जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस का साजरा केला जातो? हया दिवसाचे महत्त्व काय आहे? world press freedom day in Marathi
दरवर्षी ३ मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.
पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे महत्व पटवून देण्यासाठी याविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस दरवर्षी ३ मे ह्या तारखेला साजरा करण्यात येत असतो.
हा दिवस साजरा करण्याविषयी महत्वाचा निर्णय १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेमध्ये घेण्यात आला होता.१९९१ मध्ये युनेस्कोच्या भरवलेल्या एका सभेमध्ये याबाबत शिफारस करण्यात आली होती.
यानंतर १९९३ रोजी हा दिवस जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली होती.तेव्हापासुन दरवर्षी ३ मे रोजी हा दिवस जागतिक पातळीवर मोठ्या उत्साहात आनंदात वृतपत्र स्वातंत्र्याचे महत्व पटवून देण्यासाठी साजरा केला जाऊ लागला.
हा दिवस जगभरातील पत्रकार अणि ते समाजासाठी करत असलेल्या कार्याचा गौरव करण्याचा कौतुक करण्याचा महत्वाचा दिवस मानला जातो.
हा दिवस आपणास हे सांगण्याचे काम करतो की देशाचा विकास हा येथील वास्तव्यास असलेल्या स्थानिक नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अवलंबून आहे म्हणून नागरीकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुठलीही गदा आणता कामा नये.त्यांच्या आवाजाला दाबण्यात येऊ नये.
जागोजागी स्पायवेअर प्रोग्रामचा वापर पत्रकारांची जासुसी केली जात असते.
असे निदर्शनास आल्याने आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या वतीने,शासनाला आंतरराष्ट्रीय वैश्विक संस्थांना पत्रकारांवर पाळत ठेवण्यासाठी प्रतिबंध घालणारे कठोर नियम तयार करण्यात यावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
पत्रकार स्वातंत्र्य का महत्वाचे आहे?
पत्रकार हे आपल्या जीवाची पर्वा न करता समाजात घडत असलेला अन्याय,अत्याचार भ्रष्टाचार वाईट चुकीच्या गोष्टी यांविरुद्ध आवाज उठवत असतात यावर समाजासमोर आपले परखडपणे मत बोलून लिहुन मांडत असतात.
आज समाजातील अनेक काळे कारभार उघडकीस करण्याचे काम पत्रकारांनीच केले आहे.पत्रकारीतेला हेच कारण आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देखील पत्रकारांना ओळखले जाते.
नॅशनल प्रेस काऊन्सिलची स्थापणा केव्हा करण्यात आली होती?प्रेस काऊन्सिलचे काम काय असते?
पहिल्यांदा प्रेस कमिशनच्या वतीने भारतीय पत्रकारितेची नैतिकता राखण्याच्या वृतपत्राचे स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने एक समितीचे गठन करण्यात आले होते.
यानंतर ८ ते १० वर्षांनी प्रेस काऊन्सिलची स्थापणा करण्यात आली होती.
प्रेस काऊन्सिल आॅफ इंडिया विश्वासहर्ता राखण्या करीता सर्व पत्रकारांच्या अॅक्टीव्हीटी वर कृतीवर लक्ष ठेवण्याचे काम करते.
देशात एक सुदृढ लोकशाही राखण्यासाठी लोकशाहीचे जतन करण्यासाठी प्रेस काऊन्सिल आॅफ इंडियाने आपली फार महत्वाची भुमिका पार पाडली आहे.
प्रेस काऊन्सिल आॅफ इंडिया ही एक वैधानिक संस्था आहे जी प्रिंट मिडियाकडुन केल्या जात असलेल्या सर्व अॅक्टी व्हीटी आॅपरेशन वर लक्ष ठेवत असते तसा हक्क देखील प्रेस काऊन्सिल आॅफ इंडियाला देण्यात आला आहे.
राष्ट्रीय पत्रकार दिवस कधी साजरा केला जातो?
दरवर्षी १६ नोव्हेंबर ह्या तारखेला राष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा करण्यात येत असतो.
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू काय आहे?
पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे प्रिंट मिडिया तसेच इतर प्रसारमाध्यमे यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे याकरीता जगभरातील शासनाला पत्रकारांच्या स्वातंत्र्याविषयी स्मरण करून देणे जेणेकरून शासन पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी महत्वपूर्ण कायदे तयार करेल.पत्रकारांना संरक्षण प्रदान करेल.