विद्या आणि कला – 14 Vidya list in Marathi
प्राचीन हिंदू धर्मग्रंथ रामायण व महाभारत, पोथी-पुराण आणि आणि हिंदू आध्यात्मिक ग्रंथा मध्ये आपल्याला माहीत असेल की 14 विद्या आणि चौसष्ट 64 कलां बाबत सविस्तर लिहल गेल आहे आणि आज बरेचजन ह्या कला व विद्याबाबत माहिती घेण्यास इच्छ्युक असतात
तर आपण थोड बेसिक माहिती पाहुयात . 14 विद्या ह्या-
- वेद-4
- उपवेद -4
- वेदांग -6-हयापसून तयार झालेल्या आहेत
प्राचीन हिंदू धर्मग्रंथत अनादी काळापासून वर्णन केलेल्या चौदा विद्या आणि चौसष्ट कला खालीलप्रमाणे आहेत.
4 वेद खालीलप्रमाणे आहेत:-
- ऋग्वेद :3500 वर्षांपेक्षा जास्त प्राचीन असलेल्या ऋग्वेदत 1017 सूक्त आहेत असून हे जगातील सर्वात जुने शास्त्र मानल जाते.
- यजुर्वेद: यज्ञ आणि त्या बाबतच्या सर्व विधी बाबत यजुर्वेदात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तसेच यात तत्वज्ञानाचे वर्णन असून . मूलभूत ज्ञान, म्हणजे रहस्य ज्ञान, ब्राह्मण, आत्मा, देव ह्या बाबत यात सखोल ज्ञान ज्ञात आलेले आहे ,
- सामवेद :सर्वात महत्वाचा असा हा वेद असून चार ही वेदात ह्यास जास्त महत्व आहे चार वेदांमध्ये सामवेद. सामवेद भारताच सर्वात जुन शास्त्र आहे तसेच हा सर्वात लहान ग्रंथ आहे,
- अथर्वेदः हिंदू धर्मातील सर्वात पवित्र व सर्वोच्च मानल्या जाणार्या ग्रंथात व वेदात अथर्वेद चौथ्या क्रमांक वर मानल जाते
4 उपवेद माहिती खालील दिल्या प्रमाणे:-
- अर्थशास्त्र: हा एक अतिशय जुना भारतीय ग्रंथ आहे असून शासन, आर्थिक आणि लष्करी ह्या विषया बाबत तसेच रणनीतीबद्दल सखोल महिरी देतो, ज्ञान प्रदान करतो -कौटील्या किंवा आपण यास विष्णुगुप्त म्हणून सुद्धा ओळखतो यांचं यात योगदान आहे .
- धनुर्वेद: धनुष्य आणि ज्ञान शब्दावरून ह्या वेदाला ओळखलं जात
- गंधर्ववेद: संगीत नृत्य आणि कला वर आधारित हा भारतीय ग्रंथ आहे.
- आयुर्वेदः आयुर्वेद बाबत लोकांना सर्वात जास्त माहिती असून आयुर्वेदिक हा पारंपारिक वैद्यकीय ज्ञानाबाबत माहिती देत असतो.
हिंदू धर्मात शास्र्त्रा त विद्या आणि कला यांच्यात फरक सांगितलेला आहे . दोन प्रकारचच्या विद्या असतात , एक परा आणि दुसरी अपरा , यात ही अनेक प्रकारच्या विद्यांच्या समावेश आहे . त्याच प्रमाणे हिंदू धर्मात दोन प्रकारच्या कला देखील सांगितलेल्या आहेत .
पहिली सांसारिक कला आणि दुसरी आध्यात्मिक कला. त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेवूयात – 14 Vidya list in Marathi
जगात असे बरेच संत किंवा महात्मे होवून गेलेत त्यांना या प्रकारच्या विद्या अवगत आहेत ह्या ज्ञांनच्या या बळावर ते भूतकाळ व भविष्या बाबत सांगत आणि त्या जोरावर ते जादू टोणा तसेच चेटूक करण्याच शिकेलले असतात
- व्याकरण शिक्षण, कलपा, , निरुक्त , छंद , कर्मकांड , वास्तू, अयुर्वेद, वेद, विधी, ज्योतिष, सामुद्रिक शास्त्र, , धनुर्विद्या इ. हे काही पारा विद्याची उदाहरण
- तसेच जीवन, , संमोहन, जादू, , उपकरणे, मंत्र, , चौकी बांधणे, सूक्ष्म शरीरातून बाहेर पडणे, मागील जन्माचे ज्ञान, अंतर्ध्यान, संन्यास, संजीवनी विद्या ह्या काही अपरा विद्या होत
सहा वेदांगे
- १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
- २. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
- ३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
- ४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.
- ५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.
- ६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.,न्याय,मीमांसा, पुराणे,धर्मशास्त्र.
64 कला –14 Vidya list in Marathi
- पानक रस तथा रागासव योजना – पेय व मदिरा तयार करणे.
- धातुवद- कचे पक्की , धातू व मिश्रधातू वेगळे करणे.
- दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ समजणे .
- आकर ज्ञान – खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
- वृक्षायुर्वेद योग- उपवन, उद्यान बनविणे.
- पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
- वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
- व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे ज्ञान असणे.
- वैजापिकी विद्याज्ञान- विजय मिळविणे.
- शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली समजणे .
- अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान घेणे .
- वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधकामा बद्दल .
- बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
- चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
- पुस्तकवाचन- पुस्तके व ग्रंथ वाचणे.
- आकर्षण क्रीडा- आकर्षित करणे.
- कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला सुंदर बनविणे.
- हस्तलाघव- हस्तकौशल्य व कलेची कामे करणे.
- प्रहेलिका – कोटी, उखाणे वा काव्य हयातून प्रश्न विचारणे.
- प्रतिमाला – अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
- काव्यसमस्यापूर्ती – अर्धे काव्य पूर्ण करणे.
- भाषाज्ञान – देशी-विदेशी भाषा ज्ञान असणे.
- चित्रयोग – चित्रे काढून रंगविणे.
- कायाकल्प – वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
- माल्यग्रंथ विकल्प – वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
- गंधयुक्ती – सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
- यंत्रमातृका – विविध यंत्रांची निर्मिती करणे.
- अत्तर विकल्प – फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
- संपाठय़ – दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
- धारण मातृका – स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
- छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
- वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
- मणिभूमिका – भूमीवर मण्यांची रचना करणे.
- द्यूतक्रीडा – जुगार खेळणे.
- पुष्पशकटिका निमित्त ज्ञान – प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
- माल्यग्रथन – वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
- मणिरागज्ञान – रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
- मेषकुक्कुटलावक – युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
- विशेषकच्छेद ज्ञान – कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
- क्रिया विकल्प – वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
- मानसी काव्यक्रिया – शीघ्र कवित्व करणे.
- आभूषण भोजन – सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
- केशशेखर पीड ज्ञान – मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
- नृत्यज्ञान – नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
- गीतज्ञान – गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
- तंडुल कुसुमावली विकार – तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
- केशमार्जन कौशल्य – मस्तकाला तेलाने मालीश करणे.
- उत्सादन क्रिया – अंगाला तेलाने मर्दन करणे.
- कर्णपत्र भंग – पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
- नेपथ्य योग – ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
- उदकघात – जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
- उदकवाद्य – जलतरंग वाजविणे.
- शयनरचना – मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
- चित्रकला – नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
- पुष्पास्तरण – फुलांची कलात्मक शय्या करणे.
- नाटय़अख्यायिका दर्शन – नाटकांत अभिनय करणे.
- दशनवसनांगरात – दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
- तुर्ककर्म – चरखा व टकळीने सूत काढणे.
- इंद्रजाल – गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
- तक्षणकर्म – लाकडावर कोरीव काम करणे.
- अक्षर मुष्टिका कथन – करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
- सूत्र तथा सूचीकर्म – वस्त्राला रफू करणे.
- म्लेंछीतकला विकल्प – परकीय भाषा ठाऊक असणे.
- रत्नरौप्य परीक्षा – अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
पाककला नमूद नाही केली
धन्यवाद,
खूप खूप आभारी आहोत मॅडम तुमचे.
अमुलाग्र असे ज्ञान आज तुमच्याकडून प्राप्त झाली.