गिफ्ट निफ्टी काय आहे? Gift nifty information in Marathi
गिफ्ट निफ्टी ही एसजी एक्स निफ्टीला देण्यात आलेले दुसरे नाव तसेच त्याची नवीन ओळख आहे.
३ जुलै २०२३ रोजी जागतिक व्यापारातील एक मोठा बदल झालेला आपणास पाहावयास मिळाला होता तो बदल म्हणजे एसजी एक्स निफ्टीचे नाव बदलून गिफ्ट निफ्टी असे ठेवण्यात आले होते.
तेव्हापासून आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की एसजी एक्स निफ्टी चे नाव बदलून गिफ्ट निफ्टी असे का ठेवण्यात आले?.हे गिफ्ट निफ्टी काय आहे याचे स्वरूप कसे असणार?
आजच्या लेखात आपल्या मनातील ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
गिफ्ट निफ्टी काय आहे?gift nifty meaning in Marathi
गिफ्ट निफ्टी हे एसजी एक्स निफ्टीची रिब्रॅडिंग करून त्याला देण्यात आलेली नवीन ओळख तसेच नवीन नाव आहे.
जे ट्रेडर्स याआधी भारतीय शेअर बाजार सुरू होण्याच्या आधी मार्केट वर जाईल की खाली येईल ह्या मार्केटच्या स्थितीचा अंदाजा जाणुन घेण्यासाठी एसजी एक्स निफ्टीचा(सिंगापूर स्टाॅक एक्सचेंजचा) संदर्भ घेत होते.
त्या गुंतवणूक दारांना आता मार्केटच्या स्थितीचा अंदाजा जाणुन घेण्यासाठी गिफ्ट निफ्टीचा संदर्भ घ्यावा लागणार आहे.कारण एसजी एक्स निफ्टी लवकरच बंद होणार आहे.
याचसोबत एसजी एक्स निफ्टी मधील सर्व फ्युचर काॅनटॅ्क्टची देखील गिफ्ट निफ्टी मध्ये रिब्रॅडिंग करण्यात येणार आहे.
सिंगापूर एक्सचेंज मधील एसजी एक्स निफ्टी मधील ७५० कोटी डाॅलर इतक्या डेरीव्हीटिव्हचे हस्तांतरण एन एसई आय एक्स NSE ix (national stock exchange international exchange) यात केले गेले आहे.
३ जुलै २०२३ पासून निफ्टी फ्युचर मधल्या सर्व पोझिशन ह्या आपणास एन एस ई आय एक्स वर ओपन होताना दिसुन येतील.
NSE ix काय आहे? NSE ix कुठे आहे?
एन एसई आय एक्स हेच गिफ्ट निफ्टी आहे.एन एस ई आय एक्स वर युएस डाॅलर्स मध्ये निफ्टी फ्युचर काॅनटॅ्क्ट पार पडत असतात.
एन एसई आय एक्स हे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी सेज,गिफ्ट सिटी ह्या ठिकाणी आहे.
एन एसई आय एक्स हे इंटरनॅशनल फायनान्स सर्विस सेंटर असोसिएशन म्हणजेच आय एफ एस सीएच्या नियामक फ्रेमवर्क नुसार आपले कार्य करते.
एन एसई आय एक्सचा फुलफाॅम काय होतो?NSE ix Full form in Marathi
एन एसई आय एक्सचा फुलफाॅम national stock exchange international exchange असा होतो.
गिफ्ट निफ्टीचे ट्रेडिंग कसे होणार?
गिफ्ट निफ्टी मधील ट्रेडिंग एकुण दोन सेशन मध्ये पार पाडले जाईल.गिफ्ट निफ्टी हे एकुण २१ तासांसाठी ट्रेडिंग करीता खुले राहणार आहे.
पहिले सेशन सकाळी ६ वाजुन ३० मिनिटांनी सुरू होईल अणि ३ वाजुन ४० मिनिटांपर्यत सुरू राहील.दुसरे सेशन दुपारी ४ वाजुन मिनिटांनी सुरू होईल अणि सकाळी २ वाजुन ४५ मिनिटांपर्यत सुरू राहील.
काॅनटॅ्क्ट तसेच इतर कुठल्याही तपशीलाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण nseix.com ह्या वेबसाईटवर जायचे आहे.
गिफ्ट निफ्टी मध्ये एकुण चार उत्पादने समाविष्ट करण्यात आली आहेत.ज्याची नावे गिफ्ट निफ्टी बॅक, गिफ्ट निफ्टी फायनान्शिअल सर्विसेस,गिफ्ट निफ्टी ५०, गिफ्ट निफ्टी आयटी डेरीव्हीटीव्ह अशी आहेत.
गिफ्ट निफ्टी आता भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणारया गुंतवणूक दारांना मार्केटची स्थिती जाणुन घेण्यासाठी मदत करणारा नवीन निर्देशांक असणार आहे.
गिफ्ट सिटी काय आहे
- गिफ्ट सिटी हे गुजरात राज्यातील गांधीनगर मधील एक शहराचे नाव आहे.हयाच ठिकाणी गिफ्ट निफ्टी सुचीबदध करण्यात येणार आहे.
- गिफ्ट सिटी ह्या शहरात प्युचर अणि आॅप्शनचे ट्रेडिंग होईल.
- गिफ्ट सिटी भारत सरकारकडुन विकसित केले जात असलेले एक नवीन आर्थिक केंद्र आहे.ज्याला इतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वित्तीय केंद्रांप्रमाणे भारत सरकार विकसित करत आहे.
- लवकरच गिफ्ट सिटी आपल्या भारत देशातील एक मोठे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून ओळखले जाईल.हया आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रादवारे सर्व परदेशी अणि भारतातील अनिवासी व्यक्ती व्यापार करू शकणार आहे.
- परदेशी बाजारपेठेत ज्या सुविधा गुंतवणूक दारांना उपलब्ध करून दिल्या जातात त्या सर्व सुविधा ह्या भारतातील गिफ्ट सिटी मध्ये स्थित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वित्तीय केंद्रात उपलब्ध करून दिल्या जातील.
- भारतीय शेअर बाजारासाठी गिफ्ट निफ्टीचे महत्व काय आहे?
भारत देशाला देखील सिंगापुर माॅरिशिअस दुबई इत्यादी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वित्तीय केंद्रांप्रमाणे स्वताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक वित्तीय केंद्र स्थापन करू इच्छित आहे.कारण याने आपल्या भारतीय शेअर बाजाराच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
भारतात प्रथमतः आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रेडिंग केली जाईल.
भारताला गुजरात मधील गांधीनगर मधील स्थित गिफ्ट सिटी ह्या शहरास ग्लोबल फायनान्शिअल अॅण्ड आयटी बिझनेसचे मुख्य केंद्र बनवायचे आहे.