इलाॅन मस्कने सर्व व्हेरीफाईड टविटर अकाऊंट वरून ब्लु टिक का काढुन घेतले आहे? यामागचे कारण काय आहे?why Twitter remove blue tick
टविटरचा मालक इलाॅन मस्कने सर्व मोठमोठ्या सेलिब्रिटी,राजकीय नेते,खेळाडु तसेच अभिनेत्यांच्या व्हेरीफाईड टविटर अकाऊंटवर देण्यात आलेले ब्लु टिक काढुन घेतले आहे.
हे ब्लु टिक इलाॅन मस्कने का काढुन घेतले आहे हेच आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
टविटरकडुन कोणाकोणाचे ब्लु टिक काढुन घेण्यात आले आहे?
टविटरचा मालक इलाॅन मस्कने खालील सेलिब्रिटी व्यक्तींच्या टविटर अकाऊंट वरून ब्लु टिक साईन काढुन घेतले आहे.
विराट कोहली
अमिताभ बच्चन
योगी आदित्यनाथ
राहुल गांधी
शाहरुख खान
सलमान खान
अक्षय कुमार
इत्यादी
इलाॅन मस्कने मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या टविटर अकाऊंट वरून ब्लु टिक सर्विस का काढुन घेतली आहे?
टविटरचा नवीन मालक इलाॅन मस्कने टविटरवर ताबा घेतल्यापासून इलाॅन मस्कने ट्विटरच्या नियमावलीत कार्यप्रणालीत टविटरचा लोगो इत्यादी मध्ये अनेक महत्वाचे बदल केले आहे.
२० एप्रिल २०२३ पासुन ज्या व्हेरीफाईड टविटर अकाऊंट पेजवर सबस्क्रिप्शन चार्ज भरून पेड सबस्क्रिप्शन घेतले गेलेले नसेल त्या सर्व सेलिब्रिटींचे टविटर अकाऊंट पेजवर असलेले ब्लु टिक काढुन घेण्यात येणार आहे.असे इलाॅन मस्कने घोषणा केली आहे.
यामुळे शाहरुख खान अमिताभ बच्चन सलमान अक्षय कुमार इत्यादी दिग्दज अभिनेत्यांसोबत योगी आदित्यनाथ राहुल गांधी इत्यादी राजकीय नेत्यांच्या विराट कोहली सारख्या दिग्दज क्रिकेटपटूंच्या ट्विटर अकाऊंट पेज वरील ब्लु टिक हयाच कारणामुळे काढुन घेण्यात आले आहे.
म्हणजे आता ब्लु टिक सर्विस पुन्हा प्राप्त करण्यासाठी सर्व सेलिब्रिटींना २० एप्रिल २०२३ पासुन पेड सबस्क्रिप्शन घेणे बंधनकारक असणार आहे.फ्री मध्ये टविटर वर ब्लु टिक सर्विस घेतलेल्या सर्व खाते पेजवरील ब्लु टिक इलाॅन मस्कने आता काढुन घेतले आहे.
ब्लु टिक सर्विस पुन्हा प्राप्त करण्यासाठी किती चार्ज भरावा लागेल?
आता इलाॅन मस्कने लागु केलेल्या नियमावलीनुसार सर्व राजकीय नेते,अभिनेते,खेळाडु, ह्या सर्वांना ब्लु टिक सर्विस प्राप्त करण्यासाठी दरमहा काही सबस्क्रिप्शन चार्ज भरावे लागणार आहे.
ज्यांच्या कडुन हा मासिक चार्ज भरला जाईल त्यांच्या अकाऊंट पेजवर ब्लु टिक सर्विस पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे इलाॅनने सांगितले आहे.
याबाबत इलाॅनने सर्वांना आधीपासून सुचित केले होते की २० एप्रिल २०२३ पासुन फ्री ब्लु टिक सर्विस काढुन घेतली जाणार आहे.
पण तरी देखील सेलिब्रिटींनी ब्लु टिक पेड सबस्क्रिप्शन घेऊन चार्ज भरला नाही म्हणून इलाॅनने हे पाऊल उचलले आहे.
आता सर्व सेलिब्रिटींना ब्लु टिक सर्विस पुन्हा सुरू करायला वेब युझरला ६५० रूपये अणि मोबाईल युझरला ९०० रूपये इतका मंथली चार्ज भरावा लागणार आहे.