१२ वी पासवर मुंबई महानगरपालिका मध्ये कायमस्वरूपी भरती सुरू – BMC recruitment 2023 in Marathi

१२ वी पासवर मुंबई महानगरपालिका मध्ये कायमस्वरूपी भरती सुरू – BMC recruitment 2023 in Marathi

मुंबई महानगरपालिका मध्ये बारावी पासच्या बेसवर उमेदवारांची भरती केली जात आहे.अणि ही भरती तात्पुरता स्वरुपाची नसुन कायमस्वरूपी स्वरूपाची भरती असणार आहे.भरती मध्ये आपणास कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये.

वेतन-

वेतन २१ हजार सातशे ते ६९ हजार शंभर इतके दिले जाणार आहे.अणि ह्या भरतीसाठी शिक्षणाची अट देखील जास्त ठेवण्यात आली नसुन फक्त उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

म्हणुन सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे.

कोणत्या पदासाठी भरती होत आहे?

मुंबई महानगरपालिका मध्ये अग्नीशामक ह्या पदासाठी भरती केली जात आहे.

  • पदाच्या एकुण जागा -अग्नीशामक या पदाच्या एकुण ९१० जागा भरल्या जाणार आहेत.
  • शैक्षणिक पात्रता -इथे आपणास शैक्षणिक पात्रता ही किमान बारावी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे.
  • आर्ट्स कॉमर्स तसेच सायन्स यापैकी कुठल्याही एका शाखेतुन किमान ५० टक्के गुण मिळवून आपण १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

किंवा आपण फक्त दहावी उत्तीर्ण असेल तर दहावी उत्तीर्ण अणि भारतीय सेनेत पंधरा वर्षे इतका कालावधी आपण सेवा केलेली असावी.

उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांच्या नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

भरतीसाठी वयोमर्यादा –

३१ डिसेंबर २०२२ रोजी आपले २० ते २७ वर्षे असणे आवश्यक आहे.मागासवर्गीयांना वयात पाच टक्के सुट देण्यात येईल.

See also  पोस्ट खात्यात ९८ हजार ८३ जागांसाठी भरती सुरू - Post office recruitment 2023 in Marathi

अर्ज शुल्क –

ओपन कॅटॅगरी मधील उमेदवारांना ९४४ रूपये असणार आहे अणि मागासवर्गीय तसेच अनाथांसाठी ५९० इतकी अर्ज फी असणार आहे.

भरतीसाठी अर्ज कसा अणि कोठे करायचा आहे?

● सर्व उमेदवारांना भरतीसाठी आॅफलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.

भरतीसाठी कधी अणि कोठे उपस्थित राहायचे आहे?

सर्व उमेदवारांना भरतीसाठी १३ जानेवारी २०२३ ते ४ फेब्रुवारी दरम्यान लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान जेबीसिएन शाळेच्या बाजुस विनी गार्डन सोसायटीच्या समोर मंडपेशवर दहिसर पश्चिम मुंबई -४००१०३ येथे उपस्थित राहावे लागेल.

उंची छाती अणि वजन किती असणे आवश्यक आहे?

पुरूष उमेदवारांना १७२ सेंटीमीटर उंची अणि छाती ८१ सेंटीमीटर फुगवून ८६ सेंटीमीटर ठेवण्यात आली आहे अणि वजन ५० किलो ग्रॅम इतके असणे आवश्यक आहे.

महिलांची उंची किमान १६२ सेंटीमीटर अणि वजन ५० किलोग्रॅम ठेवण्यात आले आहे.

भरतीविषयी अधिक माहितीसाठी आपण portal.mcgm.gov.in ह्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन माहीती प्राप्त करू शकतात.

BMC recruitment 2023 in Marathi महत्वाची सूचना –

भरतीसाठी अर्ज करण्याआधी सर्व उमेदवारांनी एकदा व्यवस्थित पुर्ण सुचना वाचून घ्यायची आहे.

भरतीसाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी बघुन घ्यायच्या आहेत अणि आपण पात्र असेल तरच भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

जे उमेदवार अर्जाची फी शुल्क भरणार नाही त्यांचा फाॅम ग्राह्य धरला जाणार नाही.

DOWNLAOD – भरतीविषयी अधिक माहितीसाठी PDF

Comments are closed.