PM care – मुलांसाठी पंतप्रधान मोदी केअर योजना – PM cares for children scheme in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

मुलांसाठी पंतप्रधान मोदी केअर योजना (PM cares for children scheme in Marathi)

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेण्यात आलेल्या एका व्हिडिओ काँन्फरन्समध्ये पीएम केअर फाँर चिल्ड्रन ह्या योजनेअंतर्गत मुलांना कोणकोणत्या सुविधा पुरवण्यात येतील याबाबद खुलासा केला आहे.

याविषयी अधिक सविस्तरपणे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असे देखील म्हणाले की पीएम केअर फाँर चिल्ड्रन ही योजना अशा मुलांसाठी विशेषकरून सुरू केली जात आहे.

ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात नाही,तसेच जे कोरोनाने ग्रस्त आहेत.अशा पिडीत मुलांना मदत करून त्यांची अडचण थोडीफार का होईना कमी करण्याचा सरकारचा हा छोटासा प्रयत्न आहे.

जेणेकरून अशी सर्व मुले ज्यांनी कोरोनाच्या महामारीत आपले आईवडील गमावले आहेत.त्यांना आपण एकटे तसेच अनाथ आहोत असे वाटणार नाही.

आपला देश आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.असा विश्वास त्यांना पटवून होण्यासाठी ही योजना सरकारकडुन सुरू करण्यात आली आहे.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया ह्या पीएम केअर फाँर चिल्ड्रन योजनेविषयी अधिक सविस्तरपणे.

पीएम केअर फाँर चिल्ड्रन ही योजना काय आहे?

पीएम केअर फाँर मोदी ही एक कोरोनाच्या महामारीत आईवडिल गमावलेल्या मुलांसाठी,तसेच कोरोनाने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी सरकारने सुरू केलेली योजना आहे.

See also  Bihar Board 10th Result 2023 link | बिहार बोर्ड १० वी निकाल २०२३ वेळ आणि तारीख

ह्या योजनेअंतर्गत अशा मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे ज्यांनी कोरोना महामारीच्या काळात आपले आईवडील गमावले आहेत.तसेच जे कोरोनाग्रस्त आहेत.

याचसोबत ह्या योजने दरम्यान मुलांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत हेल्थ कार्ड पासबुक देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे,ज्याने त्यांचे भविष्य अधिक उज्वल होण्यास मदत होईल.

पीएम केअर फाँर चिल्ड्रन ही योजना कोणी सुरु केली आहे?

पीएम केअर फाँर चिल्ड्रन ही योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मे 2021 मध्ये सुरू केली होती.

पीएम केअर फाँर चिल्ड्रन ह्या योजनेची आँफिशिअल साईट कोणती आहे?

पीएम केअर फाँर चिल्ड्रन ह्या योजनेची आँफिशिअल वेबसाईट pmcaresforchildren.in ही आहे.

पीएम केअर फाँर चिल्ड्रन ही योजना का सुरु करण्यात आली आहे?

  • पीएम केअर फाँर चिल्ड्रन ही योजना कोरोनाच्या महामारीत आईवडील गमावलेल्या अनाथ मुलांना शिक्षण प्राप्त करून आर्थिक दृष्टया शैक्षणिक दृष्टया सक्षम होता यावे.यासाठी सुरू करण्यात आली आहे.
  • पीएम केअर फाँर चिल्ड्रन ह्या योजनेचा लाभ कोणाला आणि कसा घेता येणार आहे?
  • पी एम केअर फॉर चिल्ड्रन ह्या योजनेंतर्गत दिली जात असलेली दहा लाख रुपये इतकी रक्कम ही प्रत्येक योग्य लाभार्थी मुलाच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
  • ही रक्कम सर्व लाभार्थी मुलांना हप्त्याने देण्यात येणार आहे.प्रत्येक वयोगटातील तसेच वर्गातील मुलांना आपापल्या वयोगट आणि वर्गातील ठरवलेल्या हप्ता नुसार ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
  • यात 18 वर्षाचे झाल्यानंतर ही संपूर्ण रक्कम मुलांच्या खात्यात जमा केली जाईल.आणि मग ती रक्कम मुलाच्या नावावर गुंतवली जाणार आहे.

आणि जोपर्यत मुलाचे वय 23 होत नाही तोपर्यत त्याचा खर्च भागवण्याकरीता त्याला दर महिन्याला एक निश्चित रक्कम देखील यात दिली जाणार आहे.

पीएम केअर फाँर चिल्ड्रन ह्या योजनेचे मुलांना होणारे लाभ थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत-

● आर्थिक सहाय्य – सर्व मुलांसाठी 10 लाख रुपये

See also  खुशखबर खुशखबर! आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सरकार देते आहे ३ लाख रुपये - Maharashtra Inter-Caste Marriage Scheme

● बोर्डिंग आणि लॉजिंगसाठी सपोर्ट – सर्व मुलांचे पुनर्वसन

● शालेय शिक्षणासाठी साहाय्य – शाळांमध्ये प्रवेश

● उच्च शिक्षणासाठी साहाय्य – उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज

● 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण

● सर्व शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी 20,000 रुपये शिष्यवृत्ती.

पीएम केअर फाँर चिल्ड्रन योजनेत सहभागी होण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत?

पीएम केअर फाँर चिल्ड्रन योजनेत सहभागी होण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

पुढीलप्रमाणे आहेत-

● आधार कार्ड

● कोरोना महामारीच्या काळात आईवडिल मृत झाल्याचे प्रमाण असणे अनिवार्य आहे.

● दोन पासपोर्ट साईज फोटो

● मोबाइल नंबर

● बँकेचे पासबुक

● अर्ज करत असलेल्या मुलाचे बर्थ सर्टिफिकेट

● रहिवासी दाखला

● राशन कार्ड

● उमेदवार भारताचा नागरिक असावा.

पीएम केअर फाँर चिल्ड्न योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

● सर्वप्रथम pmcareforchildren.In ह्या वेबसाइटवर व्हिझिट करावे.

● home page मध्ये जाऊन child registration ह्या आँप्शनवर क्लीक करावे.

● मग यांतर आपला मोबाइल नंबर इंटर करायचा.

● मग खाली दिलेल्या send otp option वर ओके करायचे.

● मग आपल्या मोबाइल वर एक ओटीपी सेंड केला जाईल जो आपण तिथे स्कीनवर इंटर करायचा.

● त्यानंतर registration form आपली सर्व माहीती व्यवस्थित देऊन भरून घ्यायचा.

● मग माहीती भरून झाल्यानंतर submit ह्या बटणावर क्लीक करावे.यानंतर आपला अर्ज जमा होउन जाईल.

पीएम केअर फाँर चिल्ड्न योजनेच्या अर्जाचे स्टेटस कसे चेक करायचे ?

● पीएम केअर फाँर चिल्ड्न योजनेच्या आँफिशिअल वेबसाइटवर जायचे.

● मग यानंतर home page ओपन करायचे.

● Home page वर आपल्याला view status of application हा पर्याय दिसुन येईल त्यावर क्लीक करायचे.

● मग आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल जिथे आपल्याला आपला captcha code आणि application id टाकायचा असतो.

See also  बीई अणि बी-टेक मधील फरक _ Difference between BE and BTech in Marathi

● सर्व विचारलेली माहीती भरून झाल्यानंतर शेवटी submit बटणवर ओके करायचे.

● यानंतर आपल्यासमोर आपल्या अर्जाचे स्टेटस ओपन होऊन जाईल.

पीएम केअर फाँर चिल्ड्न योजनेच्या आँफिशिअल वेबसाइटवरून डाँक्युमेंट डाऊनलोड कसे करायचे?

● पीएम केअर फाँर चिल्ड्न योजनेच्या आँफिशिअल वेबसाइटवर जायचे.

● मग यानंतर home page ओपन करायचे.

● Home page वर आपल्याला Download section मध्ये जायचे आहे. इथे आपल्यासमोर दोन पर्याय दिसुन येतील

● ज्यात पहिले scheme guideline असेल आणि दुसरा पर्याय pm cares for children scheme असा असेल.

● वरीलपैकी आपल्याला हवा तो एक पर्याय निवडायचा यानंतर डाँक्युमेंट डाउनलोड होऊन जातील,

पीएम केअर फाँर चिल्ड्न योजनेच्या आँफिशिअल वेबसाइटचा संपर्क क्रमांक काय आहे?

गाईडलाईन विषयी काही प्रश्न असल्यास आपण खालील नंबरवर संपर्क साधावा-

०११-२३३८५२८९

[email protected]

काही तांत्रिक अडचणीबददल प्रश्न असल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा

०११-२३३८८०७४

[email protected]

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा