धनंजय चंद्रचूड कोण आहेत? | D Y Chandrachud Biography
धनंजय चंद्रचूड हे भारताचे ५० वे सरन्यायाधीश आहेत.नोव्हेंबर २०२२ मध्ये भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ धनंजय चंद्रचूड यांनी घेतली होती. धऩंजय चंद्रचूड हे एक मराठमोळे व्यक्ती आहेत.
धनंजय चंद्रचूड हे नेहमी त्यांनी घेतलेल्या निर्णायक न्यायालयीन निर्णय यामुळे लोकांमध्ये नेहमी चर्चेचा विषय ठरले आहेत.
धनंजय हे मुळचे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेर सर गावात राहणारे व्यक्ती आहेत.धनंजय चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला होता.
धनंजय चंद्रचूड यांचे पुर्ण नाव धनंजय यशवंत चंद्रचूड असे आहे.
धऩंजय चंद्रचुड यांचे पिता यशवंत चंद्रचूड अणि स्वता धनंजय चंद्रचूड हे भारत देशातील सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून जाणारी बाप मुलाची पहिली जोडी म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे.
धनंजय चंद्रचूड यांचे पिता यशवंत चंद्रचूड कोण होते?
यशवंत चंद्रचूड यांची भारताच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली होती.सुमारे सात वर्षे ४ महिने इतक्या कालावधीकरीता सरन्यायाधीश पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती.
यशवंत चंद्रचूड हे भारतातील शहाबानो नावाच्या एका खटल्यावर ऐतिहासिक निर्णय देणारे सरन्यायाधीश म्हणून ओळखले जातात.
यशवंत चंद्रचूड यांचा परंपरागत हाच वारसा जपण्याचे काम आता त्यांचे पुत्र यशवंत चंद्रचूड हे देखील करीत आहे जे भारताच्या सध्याच्या न्यायाधीश पदावर कार्यरत आहे.
कोण आहेत कानपुरचे करोली बाबा त्यांचे नाव सध्या एवढ्या चर्चेत का आहे?
धनंजय चंद्रचूड यांच्या मातोश्री –
धनंजय चंद्रचूड यांच्या आई प्रभा चंद्रचूड शास्त्रीय संगीतकार म्हणून प्रचलित आहे.
धनंजय चंद्रचूड यांचे शिक्षण –
धनंजय यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईत पुर्ण केले धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी भारतातील दिल्ली विद्यापीठा मधून कायद्याची पदवी प्राप्त केलेली आहे.
याचसोबत त्यांनी दिल्ली विद्यापीठातुनच गणित अर्थशास्त्र ह्या विषयात देखील डिग्री प्राप्त केलेली आहे.धनंजय यांनी हाॅरवर युनिव्हर्सिटी मधुन एल एल एम ही पदवी देखील प्राप्त केलेली आहे.
हाॅरवर युनिव्हर्सिटी याने त्यांना जोसेफ बेले हा न्याय शास्त्र विषयातील सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित देखील केले असल्याचे सांगितले जाते.
धनंजय चंद्रचूड हे २०१६ मध्ये १३ मे रोजी भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान झाले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या अणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर देखील त्यांनी काम केले आहे.
२०१३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत झाले होते.त्या़ंचा कार्यकाळ २९ मार्च ते ३१ आॅक्टोंबर हा होता.
धनंजय चंद्रचूड यांचे न्यायालयीन क्षेत्रातील योगदान –
धनंजय चंद्रचूड यांनी आतापर्यंत अयोध्या शबरीमाला समलैंगिकता आधार अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर योग्य तो न्याय निवाडा केला आहे.
याचसोबत कायद्याच्या अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणे, महाराष्ट्र राज्यातील न्यायाधीशांना प्रशिक्षण देणे विधी अणि न्याय यांच्याशी संबंधित विषयांवर लेखन करणे युनिव्हर्सिटी मध्ये व्याख्यान देणे अशी अनेक कामे धनंजय चंद्रचूड यांनी केली आहेत.
धनंजय चंद्रचूड यांचे वेतन किती आहे?
न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर असे सांगितले आहे की सरन्यायाधीश यांना मासिक दोन लाख ८० हजार इतके वेतन प्रदान केले जाते.
म्हणजेच सरन्यायाधीश यांचे वेतन देशाचे राज्यपाल राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना मिळत असलेल्या वेतनानंतरचे अधिक वेतन आहे.सरनयायाधीशास पाहुणचार म्हणून दरमहा ४५ हजार अतिरीक्त खर्च देखील दिला जातो.
याचसोबत सरन्यायाधीश यांना राहायला घर,कार फोनचे बिल सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक अशा इतर अनेक सेवा सुविधा देखील दिल्या जात असतात.
निवृत्तीनंतर देखील देशाचे सरन्यायाधीश यांना वार्षिक १६ लाख ८० हजार इतके पेंशन दिले जाते.
धनंजय चंद्रचूड यांच्या विषयी इतर महत्वाची वैयक्तिक माहिती –
- धनंजय चंद्रचूड यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू २००७ मध्ये कर्करोग झाल्याने झाला होता.आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी काही वर्षांत दुसरा विवाह देखील केला.
- आपल्या निधन झालेल्या पहिल्या पत्नी पासुन धऩंजय यांना दोन अपत्ये आहेत.ज्यांचे नाव अभिनव अणि चिंतन असे आहे.हे दोघेही त्यांच्या वडिलांप्रमाणे व्यवसायाने वकिल आहेत.
- धनंजय चंद्रचूड यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कल्पणा दास असे आहे.कल्पणा दास ह्या देखील व्यवसायाने वकिल आहेत.
- धनंजय यांना त्यांच्या निधन झालेल्या पहिल्या पत्नीपासून दोन अपत्ये आहेत याशिवाय त्यांनी दोन अनाथ मुलींना देखील दत्तक घेतले आहे.एका मुलींचे नाव माही आहे अणि एकीचे प्रियांका असे आहे.
- असे सांगितले जाते की खेड तालुक्यातील कनेरसर ह्या त्यांच्या गावामध्ये चंद्रचूड नावाचा एक विशाल वाडा आहे.खेड तालुक्यातील कनेरसर ह्या त्यांच्या गावामध्ये त्यांचे काही कुटुंबीय शेती देखील करतात.
- धनंजय चंद्रचूड हे आपल्या कुटुंबातील सभासदांना घेऊन निमगावातील खंडोबा मंदिरात आपले गावाचे कुलदैवत तसेच कनेरसर गावात यमाई देवी मंदिरात दर्शनासाठी कुठलीही पुर्वसचना न देता अधुन मधुन येत असल्याचे येथील स्थानिक रहिवासी सांगतात.
- कनेरसर गावात कुठल्याही प्रकारचा राजकीय सामाजिक धार्मिक बाबींशी काहीही संबंध नसताना देखील ते कनेरसर गावा मधील लोकांच्या मदतीसाठी अनेकदा धावून गेले आहेत असे येथील लोक सांगतात.
- धनंजय चंद्रचूड यांनी स्त्रियांकरीता घेतलेले आतापर्यंतचे काही महत्त्वाचे निर्णय –
- शबरीमाला मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश देणे कायम राहील.हा त्यांचा महिलांविषयी घेतलेला एक निर्णायक महत्वाचा निर्णय होता.
याचसोबत २० ते २४ आठवडे गर्भवती असलेल्या अविवाहित महिलेस गर्भवती महिलांप्रमाणे सुरक्षित गर्भपात करता येईल हा निर्णय धनंजय चंद्रचूड यांनी महिलांसाठी घेतला होता.