चंद्रयान ३ च्या लॅडिंग करीता २३ आॅगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? Why was 23 August the date chosen for Chandrayaan 3’s landing

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

चंद्रयान ३ च्या लॅडिंग करीता २३ आॅगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली?Why was 23 August the date chosen for Chandrayaan 3’s landing

आज संध्याकाळी ६ वाजुन ४ मिनिटांनी चंद्रयान ३ ची चंद्रावर लॅडिग होणार आहे.

त्यामुळे सर्व भारतातील नागरीक ह्या ऐतिहासिक देशाच्या अभिमानाच्या क्षणाला आपल्या डोळयांनी पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

पण आपल्यातील खुप जणांच्या मनात हा प्रश्न आला असेल की चंद्रयान ३ ची लॅडिग आज २३ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजुन ४ मिनिटांनीच का निर्धारित करण्यात आली.इतर तारीख इतर वेळ लॅडिगसाठी का निवडण्यात आली नाही.

आपल्या मनातील ह्याच प्रश्नाचे उत्तर आजच्या लेखात आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आपल्यातील खुप जणांना वाटत असेल की २३ आॅगस्ट रोजी चंद्रयान ३ च्या लॅडिग करीता शुभ दिवस असणार किंवा ह्या दिवशी संध्याकाळी लॅडिग करण्याचा चांगला शुभ मुहूर्त असणार म्हणून इस्रोने ही तारीख निवडली आहे.

Why was 23 August the date chosen for Chandrayaan 3
Why was 23 August the date chosen for Chandrayaan 3

पण असे काहीही नाहीये यामागे एक दुसरे महत्वाचे कारण आहे हेच कारण आपण जाणुन घेणार आहोत.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर सर्वप्रथम विक्रम लॅडर अणि प्रज्ञान नावाचे रोव्हर सौरऊर्जेच्या माध्यमातुन आपल्या मिशन मधील पुढील प्रक्रिया पार पाडतील.हे मिशन पार पाडण्यासाठी सौर ऊर्जेची आवश्यकता असते.

चंद्रावर १४ दिवस इतक्या कालावधीसाठी रात्र असते आणि १४ दिवसांसाठी प्रकाश असतो म्हणून चंद्रयान ३ हे २३ आॅगस्ट रोजी चंद्रावर रात्री लॅड न करता दिवसा संध्याकाळी लॅडिग करण्याचे इस्रो कडुन ठरविले गेले आहे.

कारण रात्रीच्या वेळी चंद्रयान ३ चंद्रावर उतरवले असते तर चंद्रयान मिशनचे सर्व कार्य करायला अडीअडचणी निर्माण झाल्या असत्या.

चंद्रावर साॅफ्ट लॅडिंग करण्यासाठी २३ आॅगस्ट ही तारीख निवडण्याचे अजुन एक कारण आहे ते म्हणजे २२ आॅगस्ट पर्यंत चंद्रावर रात्र असल्याने तिथे अंधार होता

पण २३ आॅगस्ट ह्या दिवशी दक्षिण ध्रुवावर भरपुर सुर्यप्रकाश उपलब्ध असलेला आपणास पाहावयास मिळते.

See also  जगातील 15 सर्वोत्तम ब्लोगर्स - किती आहे कमाई ? - Top Adsense Earners in world Marathi information

ज्याचा फायदा लॅडिग व्यवस्थित सुखरूपपणे करण्यासाठी देखील होईल अणि अणि ह्या दिवशी दक्षिण ध्रुवावर भरपुर सुर्यप्रकाश असल्याने प्रज्ञान रोव्हरला देखील त्याचे काम चांगल्या प्रकारे चार्ज होऊन उर्जा प्राप्त करून योग्य पद्धतीने करता येईल.

२३ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर ह्या कालावधीत चंद्रावर चांगला सुर्यप्रकाश पडत असतो.ज्याचा विशेष लाभ विक्रम लॅडर अणि प्रज्ञान रोव्हर यांना होणार आहे.ह्या प्रकाशामुळे दोघांना उर्जा प्राप्त होण्यास मदत होईल.

याचसोबत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या नुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३० अंशापर्यत तापमान असते.अशा कडाक्याच्या थंडीच्या काळात चंद्रावर काम करणे विक्रम लॅडर अणि प्रज्ञान रोव्हर या दोघांना कठिन झाले असते.

म्हणुन सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचारविनिमय करून २३ आॅगस्ट ही तारीख चंद्रयान ३ च्या लॅडिग करीता निवडण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा