लोन किती प्रकाराचे असतात -Loan types in Marathi
आपल्याला बऱ्याच आर्थिक गरजा भागवण्याकरता पैश्यांची गरज वेळोवेळी पडत असते. नोकरदार असो की व्यावसायिक मिळणारा पगार किंवा कमाई पुरेसे नसते व आपल्याला लागणारी रक्कम जास्त असते अश्या वेळी पैश्याची तजवीज करणे भाग असते उधार घेऊन किंवा लोन घेऊन.
नाविन घर, त्या घरात काही रेनोवेशन असो किंवा घरातील काही आवश्यक साधने, उपकरण खरेदी, ह्या खरेदी साठी,लोन हा एक उत्तम पर्याय असतो, पण लोन घेण्याआधी लोन बाबत पूर्ण, बारकाईने माहिती घेणं आवश्यक असते.
लोन म्हणजे काय ?
लोन म्हणजे पैसे जे लोन घेणारा काही नियम,अटी व कायद्यानुसार ते ठराविक कालावधीत लोन देणाऱ्याला परत करेल असा करार करतो.
कोणत्या प्रकारची लोन (ऋण) बाजारात उपलब्ध असतात.-How many Types of loan in Marathi
ह्या लेखात बऱ्याच लोन बद्दल महिती असली तरी वेगवेगळ्या बॅंका कडे लोन मंजूर प्रक्रियेत ,लागणाऱ्या कागद पत्रात मामुली बदल पाहावयास मिळतात.
गृहकर्ज- Home Loan
सर्वात गरजेचं आणि लोकप्रिय असे लोन स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकला ह्या लोन बद्दल माहिती हवी असते.
आपल्याला घर विकत घेण्यासाठी हे लोन बँकेकडून दिले जाते॰ ह्यात दोन व्याजदर असतात एक फिक्सड म्हणजे स्थिर निश्चित आणि वेरीबल म्हणजे बदलत असलेले व्याज दर असतात,त्यातून आपण वेळोवेळो सविस्तर माहिती घेऊन व्याजदर निवडू शकता ,कारण दोन्ही प्रकारचे व्याजदरा चे काही फायदे तोटे असतात.
लोन घेण्यासाठी आपल्याला काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात जसे नोकरी व्यवसाय असेल तर इन्कम प्रूफ, इनकम टॅक्स सर्टिफिकेट. आपल इन्कम जास्त असेल आणि आपण सातत्याने इनकम टॅक्स भरत असाल तर होम लोन सहजरित्या उपलब्ध होते .
- व्याजदर – 6.75 ते 11/12%
- इनकम टॅक्स मध्ये सूट
- आर्थिक आवक चांगली असेल तर जास्त लोन मिळू शकते
- घर किमतीच्या साधारण 85%लोन मिली शकते
- लोन परत करण्या करता बरेच पर्याय उपलब्ध
सोन ऋण- Gold Loan
आपल्याला पैश्यांची ची नितांत आवश्यकता असल्यास आपण आपल्याकडील सोन तारण ठेवून त्या विरुद्ध लोन घेऊ शकता. ह्यात तुललेने लोनवरील व्याज कमी असते पण आपल्याला आपल सोनं मात्र बँकेकडे किंवा लोन देणाऱ्या संस्थे कड सुपूर्द करावं लागते. हे लोन बॅंक्स तसेच वित्तीयसंस्था कडून सहज मिळते, कागदपत्र कमी लागतात , लोन प्रक्रिया दुसर्या लोन च्या मानाने सोपी व सुलभ, कारण आपण सोन गहाण ठेवत असतात आणि फक्त आपल्याला आपली ओळख पठवून द्यायची असते.
- तारण – आपल्याकडे असलेले सोन
- व्याजदर – 7.5-29 %(सरकारी बँक , खाजगी बँक व nonbank financial institutions)
- सोन्याच्या एकूण किमतीच्या 75% लोन मिळू शकते
वैक्तिक लोन पर्सनल लोन- Personal Loan
वर म्हटल्याप्रमाणे जीवनात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपल्याला तात्काळ पैश्यांची गरज पडतेच , इन्शुरन्स नसतील तर आजारपणच खर्च ,काही अत्यावश्यक खरेदीसाठी किंवा न टाळता येण्या सारखे खर्च ,अचानक करावा लागणार प्रवास खर्च , लग्न समारंभ किंवा घरात लागणारे काही इतर खर्च .अश्या वेळी हे लोन आपल्या मदतीला येऊ शकते.
- व्याज दर – 8.45 -25-33 %
- सर्वात महाग व्याजदर असलेले लोन
- लोन नोकरदार व व्यवसायिक लोकांना तात्काळ मिळते
- आपले क्रेडिट स्कोअर चांगला असयाला हवा
मालमत्ता ऋण- Property Loan
यात आपण वित्तीय संस्थाकडून लोन घेऊ शकतात त्या करता आपल्याला आपली स्थावर मालमत्ता तारण ठेवावी लागते, जसे घर , दुकान किंवा जागा ,यात व्याज ही कमी असते कारण आपण आपली प्रॉपर्टी गहाण ठेवत असल्याने बँकांची जोखीम कमी होते.
- व्याजदर – 8.80-12.50%
- मालमत्तेच्या एकूण किमतीच्या 60-70% लोन मिळू शकते ,
- तारण – मालमत्तेचे कागद पत्रे
शैक्षणिक लोन-Educational Loan
सहसा दोन परिस्थितीत या लोन ची गरज पडते,आपल्याला आपल्या मुलांच्या उच्च शिक्षण साठी जास्त पैसे लागू शकतात अश्या वेळी आपण हे लोन घेवू शकतात तसेच आपण विद्यार्थी असाल तर ,निश्चित असे उत्पन्न असेल अश्या पालकांना गॅरंटर (हमी देणारे )घेऊन आपण हे लोन घेऊ शकता.
- सहसा सर्व बँक असे लोन सहजरित्या उपलब्ध करून देतात.
- 80 E अंतर्गत करा त सूट
- 30-15.20% व्याज दर ‘
वाहन लोन- Vehicle Loan
- सर्व बँक व लोन देणाऱ्या वित्तीय संस्था हे लोन देत असतात. लोकांमध्ये हे लोन प्रकार बराच लोकप्रिय असून ह्या द्वारे आपली स्वतःची एकादी कार वा बाईक असावी हे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
- आपल्या कडे उत्तम स्थावर मालमत्ता असेल तर हे लोन सहज मिळते किंवा किमान आपल्याला चांगल्या मासिक पगाराची नोकरी हवी.
- व्याज दर 7.30-9%
मोठ्या संस्था वा कॉर्पोरेट लोन- Corporate Loan
- मोठया व्यावसायिक कंपण्याकरता, आपला व्यवसाय वाढवण्याकरता बॅंक हे लोन उपलब्ध करून देतात. कंपनीची वार्षिक उलाढाल व ताळेबंद पाहून हे लोन दिलें जाते.
- व्याज दर 15.65-21.50%
प्रकल्प लोन- PMEPG सारखे
- आपन एकदा कोणत्याही उत्पादन वा प्रमाणित क्षेत्रांत काही प्रकल्प उभारत असाल तर बँक हे लोन देतात.
- व्याजदर -11-13%
ह्या व्यतिरिक्त खालील काही प्रकराचे लोन उपलब्ध असतात.- How many Types of loan in Marathi
म्युचल फंड व शेअर्स तारण कर्ज- Loan against Shares and MF
- आपल्याकडे असल्या म्युचल फंड व शेअर्स तारण ठेवून त्याच्या रकमेवर 50-60% टक्के लोन मिळू शकते
- व्याजदर – 50-16%
- धोका- शेअर बाजारशी निगडित असल्याने बाजारात होणाऱ्या चढ उताराचा परिणाम होऊ शकतो.
मुदत ठेवी तारण कर्ज- Loan against FD
- आपल्या ठेवींच्या 90% लोन आपल्याला मिळू शकत.
- FD व्याजदर पेक्ष्या1-2% जास्त
- FD संयुक्त खात्यात असेल तर दोन्ही खातेदार ना अटी मान्य असाव्या लागतात.
वाहन तारण कर्ज- Loan against Vehicle
- यात आपण वाहन मालक असाल तर आपले वाहन तारण ठेवून आपल्याला लोन मिळू शकते.
- सहसा – 70% पर्यन्त वाहनांच्या किमतीच्या लोन मिळते
- व्याज दर -13.75-17%
- वाहन जास्त जुने असु नये. वाहन चांगल्या कंपनीच व उत्तम स्तिथीत असेल तर मात्र आपल्याला लोन सहज मिळू शकते
जीवन विमा तारण लोन -Loan Against insurance policy
- आपले विमा योजनांच्या कागदपत्रे तारण ठेवून ,साधारण 14% व्याजदराने मिळू शकते.
- एकूम विमा रकमेच्या 90% पर्यंत लोन मिळू शकते.
- ह्यात काही ठराविक विमा योजना फक्त पात्र असतात.पॉलिसी लोन काळापर्यंत लोन देणाऱ्या संस्थे च्या ताब्यात द्याव्या लागतात.
- व्याज दर -10-13%
टॉप आप लोन –
- घरच्या दुरुस्ती करता किंवा काही बदल , सुधारण्यासाठी हे लोन मिळत साधारण 45-14% व्याज
लोन – प्रायव्हेट प्रॉव्हिडंट फंड –
- पीपीएफ च्या विरुद्धा मिळणरे लोन सर्वात स्वत असते 1-2% व्याजदर
- ग्रामीण लोन- शेती साधन , उपकरणं करता ,शेती करण्याकरिता लोन दिले जाते
मुद्रा लोन-
- लहान व मध्यम आकाराच्या व्यवसायना सरकार कडून हे 10 लाखा पर्यंत हे लोन दिले जाते व्याजदर साधारण 50% पासून पुढे
ह्या व्यतरिक्त आपण , किसान विकास पत्र (KVP) नॅशनल सेविंग सर्टिफिकेट्स NSC व नाबार्ड भविष्य निर्माण बोण्ड्स वर सुद्धा लोन घेवू शकता
वरील लेखात शक्य तितकी योग्य व उपयोगात येईल अशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तरी लोन बाबत निर्णय घेताना अधिकृत वित्तीयसंस्थे शी संपर्क करून सविस्तर माहिती व बारकाईने सर्व नियमांचा अभ्यास करून आर्थिक निर्णय घ्यावेत
very useful information sir . thanks…
Thank you very much !!