पर्सनल असिस्टंटचे,पर्सनल सेक्रेटरीचे काम काय असते?Personal assistant, personal secretary job
आपल्या दैनंदिन जीवनात आपण खुप जणांच्या तोंडुन हा शब्द ऐकत असतो.अनेक कंपनींमध्ये शासकीय कार्यालयात सुदधा पर्सनल सेक्रेटरीची पर्सनल असिस्टंटची नियुक्ती करण्यात येत असते.
खुप जण पर्सनल असिस्टंट म्हणून काम करत असतात अशा व्यक्तींना जाणुन घेण्याची ईच्छा असते की पर्सनल असिस्टंट याला काय काम करावे लागते.
याचकरीता आजच्या लेखात आपण पर्सनल असिस्टंट म्हणजे काय?यांचे काम काय असते हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
पर्सनल असिस्टंट म्हणजे काय?
पर्सनल असिस्टंट म्हणजे वैयक्तिक सहाय्यक.पर्सनल असिस्टंट हे पद केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध विभागात तसेच वेगवेगळ्या संस्थांमध्ये कंपनींमध्ये उच्च पदावर काम करत असलेल्या मोठमोठ्या अधिकारींचा स्वताचा एक वैयक्तिक सहाय्यक (पर्सनल असिस्टंट) असतो.
पर्सनल असिस्टंटला पर्सनल सेक्रेटरी असे देखील म्हटले जाते.
पर्सनल असिस्टंटचे काम काय असते? त्याची भुमिका तसेच जबाबदारी काय असते?
आज मोठमोठ्या संस्था,कंपनी शासकीय कार्यालयात मंत्रालयात उच्च पदस्थ अधिकारी वर्गाच्या हाताखाली काम करण्यासाठी एक विशिष्ट व्यक्तीची नेमणूक केली जाते जो त्या वरिष्ठ अधिकारीची सर्व आॅफिशिअल कामकाजे सांभाळत असतो.
विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या हाताखाली देखील एक पर्सनल असिस्टंट असतो.जो त्यांची सर्व वैयक्तीक कामे हाताळण्याचे काम करतो.
जसे की त्या नेत्याला येत असलेले सर्व काॅल अटेंड करणे, त्याच्या मिटिंग शेड्युल करणे,त्याच्या दिवसभराच्या दिनचर्येचे नियोजन करणे इत्यादी
पर्सनल असिस्टंट ज्या उच्च पदस्थ अधिकारीचा, राजकीय नेत्याचा पीए असतो.त्याच्या सांगण्यानुसार त्याने दिलेल्या आॅडर नुसार त्याला सर्व कामे करावी लागत असतात.
पर्सनल असिस्टंट हा संबंधित अधिकारीच्या आॅफिशिअल प्रत्येक कामात त्याची मदत करत असतो.त्या अधिकारीची सर्व कार्यालयीन शासकीय कामे करीत असतो.
त्या अधिकारीच्या रोजच्या मिटिंगचे वेळापत्रक तयार करणे,मिटिंग शेड्युल करणे, मिटिंगची सर्व व्यवस्था करणे संबंधित अधिकारीचे सर्व फोन काॅल अटेंड करणे,आलेले मेल चेक करणे मेल सेंड करणे,कंप्युटरवर बसुन आवश्यक ते लेटर टाईप करणे ड्राफ्ट करणे,रोजच्या भेटीसाठी अपाॅईटमेंट फिक्स करणे,दिवसभरातील दिनचर्येचे नियोजन करणे इत्यादी सर्व वैयक्तीक महत्वाची कामे पर्सनल असिस्टंट करीत असतो.
मोठमोठ्या सेलिब्रिटी अभिनेते अभिनेत्री देखील आपल्या हाताखाली पर्सनल असिस्टंट ठेवत असतात.जो शुटिंग दरम्यान त्यांचे सर्व काॅल अटेंड करतो त्यांच्या रोजच्या शुटिंगचे शेड्युल तयार करतो.इत्यादी त्यांची सर्व आवश्यक कामे बघत असतो.