माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३ विषयी माहिती -Mazi Kanya Bhagyashree Scheme Maharashtra (MKBS)
माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे?
माझी कन्या भाग्यश्री ही खासकरून मुलींसाठी सुरू केलेली एक सरकारी योजना आहे ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे.
मुलींचे भविष्य देखील मुलांप्रमाणे उज्वल बनावे म्हणून ह्या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारकडून १ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली होती.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कोणाला होणार आहे?
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ फक्त महाराष्टातील मुळ रहिवासी असलेल्या बालिका म्हणजेच मुलींना होणार आहे.
ज्या कुटुंबाचे १ आॅगस्ट २०१७ पासुनचे एकुण वार्षिक उत्पन्न ७.५ लाख इतके आहे.अणि त्यात एक किंवा दोन मुली जन्माला आल्या आहेत अशा कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे.
ज्यांना पहिले अपत्य मुलगा झाला आहे मग दुसरे अपत्य मुलगी किंवा पहिले अपत्य मुलगी झाली आहे अणि दुसरे अपत्य मुलगा अशा कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्याचा शासनाचा मुख्य उद्देश कोणता आहे?
समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यामधील केला जात असलेला भेदभाव दुर करण्यासाठी समाजामधील लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
ह्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट राज्यातील असे कुटुंब जिथे एक किंवा दोन मुली जन्माला आल्यानंतर नसबंदी करण्यात येते.अशा कुटुंबियांना ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार ५० हजार रुपये इतकी रक्कम देणार आहे.
योजनेचे काही मुख्य हेतु –
● मुलींच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणने.
● समाजात मुलींना उच्च दर्जा प्राप्त करून देणे
● मुलींना उच्च दर्जाचे उत्तम शिक्षण प्राप्त करून देणे त्यांना आत्मनिर्भर बनवणे
● समाजात केला जात असलेला मुलगा मुलगी मधील भेदभाव थांबवणे.
● समाजात होत असलेल्या स्त्रीभ्रुणहत्या थांबवणे.
● समाजात मुलींचे प्रमाण वाढवणे
इत्यादी अशा प्रमुख हेतुंच्या पुर्तीसाठी सरकारने माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविलेली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे प्रमुख नियम तसेच अटी कोणत्या आहेत?
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने काही महत्त्वपुर्ण नियम तयार केलेले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत-
● ज्या कुटुंबांमध्ये एक मुलगी जन्माला येईल त्या कुटुंबाला माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत ५० हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल.
● अणि एकाच कुटुंबात दोन मुलींचा जन्म झाला तर पालकांची त्वरित नसबंदी करून अणि दोन्ही मुलींना प्रत्येकी २५-२५ हजार इतकी रक्कम शासनाकडून ह्या योजनेअंतर्गत दिली जाते.
● ह्या योजनेचा लाभ त्याच कुटुंबाला होईल ज्या कुटुंबात एक किंवा जास्तीत जास्त दोनच मुली जन्माला आल्या आहेत.
● योजनेसाठी अर्ज करीत असलेले कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असणे अनिवार्य आहे.
● माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेणारया मुलीच्या आईचे बँकेमध्ये अकाऊंट ओपन असायला हवे.अणि मुलीचे अणि तिच्या आईचे बँकेमध्ये जाॅईण्ट खाते असायला हवे.
● दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तसेच मुलगी अविवाहित असतानाच मुलीला ही योजनेची रक्कम दिली जाईल.सदर योजनेअंतर्गत प्रथमत मुलगी सहा वर्षांची झाली का व्याज दिले जाते अणि पुढचे व्याज मुलगी बारा वर्षांची झाली का मग दिले जाते.अणि संपूर्ण रक्कम मुलीच्या हातात ती अठरा वर्षाची झाल्यावर देण्यात येईल.
● एक मुलगी जन्माला आल्या नंतर माता पित्याने शस्त्रक्रिया केली की मुलीच्या नावावर बँकेमध्ये ५० हजार रुपये मुदत ठेव म्हणून गुंतविले जात असतात.अणि दोन मुली जन्माला आल्यानंतर माता पिता जेव्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतात तेव्हा पहिल्या अणि दुसऱ्या अशा दोघे मुलींच्या नावावर बँकेमध्ये प्रत्येकी २५/२५ हजार मूदत ठेव म्हणून ठेवले जात असतात.
● दोघे लाभार्थी मुलींचे स्वतंत्र खाते बँकेत ओपन करणे गरजेचे आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्र कोणकोणते आहेत?
● माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेणारया मुलीचे आधार कार्ड बनवलेले असावे.
● कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाण
● राशन कार्ड
● महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे प्रमाण
● दोन पासपोर्ट साईज फोटो
● संपर्क साधण्याकरीता मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी
● माता पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाण
● मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
माझी कन्या भाग्यश्री तर योजनेअंतर्गत प्राप्त होणारया रक्कमेचा वापर आपण कशासाठी करू शकतो?
● माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत प्राप्त होत असलेल्या रक्कमेचा वापर आपण मुलींच्या उच्च शिक्षणासाठी लग्नासाठी उज्वल भविष्यासाठी करू शकतो.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपणास सर्वप्रथम आॅनलाईन फाॅम डाऊनलोड करावा लागेल.
नंतर डाऊनलोड केलेला फाॅम व्यवस्थित वाचून मग भरून घ्यायचा आहे.फाॅमला आवश्यक ते डाॅक्युमेंट जोडुन घ्यायचे आहे.
अणि मग महिला बालविकास कार्यालयात जाऊन सदर फाॉम जमा करायचा आहे.