निरोगी जीवणासाठी आपली रोजची दिनचर्या कशी असायला हवी?How should our daily routine be for a healthy life in Marathi?

निरोगी जीवणासाठी आपली रोजची दिनचर्या कशी असायला हवी?How should our daily routine be for a healthy life in Marathi?

मित्रांनो आपल्यापैकी खुप जण हा प्रश्न विचारत असतात की आपण आजारी पडु नये,आपले शरीर नेहमी निरोगी तंदुरूस्त अणि फीट राहावे यासाठी आपली रोजची दिनचर्या कशी असायला हवी?

आपल्या ह्याच प्रश्नाचे उत्तर आजच्या लेखात आपण जाणुन घेणार आहोत.

निरोगी जीवण जगण्यासाठी आपली रोजची दिनचर्या कशी असायला हवी?How should our daily routine be for a healthy life?

मित्रांनो जर आपणास असे वाटत असेल की आपण नेहमी निरोगी अणि तंदुरूस्त राहावे.आपल्याला कुठलाही शारीरिक तसेच मानसिक आजार जडु नये.आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदैव उत्तम राहावे.

तर आपण पुढील दिनचर्येचे पालन नक्की करायला हवे.

1)रात्री वेळेवर झोपणे/सकाळी लवकर उठणे –

मित्रांनो आपल्याला जर नेहमी अणि तंदुरूस्त राहायचे असेल तर आपण सर्वानी रात्री उशिरापर्यत मोबाइल खेळत बसु नये.टिव्ही देखील बघत बसु नये वेळेवर झोपायला हवे.अणि सकाळी देखील लवकर सुर्योदयाच्या आधी झोपेतुन उठायला हवे.

सुर्योदयापुर्वी उठल्याने सकाळची ताजी टवटवीत हवा उर्जा आपल्या शरीराला मिळत असते.

2) खळखळुन अणि हसुन आनंदाने दिवसाचे स्वागत करणे –

सकाळी सुर्योदयापुर्वी झोपेतुन उठल्यानंतर डोळे चोळत बसणे,आळस देणे मग हळुच अंथरूणातुन आळस देत उठणे हे सर्व बंद करावे.

अणि रोज सकाळी झोपेतुन उठल्यानंतर खळखळुन हसायचे अणि आनंदाने आपल्या समोरील नवीन दिवसाचे स्वागत करायचे.

आजचा दिवस आपल्याला परमेश्वराने दिला आहे अणि तो आपण आनंदातच जगायचा आहे.आपले कर्म प्रामाणिकपणे त्यात करायचे अशी मनाशी सकाळीच झोपेतुन उठल्यानंतर खुणगाठ बांधून घ्यायची.अणि आनंदाने दिवसाची सुरूवात करायची.

3) परमेश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करणे –

दिवसाची सुरूवात करताना परमेश्वराच्या कृपेने आपल्याला जे काही आतापर्यत लाभले आहे,मिळाले आहे त्याबाबद त्याचे मनापासुन आभार व्यक्त करायचे.

See also  आंतरराष्ट्रीय विवेक दिवस २०२३ तारीख, थीम, इतिहास, महत्त्व । International Day of Conscience 2023 In Marathi

4) व्यायाम योगा/मेडिटेशन करणे –

सकाळी झोपेतुन उठल्यानंतर कमीत कमी अर्धा तास अणि जास्तीत जास्त एक तास तरी आपण व्यायाम/मेडिटेशन/योगा करायला हवे.

याने आपले शरीर निरोगी,तंदुरूस्त राहते.मन दिवसभरात काम करताना एकाग्र प्रफुल्लित अणि शांत राहते.

5) शरीराला पोषक असा पौष्टिक आहारच घेणे –

जोपर्यत भुक लागत नाही तोपर्यत जेवायला बसायचे नाही अणि दिवसभरात अशाच आहाराचे सेवण करावे जो आपल्या शरीराला पोषक आहे.

जास्त राजसीक अणि तामसी आहाराचे सेवण करणे टाळावे.सात्विक आहाराचेच म्हणजेच शाकाहारी अन्न पदार्थाचेच कच्चया भाजीचे अधिक सेवण आपण करायला हवे.

कारण आहारात कच्चया हिरव्या भाजी खाल्लयाने आपले पोट लवकर साफ होत असते.पण याच ठिकाणी आपण दिवसभरात जर राजसी तसेच तामसी आहाराचे सेवण केले.आहारात कच्च्या हिरव्या भाजीचा समावेश केला नाही तर दुसरया दिवशी सकाळी आपले पोट नीट स्वच्छ होत नसते.

अणि सकाळी पोट स्वच्छ न झाल्याने वेळेवर शौचालयास न गेल्याने,अनेक दिवस शौचास न गेल्याने आतडयांमधील मल हे आपल्या शरीरात विषारी द्रव्य निर्माण करत असते.

जेणे आपल्याला विविध शारीरीक रोग जडत असतात.आपला रोजचा दिवस देखील चांगला जात नसतो.दिवसभर अनफ्रेश देखील वाटत असते.काम करताना कुठलाही उत्साह वाटत नाही.अणि मनावर देखील तणाव येतो.

म्हणुन आपण सकाळी झोपेतुन उठल्यानंतर वेळेवर शौचालयास जायला हवे अणि पोट स्वच्छ होण्यासाठी दिवसभरात आहारात हिरवा पालेभाज्यांचा अधिक समावेश करायला हवा.

6) बसुन राहु नये शरीराला रोज कुठल्या तरी एका कार्यात व्यस्त ठेवावे –

मित्रांनो आपल्याला जर आपले शरीर नेहमी कार्यशील अँक्टिव्ह अणि तंदुरूस्त फीट ठेवायचे असेल तर आपण आपल्या शरीराचा भरपुर व्यायाम होईल,घाम निघेल असे काम रोज करायला हवे.यासाठी आपण एखादा प्रवासाचा,नृत्य करण्याचा,इत्यादी कुठलाही छंद जोपासु शकतो.

कुठल्याही एखाद्या कार्यात स्वताला नेहमी व्यस्त ठेवायला हवे.याने आपले शरीराचे सर्व अवयव नेहमी अँक्टिव्ह राहत असतात.अणि वृदधाल्पकाळात देखील आपल्या शरीराला कुठलाही आजार जडत नाही.अणि आपणास दवाखान्याचा खर्च गोळया औषध देखील घ्यावा लागत नाही.

See also  श्रावण महिन्याच महात्म्य -Shravan month importance

7) नेहमी चेहरयावर एक स्मित हास्य ठेवणे –

दिवसभरात आपल्या चेहरयावर आपले कार्य करत असताना नेहमी एक स्मित हास्य असायला हवे.कुठलेही कार्य करत असताना चेहरयावर आनंद अणि उत्साह असायला हवा.

8) रोज सकारात्मक अणि प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करणे –

आपण आपला जास्तीत जास्त वेळ वाचनात,नवनवीन कला कौशल्य शिकण्यात व्यतित करायला हवा.

आपल्या मनावर नकारात्मक प्रभाव टाकणारया टिव्हीवरील सिरीअल,मुव्ही,मोबाईलमधील वेबसीरीज व्हीडीओ न्युज पाहण्यात,कोणाविषयी नकारात्मक वाईट बोलण्यात,ऐकण्यात,विचार करण्यात आपला वेळ अणि उर्जा अजिबात वाया घालवु नये.

कारण जसे आपण बघतो,ऐकतो बोलतो विचार करतो तसेच आपले व्यक्तीमत्व देखील घडत असते.बनत असते.म्हणुन सकाळची सुरूवात अणि रात्रीचा शेवट हा आपण सकारात्मक विचार ऐकुन वाचुनच करायला हवा.

मित्रांनो वरील दिनचर्येचे जर आपण नियमित पालन केले तर नक्कीच आपण निरोगी आनंदी अणि सदैव तंदुरूस्त राहाल.

आपणास वयोवृदध झाल्यानंतर देखील कुठलाही शारीरिक आणि मानसिक आजार जडणार नाही.अणि गोळया औषध तसेच दवाखान्याचा देखील खर्च आपणास करावा लागणार नाही.