Table of Contents
कंटेट मार्केटिंग :
आज डिजीटल क्रांतीच्या ह्या जगतात सर्व काही डिजीटल झाले आहे.शिक्षणापासुन तर वस्तुंची खरेदी विक्रीपर्यत आज सगळेच आँनलाईन झाले आहे.आपल्याला एखादी माहीती हवी असेल तर आपण तात्काळ गुगल तसेच युटयुबवर सर्च ती माहीती घरबसल्या एका जागी बसुन प्राप्त करू शकतो.त्यासाठी आता आपल्याला कोणत्याही ग्रंथालयात वगैरे जाऊन पुस्तके वाचण्याची गरज नाहीये.कारण आज सर्व पुस्तके सुदधा आज आपल्यासाठी आँनलाईन उपलब्ध झालेली आहेत.
कंटेंट म्हणजे काय ? –
कंटेंट म्हणजे साहित्य किंवा सामुग्री जसे ज्ञानवर्धक लिखित माहिती, संदेश , मजकूर, फोटो , व्हिडिओ किंवा ऑडिओ जी विश्वासार्ह आकर्षक व समर्पक स्वरूपात लोकांसमोर मांडली जाते.
अणि आपण गुगलवर युटयुबवर जी ही माहीती वाचत तसेच ऐकत असतो.ती माहीती आपल्याला कंटेटच्या स्वरुपात प्राप्त होत असते.म्हणजेच आज आपण आँनलाईन जे वाचतो,ऐकतो,तसेच बघतो त्या सगळयांमध्ये एक कंटेट असतो.यावरून आपल्याला समजुन येते की आज आँनलाईन डिजीटल जगतात कंटेटला किती अधिक महत्व आहे तसेच किती अधिक प्रमाणात त्याची मागणी आहे.अणि हेच असे कंटेट तयार करून त्यांना आपल्या टार्गेट आँडियन्सपर्यत आँनलाईन पोहचवण्याचे काम कंटेट मार्केटर हा करत असतो.
म्हणुनच आजच्या ह्या लेखात आपण कंटेट मार्केटिंगविषयी जाणुन घेणार आहोत की कंटेट मार्केटिंग म्हणजे नेमके काय असते?त्याचे महत्व काय आहे?कंटेट मार्केटिंगची कोणकोणती उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळतात.अणि कंटेट मार्केटिंग करण्याचे फायदे कोणकोणते आहे?इत्यादी सर्व काही आपण आजच्या ह्या लेखात जाणुन घेणार आहोत.
- कंटेट मार्केटिंग म्हणजे काय?
- कंटेट मार्केटिंग का महत्वाची आहे?
- कंटेट मार्केटिंगची उदाहरणे कोणकोणती?
- कंटेट मार्केटिंगचे फायदे कोणकोणते आहेत?
- कंटेट मार्केटिंग म्हणजे काय?
कंटेट मार्केटिंग म्हणजे काय?
कंटेट मार्केटिंग ही एक मार्केटिंगची एक अशी पदधत आहे.ज्यात आपण कंटेट तयार करून तो आँनलाईन
प्रकाशित करत असतो.त्याचे वितरण करत असतो.आपण बनवलेला कंटेट आपल्या टार्गेट कस्टमरपर्यत पोहचण्यासाठी त्याची मार्केटिंग देखील यात कंटेट मार्केटर करत असतो.यालाच कंटेट मार्केटिंग असे म्हणतात.
कंटेट मार्केटर हा आपल्या कंटेटची मार्केटिंग ही आँनलाईन पदधतीने सोशल मिडिया माध्यमांदवारे तसेच वेबसाईटदवारे करत असतो.जेणेकरून त्याने बनवलेला कंटेट त्याच्या टार्गेट कस्टमर तसेच आँडियन्सपर्यत पोहचेल.
कंटेट मार्केटिंग का महत्वाची आहे?
आपण जो कंटेट तयार करत असतो तो कंटेट फक्त तयार करणे महत्वाचे नसते तर तो कंटेट आपल्या टार्गेट आँडियन्सपर्यत पोहचणे देखील गरजेचे असते.कारण आपण ज्यांच्यासाठी तो कंटेट तयार केला आहे त्याच्यापर्यतच तो कंटेट पोहचत नसेल तर मग त्या कंटेटचा काहीच उपयोग होत नसतो.
कारण अशा प्रकारचा कंटेट मार्केटमध्ये उपलब्ध आहे याची माहीतीच आँडियन्सला नसते तर मग ते आपला कंटेट बघणार तरी कसे अणि तो त्यांच्यापर्यत जाणार तरी कसा?म्हणुन आपण तयार केलेला कंटेट आपल्या टार्गेट कस्टमरपर्यत तसेच आँडियन्सपर्यत पोहचण्यासाठी कंटेट मार्केटरने त्याची सोशल मिडियाद्वारे मार्केटिंग करणे महत्वाचे असते.
कंटेट मार्केटिंगची उदाहरणे कोणकोणती?
आज आँनलाईन प्रत्येक ठिकाणी आपल्याला कंटेटची आवश्यकता असते.मग तो आपला स्वताचा ब्लाँग किंवा वेबसाईट असो किंवा सोशल मिडिया तसेच डिजीटल मार्केटिंगचे कोणतेही काम असो आज प्रत्येक ठिकाणी कंटेटला फार महत्व आहे.
म्हणुनच आज कंटेटला मार्केटचा किंग असे देखील संबोधिले जाते.अणि ह्याच कंटेटची वेगवेगळी उदाहरणे आज आपण जाणुन घेणार आहोत.
कंटेट मार्केटिंगची उदाहरणे : What is content marketing in Marathi
1) इन्फोग्राफिक्स :यात कंटेट मार्केटर हा ग्राफिक्सच्या माध्यमातुन काहीतरी महत्वाची माहीती आपल्या टार्गेट आँडियन्सपर्यत पोहचवत असतो.तसेच एखाद्या कंपनीच्या प्रोडक्टसची,सर्विसेसची मार्केटिंग,प्रमोशन देखील तो करत असतो.
2) टेक्स्ट : यात कंटेट मार्केटर एखाद्या प्रोडक्ट तसेच सर्विसची माहीती,प्रमोशन,मार्केटिंग तसेच इतर कोणतीही माहीती टेक्सच्या माध्यमातुन आपल्या टार्गेट आँडियन्सला देत असतो.यात हाऊ टु प्रकारचे कंटेट तसेच इन्फरमेटिव्ह कंटेट यांचा देखील समावेश असतो.जे ब्लाँग तसेच वेबसाईटवर जास्तीत जास्त प्रमाणात आपणास पाहावयास मिळतात.
3) आँडिओ : यात कंटेट मार्केटर हा आँडिओ म्हणजेच पाँडकास्टच्या माध्यमातुन एखादा कंटेट आपल्या टार्गेट आँडियन्सपर्यत पोहचवत असतो.अशा प्रकारच्या कंटेटमध्ये ओडिओ बुक,आँडिओ म्युझिक इत्यादींचा समावेश होत असतो.
4) व्हिडिओ :यात कंटेट मार्केटर हा व्हिडिओच्या माध्यमातुन आपल्या टार्गेट आँडियन्सपर्यत कंटेटच्या स्वरुपात एखादी महत्वाची माहीती पोहचवत असतो. तसेच एखाद्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची मार्केटिंग,प्रमोशन देखील करत असतो.
5) ईमेजस : या प्रकारच्या कंटेटमध्ये वेगवेगळया ईमेजेस तसेच पिक्चर्सचा समावेश होत असतो.ज्यात ईमेजसच्या माध्यमातुन एखादी माहीती देण्याचा तसेच संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असतो.तसेच एखादी महत्वाची माहीती त्यात ईमेजेसचा समावेश करून अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला जात असतो.
कंटेट मार्केटिंगचे फायदे कोणकोणते आहेत?
- कंटेट मार्केटिंगमुळे आपल्याला आपल्या कंटेटची आँनलाईन मार्केटिंग करता येत असते.आपल्या कंटेटला टार्गेट आँडियन्सपर्यत पोहचवता येत असते हा एक खुप महत्वाचा फायदा कंटेट मार्केटिंग करण्याचा आपणास पाहावयास मिळतो.
- कंटेट मार्केटिंगमुळे आपल्याला आपल्या टार्गेट कस्टमरची आँडियन्सची आवड,रुची जोपासता येत असते.त्यांच्या आवडीनुसार कंटेट तयार करून आपल्याला त्यांच्यापर्यत पोहचवता येत असते.
- कंटेट मार्केटिंगमुळे आपल्याला आपल्या टार्गेट आँडियन्सला एन्गेज करता येत असते.त्यांना अँट्रँक्ट करता येत असते.तसेच प्रेरणादायी अणि अँटरँक्ट्रिव्ह कंटेट तयार करून त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेता येत असते.त्यांना प्रोत्साहन देता येत असते.
अंतिम निष्कर्ष : अशा प्रकारे आज आपण कंटेट मार्केटिंग म्हणजे काय?कंटेट मार्केटिंग करणे का महत्वाचे आहे?कंटेट मार्केटिंग करण्याचे फायदे कोणकोणते असतात हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तरी सदर लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यत शेअर करा जेणेकरून त्यांनाही सदर माहीतीचा लाभ घेता येईल.