आर्थिक विश्लेषक नोकरीचे वर्णन,भूमिका आणि जबाबदाऱ्या Financial analyst job description roles and responsibilities

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

आर्थिक विश्लेषक नोकरीचे वर्णन,भूमिका आणि जबाबदाऱ्या Financial analyst job description roles and responsibilities

आजच्या लेखात आपण फायनान्शिअल ऍनालिस्टला कंपनीत कोणकोणते काम करावे लागते?कंपनी मध्ये त्याची भुमिका काय असते त्याच्यावर कोणकोणत्या विशेष जबाबदारी असतात इत्यादी बाबींचा सखोल आढावा घेणार आहोत.

फायनान्शिअल ऍनालिस्टयाला मराठीत वित्तीय तसेच आर्थिक विश्लेषक असे देखील म्हटले जाते.फायनान्शिअल अॅनॅलिस्ट याची कुठल्याही कंपनीत,वित्तीय संस्था मध्ये अत्यंत महत्वाची भुमिका असते.

फायनान्शिअल ऍनालिस्टहा कंपनीमधील सर्व आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे काम करत असतो.याचसोबत कंपनीच्या सर्व डेटाला एकत्रित करून त्याचे विश्लेषण करण्याचे काम फायनान्शिअल अॅनॅलिस्ट करीत असतो.

यात तो कंपनीचे एकुण बजेट किती आहे?कंपनीने एकुण किती पैसे खर्च केले आहेत?कंपनीने वर्षभरात किती नफा मिळवला आहे कंपनीला किती तोटा झाला आहे ह्या सर्व गोष्टींचे विश्लेषण फायनान्शिअल ऍनालिस्टकरीत असतो.

विश्लेषणात कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब दिसत असल्यास त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी फायनान्शिअल ऍनालिस्टहे नवनवीन उपाययोजना करीत असतात.जेणेकरून कंपनीला तोटा न होता फायदा होईल कंपनीच्या खर्चात कपात होऊन कमाई मध्ये अधिक वाढ होईल.

कंपनीच्या वर्षभरातील कामगिरी बाबद एक डेटा तयार करतो ज्यात सर्व माहिती दिलेली असेल की कंपनीची कामगिरी कधी चांगली होती कधी खराब होती कंपनीला कधी फायदा झाला कधी तोटा झाला इत्यादी बाबींचा अहवाल तयार करणे.

याआधीची कंपनीची कामगिरी कशी होती नवीन वर्षात ह्या कामगिरी मध्ये किती घट तसेच वाढ झाली आहे.कंपनीच्या प्राॅफिट मध्ये किती वाढ,घट झाली आहे हे बघण्याचे काम देखील फायनान्शिअल अॅनॅलिस्ट करीत असतो.

कंपनीची मागील काही वर्षांतील कामगिरी कशी आहे? सध्याची कंपनीची कामगिरी कशी आहे भविष्यात यात वाढ पाहायला मिळु शकते की घट याचा एक अनुमान लावून अंदाजे रिपोर्ट तयार करणे

अणि ह्या तयार केलेल्या अंदाजे रिपोर्ट नुसार सर्व घडुन येत आहे किंवा नाही हा तयार केलेला अहवाल किती टक्के अचुक होता हे चेक करण्याचे काम देखील फायनान्शिअल ऍनालिस्टकरीत असतो.

See also  १० वी पासवर महाराष्ट्र राज्य कौशल विकास सोसायटी मध्ये अॅप्रेन्टिएस पदासाठी भरती सुरू - MSSDS recruitment 2023 in Marathi

फायनान्शिअल ऍनालिस्टला आपल्या फील्ड मध्ये येत असलेल्या नवनवीन ट्रेंड नुसार स्वताला अपडेट करत राहावे लागते.नवनवीन गोष्टींचे ज्ञान प्राप्त करत राहणे आवश्यक आहे.

कंपनीच्या सध्याच्या कार्यरत असलेल्या आर्थिक धोरणांमध्ये कोणत्या प्रकारचे बदल करायला हवा कोणते बदल घडवून आणने आवश्यक आहे याविषयी आर्थिक सल्ला देण्याचे काम देखील फायनान्शिअल अॅनॅलिस्ट करीत असतात.

फायनान्शिअल ऍनालिस्टहे कंपनीला भविष्यात कराव्या लागत असलेल्या खर्चाविषयी सल्ला देणे,नफा प्राप्त करण्यासाठी बाजारात कुठे अणि कशी गुंतवणूक करायची हे देखील फायनान्शिअल अॅनॅलिस्ट सांगत असतो.

कुठल्याही कंपनीच्या आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा घडुन येण्यासाठी कंपनीने काय करायला हवे कोणते पाऊल उचलायला हवे जेणेकरून त्या कंपनीला जास्त तोटा होणार नाही हा सल्ला देण्याचे काम देखील फायनान्शिअल ऍनालिस्टचे असते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा