broker and full service broker

 

  • किंवा याचठिकाणी तो आपल्या स्पीचची रेकाँर्डिंग देखील करू शकतो.आणि तीच रेकाँर्ड केलेली स्पीच वेबिनारमध्ये पब्लिश करू शकतो.

 

  • याने आपल्याला कंटेट बनववायला एकदम सोपे जात असते पण याचा एक ड्राँ बँक देखील असतो आँडियन्सला वेबिनार ऐकताना काही प्राँब्लेम देखील येण्याची शक्यता असते.

 

  • आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही वेबिनार आयोजित करण्यासाठी आपण अशा मोबाईल डिव्हाईसेसचा वापर करायला हवा ज्यात कँमेरा आणि मायक्रोफोनची सुविधा असते.

 

  • याचसोबत वेबिनारला बसण्यासाठी आपण अशी जागा निवडायला हवी जिथे चांगला प्रकाश असेल आणि आपल्या आजुबाजुला जास्त गर्दी गोंगाट देखील नसावा.कारण याने आपल्याला वेबिनार देत असताना डिस्टर्ब होण्याचे चान्सेस फार कमी असतात.

 

  • आणि ज्यांना वेबिनार अटेंड करायचा असतो त्यांच्याकडे एक अँड्राईड मोबाईल,लँपटाँप किंवा कंप्युटर असणे गरजेचे असते.आणि त्यात चांगले इंटरनेट कनेक्शन असावे लागते.ज्याने वेबिनार सुरू असताना मध्येच आपले नेट बंद पडणार नाही.आणि आपल्याकडुन वेबिनारमधील एखादा महत्वाचा पार्ट मिस होणार नाही.

 

  • याचसोबत आपल्या अँड्राईड मोबाईल तसेच लँपटाँप,कंप्युटरमध्ये वेबिनार अटेंड करण्यासाठी एक वेबिनारचे गुगल मीट,तसेच झुम अँप सारखे साँफ्टवेअर देखील असावे लागते.

 

  • वेबिनार साँफ्टवेअरचा वापर करून आपण व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे आँनलाईन क्लासेस घेऊ शकतो,एखादी बिझनेस मिटिंग तसेच आँफिस स्टाफला कामाचे प्रक्षिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग मिटिंग घेऊ शकतो.

 

वेबिनारचे फायदे कोणकोणते असतात? Advantages  of webinar

 

  • वेबिनार मिटिंग मध्ये गृपमध्ये किंवा पर्सनली मँसेज टाकुन आपले प्रश्न विचारण्याची सुविधा दिलेली असते.

 

  • वेबिनार मध्ये आपल्याला डायरेक्ट होस्टशी बोलता येत असते.यासाठी रिअल टाईम मधील व्हाँईस चँट ह्या आँप्शनचा वापर देखील आपण करू शकतो.

 

  • वेबिनार हे रेकाँर्ड केले जाऊ शकते आपल्या मोबाईल डिव्हाईसवर सेव्ह देखील केले जाऊ शकते.याचा फायदा असा होतो की आपण रेकाँर्ड तसेच सेव्ह केलेले व्हिडिओ कधीही ऐकु तसेच बघु शकतो.
See also  युपीआय पिन म्हणजे काय? UPI pin meaning in Marathi

 

  • जो वेबिनार आयोजन कर्ता असतो तो आपल्या लँपटाँप तसेच कंप्युटरची स्क्रीन वेबिनारमध्ये आँडियन्ससोबत शेअर करू शकतो यात तो एखादी स्लाईड दाखवू शकतो त्याचे तयार केलेले प्रेझेंटेशन शेअर करू शकतो.

 

  • वेबिनारसाठी कोणत्याही विशिष्ट हाँल तसेच जागेची आवश्यकता नसते यामुळे आपल्याला हाँल बुक करण्यासाठी जो खर्च करावा लागत असतो तो देखील वाचतो.

 

सेमिनार आणि वेबिनारमध्ये काय फरक असतो?

 

  • सेमिनार हा एक शाळा,काँँलेजात एखाद्या हाँलमध्ये आँफलाईन आयोजित केला जाणारा कार्यक्रम असतो.तर याच ठिकाणी वेबिनार हा आँनलाईन इंटरनेटच्या माध्यमातुन आयोजित केला जाणारा कार्यक्रम असतो.

 

  • सेमिनारमध्ये आयोजक,मुख्य अतिथी,श्रोते हे सर्व एकाच ठिकाणी म्हणजे समोरासमोर उपस्थित असतात.आणि सेमिनारमधील सर्व कार्यक्रम प्रेक्षकांच्या उपस्थितीत म्हणजेच डोळयासमोर पार पडत असतो.

 

पण वेबिनारमध्ये आयोजक मुख्य अतिथी आणि श्रोते हे सर्व वेगवेगळया ठिकाणी बसुन कार्यक्रम अटेंड करतात.वेबिनारमधील सर्व कार्यक्रम हा आँडियन्सच्या फिजीटल प्रेझेंटीमध्ये आयोजित केला जात नसतो.आँडियन्स अप्रत्यक्षपणे यात व्हिडिओ काँनफरन्सिंगद्वारे सहभागी होत असते.

 

  • सेमिनार आयोजित करण्यासाठी शाळा काँलेजात एक विशिष्ट हाँल असतो जिथे हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत पार पडत असतो.

 

वेबिनारसाठी कोणत्याही विशिष्ट हाँल तसेच जागेची आवश्यकता नसते कारण हा कार्यक्रम आँनलाईन इंटरनेटच्या माध्यमातुन पार पडत असतो.

50 अतिशय महत्वाच्या वेबसाईट – ऑनलाइन कामात ज्ञान व कौशल्य वाढवण्यास मदतीकरता