गोत्र म्हणजे काय?गोत्राचे प्रकार व महत्व ? -What is gotra? What is its importance?
गोत्र हे आपणास वैदिक धर्माकडुन प्राप्त झालेले एक वरदान आहे.जन्म वंंश शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत सुक्ष्मस्तरीय असलेली मानवशाखा असते.
गोत्र हे एका पुरुषाच्या पुर्वजापासुन सुरू झालेल्या अणि अखंडितपणे चालु असलेल्या कुळाच्या उपमेचे नाव असते.
गोत्र हा मुलाच्या मुलांपासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम असतो.
गोत्र ही आपली ओळख मानले जाते.गोत्र ही कुळ तसेच वंश यांची मुळ परंपरा असते.
ब्रम्हदेवाची जी विशिष्ट माणसपुत्रे होती ह्या माणसपुत्रांतील वेगवेगळ्या त्रषींना आपले गोत्र मानले जाते.
शास्त्रात इंद्रियांचे तारण करणारे रक्षण करणारे यालाच गोत्र म्हटले गेले आहे.सनातन धर्मात गोत्राचे महत्व खूप श्रेष्ठ मानले जाते.अणि ह्या गोत्राचे अर्थ देखील फार विस्तृत स्वरूपात दिलेले आहेत.
गो चा अर्थ इंद्रिये असा होतो अणि त्र म्हणजे तारक असा याचा अर्थ होतो.गोत्र हे त्रषीपरंपरेपासुन चालत आलेले आहे.म्हणुन याला वेगवेगळ्या त्रषींची नावे दिली गेली आहेत.
गोत्र ही त्रषींची नावे आहेत ह्या नावांमध्ये बहुधायन सुत्रांनुसार अगस्त्य,कांस्य,जमदगनी,भारद्वाज,वसिष्ठ विश्वामित्र,गौतम,अत्री ह्या आठ त्रषींपासुन प्राथामिक गोत्रांची निर्मिती होते.
गोत्रांची संख्या अगणित अशी आहे म्हणून हयाची व्यवस्था सुलभ करण्यासाठी धर्माकडुन याची एकुण ५० गणांमध्ये विभागणी केली असल्याचे सांगितले जाते.ह्या मध्ये पन्नास त्रषींच्या नावाला गोत्र असे संबोधिले गेले आहे.
पण वरील पन्नास गोत्रांत फक्त प्रमुख आठ गोत्र ही प्रामुख्याने मानली जातात ज्यात अगस्त्य,कांस्य,जमदगनी, भारद्वाज,वसिष्ठ,विश्वामित्र,गौतम अत्री ह्या आठ गोत्रांचा समावेश होतो.
ह्या गोत्रांचे देखील उपविभाग आहेत ज्यांचे नाव उपमनयु,उंदीन पाराशर, वसिष्ठ अणि चार उपविभागांचे देखील काही उपविभाग पडतात.यालाच गोत्र असे म्हटले जाते.यात वर्गीकरण प्रथम गणात होते मग पक्षात मग गोत्रात केले जाते.
प्रवर कशाला म्हणतात?
गोत्रांची संख्या अगणित असुनही धर्माने यांची व्यवस्था सुलभ करण्यासाठी याची विभागणी ज्या पन्नास गणांमध्ये केली आहे ह्या प्रत्येक गोत्रामध्ये प्रवर्तक त्रषी असतात.
यात काही गोत्रांना दोन तर काही गोत्रांना चार पाच असे एकुण जास्तीत जास्त पाच प्रवर्तक त्रषी असतात.हयाच प्रवर्तक त्रषी गणांनाच प्रवर्तक असे म्हटले जाते.
आपले गोत्र कसे जाणुन घ्यायचे?
आपण आपले गोत्र आपल्या परिवारातील जुन्या लोकांकडुन पुर्वजांकडे जुन्या भटजी वगैरे कडुन हे सहज कळु शकते.
बरयाच ठिकाणी मातृवंशीय तसेच पितृवंशीय गोत्र बघण्यात येत असते.काशी त्र्यंबक सारख्या ठिकाणी फक्त भटजींना नाव सांगुन देखील आपण आपले गोत्र जाणुन घेऊ शकतो.
पण ज्यांना आपले गोत्र काय आहे हे माहीत नाही अशा सर्व व्यक्तींचे गोत्र काश्यप गोत्र असल्याचे मानले जाते.याबाबद हेमाद्री चंद्रिका यात देखील सांगितले आहे ज्याला आपले गोत्र माहीत नाही त्याचे गोत्र काश्यप आहे असे मानावे.
यामागे देखील कारण आहे मनापासून ज्या मरीची त्रषींचा जन्म झाला होता कश्यप हे त्यांचे पुत्र होते.मरीची राक्षस मरीची त्रषीं एकमेकांपासून भिन्न आहेत.
कश्यप त्रषी यांच्या गोत्राचा उच्चार सर्वश्रेष्ठ पदधतीने करावा असे सांगितले जाते कारण तश्र प्रजापती यांना ज्या विविध कन्या होत्या यातील सुरूवातीच्या तेरा कन्या यांचा विवाह कश्यप त्रषी यांच्या समवेत लावून दिला होता.यानंतर पुन्हा चार कन्यांचा विवाह त्यांनी कश्यप त्रषी सोबत लावून दिला.
ह्या सतरा कन्यांच्या समवेत विवाह जीवनात ज्या संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला त्या प्रीत्यार्थ कशयापाचे गोत्र लावले जाते.
गोत्र जाणुन घेण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो यात सिंह मकर पशु पक्षी इत्यादी चिन्हांचा समावेश होतो.
सहगोत्र सहप्रवाह विवाहास वज्र मानले जाते कारण असा मुलगा अणि मुलगा एकमेकांचे बंधू भागिनी नात्याने ठरत असतात.यांचे रक्त सारखे असते.
त्यामुळे त्यांच्यामध्ये जैनेटिक अनुवांशिक समस्या तसेच रोग निर्माण होतात.
गोत्रांविषयी जाणुन घ्यायच्या काही इतर महत्त्वाच्या बाबी तसेच तथ्ये –
ब्रम्हदेव यांना ५९ पुत्रे असल्याचे सांगितले जाते पण सुरूवातीला गोत्र ही आठ प्रकारची होती त्यानंतर त्यात दोन गोत्रांची वाढ करण्यात आली होती.
एकुण दहा प्रकारची गोत्र सुरूवातीला वर्णन करण्यात आली.ही मुख्य गोत्रे ब्रह्मदेवाची मानसपुत्र मानली जातात.
ब्रम्हदेवाच्या मनापासून निर्माण झालेल्या त्रषीला मरीची त्रषी म्हणून ओळखले जाते.म्हणुन मरीची पासुन उत्पन्न झालेल्या वंशाला मरीची म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या नेत्रापासुन निर्माण झालेल्या त्रषीला अत्री म्हणून ओळखले जाते.म्हणुन अत्रीपासुन उत्पन्न झालेल्या वंशाला अत्री म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या मुखापासून त्रषी अंगीरसाची निर्मिती झाली अंगीरसापासुन उत्पन्न झालेल्या वंशाला अंगीरस म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या कानापासून पुलस्य त्रषींची निर्मिती झाली ब्रम्हदेवाच्या कानापासुन उत्पन्न झालेल्या वंशाला पुलस्य म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या नाभीपासुन पुलह त्रषींची निर्मिती झाली ब्रम्हदेवाच्या हातापासुन क्रतु त्रषींची निर्मिती झाली ब्रम्हदेवाच्या त्वचेपासुन भृगु त्रषींची निर्मिती झाली ह्या सातही त्रषींना सप्तर्षी असे म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या प्राणापासुन वसिष्ठ त्रषींची निर्मिती झाली ब्रम्हदेवाच्या अंगठयापासुन दक्ष त्रषींची निर्मिती झाली ब्रम्हदेवाच्या छायेपासुन कर्दम त्रषींची निर्मिती झाली वरील दहा त्रषी हे पुर्वीच्या काळात दहा गोत्रात वर्णन केले गेले आहे.
म्हणजे जो व्यक्ती ज्या वंशात जन्माला आला ज्या वंशात जन्माला येतो तो त्याचा गोत्र ठरत असतो.काही ठिकाणी कुलदैवतेचे नाव देखील गोत्राला दिले गेल्याचे आपणास दिसून येते.