जीवनसत्वे आणि खनिजे या दोघांमधील फरक काय आहे? Difference Between Vitamins and Minerals

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

जीवनसत्वे आणि खनिजे  म्हणजे काय ? Difference Between Vitamins and Minerals

 जीवनसत्वे आणि खनिजे हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी तसेच विकासासाठी आवश्यक असलेले दोन महत्वपुर्ण घटक तसेच पोषकतत्वे आहे.

ही दोन्ही पोषकतत्वे आपल्या शरीरात त्यांच्या वेगवेगळया भुमिका पार पाडत असतात.आणि ही पोषकतत्वे आपल्या शरीरामध्ये तयार होत नसल्याने आपल्याला ही विविध अन्नपदार्थांद्वारे ग्रहण करावी लागत असतात.

जीवनसत्वे आणि खनिजे आपली हाडे मजबुत करण्याचे काम करता,आपल्या जखमा भरून काढत असतात.आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ घडवून आणत असतात.

ही पोषकतत्वे विविध अन्न पदार्थांद्वारे आपल्या शरीराला प्राप्त होत असतात आणि आपल्या शरीराला उर्जा प्रदान करीत असतात.आपल्या शरीराच्या खराब झालेल्या पेशींची दुरूस्ती देखील ही पोषकतत्वे करीत असतात.

जर या दोघांपैकी कुठलेही एक पोषकतत्वे जरी आपल्या शरीरास प्राप्त झाले नाही तरी आपल्याला आपल्या शरीरात ह्या पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे स्कर्वी,मुडदुस,असे अनेक शारीरीक विकार जडत असतात.

यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की ही दोघे पोषकतत्वे आपल्या शरीरासाठी किती महत्वाची आहेत.पण एक गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी की ही दोघे पोषकतत्वे आपल्या शरीराच्या वाढीसाठी,विकासासाठी समानतेने आवश्यक असली तरी या दोघांमध्ये बरेच अंतर आहे.

आजच्या लेखात आपण जीवनसत्वे  आणि खनिजे यादोघांमध्ये काय अंतर आहे हेच जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Vitamin Foods list in Marathi – B12 जीवनसत्वे फायदे

जीवनसत्वे  म्हणजे काय?

 जीवनसत्वे  हा असा सेंद्रिय घटक आहे ज्याची आवश्यकता आपल्या शरीराला फार कमी प्रमाणात असते.जीवनसत्वे  ही शरीरात निर्माण होत नाही त्यामुळेच आपण आपल्या शरीराला जीवनसत्वे  प्राप्त होण्यासाठी विविध अन्नघटकांचे सेवन करत असतो.

See also  भारतात सकाळी 7 वाजत असल्यास- त्या वेळी जगभरातील 25 मोठ्या शहरांमध्ये काय वेळ आहे -Time Difference between New India and the World

 

जीवनसत्वे  ही दोन प्रकारची असतात एक पाण्यात विरघळतात ती आणि दुसरी चरबीमध्ये विरघळतात अशी असतात.जी पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे  असतात ती आपण आपल्या शरीरात जास्त काळासाठी साठवून ठेवू शकत नसतो.कारण ती लघवीवाटे उत्सर्जित होत असतात.

 

पण याचठिकाणी जी चरबीद्वारे विरघळणारी जीवनसत्वे  असतात ती आपल्या शरीरातील फँटी टिशू तसेच यकृतात साठवली जातात ज्यामुळे ही जीवनसत्वे  आपण आपल्या शरीरात अनेक दिवस साठवून ठेवू शकतो.

 

खनिजे म्हणजे काय? –Minerals

 खनिजे ही आपल्या शरीराला अनेक अन्नघटकांद्वारे प्राप्त होत असतात.ज्यात मासे,दुध,मांस,शेंगदाणे तसेच इतर तृणधान्य.

पण जशी आपल्या शरीराला सर्व जीवणसत्वांची आवश्यकता असते तशी सर्व खनिजांची आवश्यकता नसते.हेच जर आपण उदाहरणाद्वारे समजुन घ्यायचे म्हटले तर कँल्शिअम,मँग्नेशिअम,फाँसफरस्,सोडिअम आणि पोटँशिअम यांची आवश्यकता आपल्या शरीराला लोह आणि जस्त पेक्षा अधिक विपुल प्रमाणात असते.

थोडक्यात आपल्याला आपले शरीर चांगले ठेवण्यासाठी पुरेशा जीवणसत्वांची आवश्यकता असते.तर शरीराला आवश्यक अशी काही खनिजे प्राप्त होण्यासाठी आपण संतुलित आहाराचे सेवण करायला हवे.

 

जीवनसत्वे  आणि खनिजे या दोघांमध्ये फरक काय आहे?Difference Between Vitamins and Minerals

फरकजीवनसत्वेखनिजे
स्त्रोतजीवनसत्वे प्राणी आणि वनस्पती या दोघांपासुन प्राप्त होत असलेला सेंद्रिय घटक आहे

 

व्हिटँमिन हे आपणास प्राणी तसेच वनस्पतींपासुन प्राप्त होत असतात.

खनिजे ही पृथ्वीवर उदभवलेली अजैविक संयुगे असतात.

तर खनिजे आपणास माती आणि पाण्यापासुन प्राप्त होत असतात.

 

संख्याजीवनसत्वे  ही एकुण तेरा आहेत.आणि शरीराला ही सर्व जीवनसत्वे  मिळणे आवश्यक असते.

 

सर्व खनिजांची आपल्या शरीराला आवश्यकता नसते.

 

वर्गीकरण.जीवणसत्वांचे वर्गीकरण पाण्यातुन विरघळणारे आणि चरबीद्वारे विरघळणारे अशा दोन गटांत केले जाते.

 

खनिजांचे वर्गीकरण मायक्रोमिनरल आणि मँक्रोमिनरल अशा दोन गटांत वर्गीकरण केले जाते.

 

उपयोगजीवनसत्वे  आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींना विकसित करीत असतात.जीवनसत्वे  रक्त गोठण्यास देखील साहाय्य करीत असतात.अन्नातुन उर्जा देखील सोडत असतात.याचसोबत आपले डोळे,त्वचा,केस निरोगी राखण्यास मदत करत असतात.

 

खनिजे ही रक्त गोठण्यास आणि स्नायुंचे आकुंचन पावण्यास मदत करीत असतात.खनिजे ही हाडांसाठी देखील खुप फायदेशीर असतात.

 

उदाहरणजीवणसत्वाची उदाहरणे :

व्हिटँमिन ए,

व्हिटँमीन बी,

व्हिटँमिन सी,

व्हिटँमिन के,

व्हिटँमिन ई तसेच

व्हिटँमिन डी इत्यादी आहेत.

 

खनिजांची उदाहरणे आयर्न,मँग्नेशियम,सोडिअम,पोटँशिअम,मँग्नीज तसेच कँल्शिअम ही आहेत.

कॅल्शियम -Calcium

फॉस्फरस-Phosphorous

मॅग्नेशियम-Magnesium

सोडियम-Sodium

पोटॅशियम-Potassium

क्लोराइड-Chloride

सायट्रेट Citrate

 

 

See also  भारतीय निवडणूक आयोगाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बनवले नॅशनल आयकाॅन _ Sachin Tendulkar appointed as the National Icon of Election Commission of India.

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा