उत्तम आरोग्यासाठी आहार घेण्याचे 5 सोप्पे नियम – Tips for Healthy Eating for a Healthy life
मित्रांनो असे म्हटले जाते की कुठल्याही व्यक्तीचे आरोग्य किती उत्तम आहे अणि किती खराब आहे भविष्यात ते कितीकाळ उत्तम असणार आहे हे आपण त्याच्या आहार घेण्याच्या पदधतीवरून सहज जाणुन घेऊ शकतो.
कारण उत्तम आरोग्यासाठी व्यायाम,मेडिटेशन योगा यानंतर जर काही खुप महत्वाचे आहे.तर तो आपला रोजचा आहार.
आपण जर रोज सकस,पौष्टिक आहाराचे सेवण केले तर आपले आरोग्य नेहमी चांगले राहते.
पण याचठिकाणी आपण जर बाहेरील उघडयावरचे तेलगट,तळलेल्या अन्नपदार्थाचे जंक फुडचे सेवण केले तर आपल्याला अनेक आरोग्यविषयक तसेच पोटाच्या समस्या निर्माण होत असतात.
असे आपल्या सोबत होऊ नये याचकरीता आजच्या लेखात आपण आहाराचे काही सोप्पे नियम जाणुन घेणार आहोत.
आपण जर ह्या नियमांचे पालन केले तर आपण कधीही आजारी पडणार नाही,आपल्याला आरोग्याच्या,पोटाच्या तसेच पचनाशी संबंधित समस्या देखील उदभवणार नाहीत.
चला तर मग जाणुन घेऊ आहाराविषयक हे सोप्पे नियम कोणकोणते आहेत?
उत्तम आरोग्यासाठी आहार घेण्याचे पुर्वजांनी सांगितलेले कोणते 5 सोप्पे नियम?
मित्रांनो आज आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी चाळीस पंचेचाळीस वर्षापुर्वीचे लोक म्हणजे आपले पुर्वज जसा आहार घ्यायचे जो आहाराचा नियम पाळायचे तो नियम जाणुन घेणार आहोत.
जेणेकरून आपण देखील त्यांच्यासारखे निरोगी अणि आरोग्यदायी जीवण जगु शकु.
1)रोज षडरसात्मक आहाराचे सेवण करावे –
आपण प्रत्येकाने रोज षडरसात्मक आहाराचे सेवण करायला हवे.म्हणजे एकुण सहा प्रकारचे रस म्हणजे कडु,गोड,आंबट,तिखट,खारट,तुरट हे सर्व रस आपल्या आहारात समाविष्ट झाले पाहिजे.आपल्या पोटात जायला पाहिजे.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपण सर्व प्रकारच्या भाज्यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करायला हवा.अमुक भाजी मला खुप आवडते अणि तमुक भाजी मला अजिबात आवडत नाही असे अजिबात करू नये.
याला देखील कारण आहे जर आपण भारतातील चाळीस ते पंचेचाळीस वर्षापुर्वीचा इतिहास पाहिला तर तेव्हाचे लोक कधीच जास्त आजारी पडत नव्हते.
त्यांना डायबिटीस,दमा,शरीरात लठठपणा येणे,शारीरीक अणि मानसिक ताणतणाव,नैराश्य येणे वगैरे सारखा कुठलाही आजार नव्हता.
कारण तेव्हाचे लोक त्यांच्या आहारात सर्व प्रकारच्या आहाराचा समावेश करत होते.अणि सगळयात महत्वाचे म्हणजे ते सकस आहाराचे सेवण करत होते.
अणि गोडामध्ये ते मिठाई,गुलाबजामुन बालुशाही वगैरे देखील खात नव्हते कारण तेव्हा अशी मिठाईची दुकानेच जास्त उपलब्ध नसायची.
म्हणुन ते गोड म्हणून नैसर्गिक गुण मिळेल असे गोड पदार्थ खायचे जसे की गुळाचा एखादा खडा ते खात होते.अणि साखर न खाता खडीसाखर खात होते.
याचकारणामुळे चाळीस पंचेचाळीस वर्षापुर्वीच्या लोकांना डायबिटीस वगैरे सारखे आजार जडायचे नाही.
अणि त्यांचा आहार देखील खुप हलका असायचा अणि जेवण झाल्यानंतर ते थोडी भात दही अणि अल्प प्रमाणात साखर खात असे.म्हणजेच आहाराचे गोड खाण्याचे एक योग्य संतुलन ते नेहमी राखायचे.
आहारात आंबट पदार्थ म्हणुन लिंबुचा,लिंबाच्या लोणच्याचा समावेश केला जायचा.तिखट देखील प्रमाणातच ते खायचे.
भारतात सतराव्या शतकाच्या आधी मिरच्या नव्हत्याच तेव्हा फक्त मसाले असायचे.नंतर सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी मिरच्या आणल्या होत्या.
आपण देखील पुर्वीच्या लोकांप्रमाणे आहारात कमी मिरच्यांचा,मसाल्यांचा वापर करायला हवा.तुरट म्हणुन आपण आहारात आवळा समाविष्ट करू शकतो.
मीठाचे देखील एक योग्य प्रमाण ठेवायला हवे फक्त चवीपुरताच मीठाचा वापर करायला हवा.भाजीत जास्त मीठ देखील टाकु नये.
अणि कडु म्हणुन कारल्याची भाजी देखील आपण आपल्या आहारात समाविष्ट करायला हवी याने सर्व सहा रस आपल्या पोटात जातील.
2)चिडचिड करत तसेच घाईघाईने जेवण करणे टाळावे –
जेवण नेहमी आनंदाने अणि आवडीने करावे.जसा आपण देवाचा प्रसाद पुर्ण निष्ठेने अणि भक्तीने आनंदात चवचवीने खात असतो एकदम तसेच जेवण देखील करायला हवे.प्रत्येक घास हा नीट चावून खायला हवा.
चिडचिड करत कधीच जेवण करू नये.कारण जेवण करताना जी आपली मानसिक स्थिती असते तिचा आपल्या अन्नाच्या पचनाशी,अन्न अंगी लागण्याशी त्या अन्नातुन उर्जा निर्माण होण्याशी देखील खुप घनिष्ठ संबंध असतो.
कारण जर आपण चीडचीड करून आपल्याला आपल्या समोर ठेवली असलेली भाजी आवडत नाही म्हणुन जर ती बळजबरी तोंड वाकड करून खाल्ली तर ते अन्न आपल्या अंगी देखील लागत नसते.
त्यामुळे आपणास एखादा शरीराचा आतडयाचा आजार देखील जडु शकतो.कारण आपल्या शरीरात पाचक रसच त्या आहाराचे सेवण केल्याने निर्माण होत नाही.
पण याच ठिकाणी आपण समोर ठेवलेले अन्न जर आनंदाने अणि आवडीने चवचवीने खाल्ले तर ते अन्न खाल्लयाने आपल्या शरीरात पाचक रस निर्माण होत असतो.ते अन्न आपल्या अंगी देखील लागत असते.
कारण अध्यात्मात देखील असे म्हटले गेले आहे की जसा आपला भाव असतो तसा अन्नात रस निर्माण होत असतो.हेच कारण आहे की पुर्वीच्या काळातील लोक कधीही आजारी पडत नव्हते.कारण ते आवडीने,चव चाखुन आस्वाद घेऊन आहाराचे सेवण करायचे.
म्हणुन आपले आजी आजोबा देखील आपल्याला सांगत असतात.समोर वाढलेले अन्नाचे ताट फेकु नका,अन्नाचा अनादर करू नका,अन्नाला नाव ठेवू नका,ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही असे म्हणुन चिडचिड करू नका समोर जे वाढले आहे ते आनंदाने खा,जेवताना टिव्ही बघु नका त्याचे हेच कारण आहे.
म्हणुन आज देखील जेवण करताना आपले आजी आजोबा आपणास पहिले देवाचे नाव घेताना,अन्नाला नमन करताना दिसुन येतात.कारण आपण खातो त्या अन्नातुनच आपले मन,आपली बुदधी,आपले विचार आजुबाजुचे कौटुंबिक वातावरण निर्माण होत असते.
3) घरातील स्त्रियांनी देखील आनंदाने प्रेमाने कुटुंबासाठी स्वयंपाक करायला हवा-
घरातील स्त्रियांनी देखील चिडचिड न करता मनात आनंदी भाव ठेवून घरातील सर्वासाठी जेवण तयार करायला हवे.याने तिचे आपल्या कुटुंबाप्रती असलेले प्रेम देखील त्या अन्नात उतरत असते.
अणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण म्हणजेच घरातील सदस्यांनी सुदधा जोपर्यत भुक लागत नाही तो पर्यत जेवायला बसु नये अणि पोट भरल्यानंतर देखील खात बसु नये.
खुप जण भूक लागलेली नसताना देखील काहीतरी खातच राहतात अणि पोट भरले तरी देखील खात असतात.ज्यामुळे त्यांना पचनाशी संबंधित तसेच पोटाचे विकार जडत असतात.
अणि डब्लयु एचओ ने देखील प्रमाणित केले आहे की आपल्याला होणारे ९० टक्के आजार हे पोटामुळेच,निर्माण होत असतात.
ज्याचे कारण चुकीचा आहार घेणे,अवेळी आहार घेणे,पोट स्वच्छ न होणे इत्यादी असते.
म्हणुन आपण दोन वेळेच्या जेवणात कमीत कमी सहा ते सात तास इतके अंतर ठेवायलाच हवे.
4) आहारात फळे अणि कच्च्या भाज्या समाविष्ट कराव्यात-
आपण आपल्या आहारात जास्तीत जास्त हिरवा भाजीपाला अणि फळे त्यांचा रस यांचा समावेश करायला हवा.
उदा,कांदयाची पात,मेथी,टमाटा,मुळा,पालक,गाजर,बीट काकडी इत्यादी
म्हणजेच आपण जिभेला जे आवडते ते जंकफुड उघडयावरील तेलगट तळलेले अन्नपदार्थ खाण्यापेक्षा शरीराला वाढीसाठी जे आवश्यक गरजेचे आहे ते पौष्टिक अन्न पदार्थ फळ भाज्या खायला हवे.
अणि आहारात देखील आजुबाजुच्या वातावरणानुसार त्रतुमानानुसार योग्य तो बदल करत राहायला हवा.जास्त प्रक्रिया केलेले अन्न देखील खाऊ नये.
5) शरीराला गंज लागु देऊ नये –
आपण दिवसभरात शरीराचा घाम निघेल मेहनत होईल अशी कामे जास्तीत जास्त करायला हवी.पुरेसा व्यायाम देखील करायला हवा.याने आपले शरीर नेहमी अँक्टिव्ह अणि कार्यशील राहते.अणि आपले अवयव देखील निष्क्रीय होत नाही.
कारण रोज काम न केल्याने आपले शरीर क्रियाशील अँक्टिव्ह राहत नाही.शरीरातील अवयव निष्क्रीय होऊ लागतात शरीराला सुस्ती येऊ लागते,आपण आळशी बनतो,आजचे काम उद्यावर ढकलू लागतो.खाऊन झाले की आपणास लगेच झोप लागु लागते.अणि खाऊन झोपुन राहिल्याने खाल्लेले अन्न देखील जिरत नाही म्हणुन अंगात लठठपणा निर्माण होत असतो.अणि लठठपणामुळे देखील आपल्याला अनेक शारीरिक विकार जडत असतात.
कुठलेही काम करायला आपले शरीर आपली साथ देत नाही.शरीर निष्क्रीय झाल्याने आपल्याला अनेक शारीरिक मानसिक आजार देखील जडत असतात.अणि कमी वयातच तारूण्यातच आपली अवस्था एकदम म्हतारया माणसासारखी होऊ लागते.अणि आपण अनेक रोगांनी ग्रस्त होऊन तारूण्यातच डायबिटीस,वगैरे सारख्या आजारांनी मरत असतो.
म्हणुन आपण आपल्या शरीराला सदैव कार्यरत ठेवायला हवे.
रोज पायी देखील चालायला हवे.कारण पायी चालल्याने आपणास श्वसनाचे आजार जडत नसतात.डायबिटीस ब्लडप्रेशर सारखे आजार असल्यास ते देखील पायी चालल्याने अणि हिरव्या भाजीपाल्याचे सेवण केल्याने पुर्णत बरे होत असतात.