भारताच्या तेजस लढाऊ विमानाविषयी माहीती – Tejas fighter jet information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

भारताचे तेजस लढाऊ विमान माहीती Tejas fighter jet information in Marathi

मित्रांनो एक वेळ अशी होती की भारताला युदध करण्यासाठी इतर देशांकडुन लढाऊ विमान शस्त्रास्त्रे खरेदी करावे लागायचे.पण आता स्थिती पुर्णपणे बदलताना दिसुन येत आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी एकत्र मिळुन तयार केलेल्या तेजस ह्या लढाऊ विमानाची परदेशातुन देखील दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे.

अमेरिका सोबत अजुन सात देशांनी ह्या भारतीय लढाऊ विमानात आपले स्वारस्य दाखवले आहे.

ज्यात आँस्ट्रेलिया,इंडोनेशिया,मलेशिया,फिलीपाईन्स अर्जेटिना,इजिप्त इत्यादी अशा प्रमुख देशांकडुन तेजस मध्ये आपणास स्वारस्य आहे असे भारतास कळविण्यात आले आहे.

मलेशियाकडुन तर 18 विमानांची मागणी केली गेली आहे.

अशा वेळी आपल्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की हे तेजस विमान काय भानगड आहे?अणि इतर राष्ट यात का एवढी रूची दाखवत आहे?ह्या तेजस विमानाचे वैशिष्ट्य तरी काय आहे?

आजच्या लेखात आपण ह्याच विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

तेजस ह्या विमानाची निर्मिती कोणी केली आहे?

भारतातील तेजस ह्या लढाऊ विमानाची निर्मिती हिंदुस्तान अँरोनाँटिक्स लिमिटेडने केली आहे.

तेजस ह्या लढाऊ विमानाने सर्वप्रथम भारतीय अंतराळात,हवेमध्ये कधी उडडाण घेतली होती?

भारतातील सर्व शास्त्रज्ञांनी मिळुन तयार केलेल्या तेजस ह्या लढाऊ विमानाने 2001 मध्ये सर्वप्रथम उडडाण घेतली होती.तेव्हा भारताचे पंतप्रधान पद अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे होते.

See also  2022 जुलै महिन्यातील महत्वाचे राष्टीय आणि आंतरराष्टीय दिवस,सण-उत्सव,जयंती पुण्यतिथी - July 2022 important days

2003 मध्ये लढाऊ विमानाचे नाव तेजस असे अटल बिहारी वाजपेयी यांनीच ठेवले होते.यामागे अटल बिहारी वाजपेयी यांचा हा हेतु होता की हे जगातील सर्वात बलाढय लढाऊ विमान बनावे.

अणि आता हेच लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी जगभरातील मोठमोठया बलाढय देशाकडुन देखील मागणी होत आहे याचा अर्थ अटल बिहारी वाजपेयी यांचा हेतु पुर्णत्वास आला आहे.तेजस हे जगातील सर्वात बलाढय लढाऊ विमान बनले आहे.

हे लढाऊ विमान सगळयात पहिले भारतीय अंतराळात उडडाण भरायला जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षे इतका कालावधी लागला भारतीय शास्त्रज्ञांनी यावर खुप मेहनत घेतली होती.

भारताच्या लढाऊ विमान तेजसचा एकुण वेग किती आहे?

भारताचे लढाऊ विमान तेजस ह्याचा वेग एकुण जवळपास 2203 इतका आहे.

भारताचे लढाऊ विमान तेजसचे वजन किती आहे?

भारताचे लढाऊ विमान तेजसचे वजन हे एकुण 6 हजार 501 किलो इतके आहे.

असे म्हटले जात आहे की याचे वजन हे यात वापरण्यात आलेल्या कार्बन,टायटँनिअम अणि कार्बनमुळे कमी आहे.

भारतीय विमान तेजसची उडडाणाची एकुण उंची किती आहे?

भारतीय विमान तेजसची उडडाणाची उंची ही जवळपास 50 हजार फुट इतकी आहे.

भारतीय विमान तेजसची अंतरक्षमता एकुण किती आहे?

भारतीय विमान तेजसची एकुण अंतरक्षमता ही जवळपास तीन ते चार हजार किलोमीटर इतकी आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या तेजस लढाऊ विमानाची वैशिष्टये कोणकोणती आहेत?

अमेरिका सारखा बलाढय शस्त्रसंपन्न देश भारताच्या तेजस विमानाची मागणी का करत आहे?

भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या तेजस ह्या लढाऊ विमानामुळे कुठलाही देश आपल्या शत्रुला सहज हरवू शकतो.

म्हणुनच अमेरिका सारखा बलाढय शस्त्रसंपन्न देश देखील ह्या लढाऊ विमानात आपली रूची दाखवत आहे.

● यात आत्म संरक्षणासाठी एक जँमर देखील बसवण्यात आले आहे ज्यामुळे शत्रुला आपल्या रडारदवारे देखील हे विमान दिसत नाही.

● यात इतकी क्षमता आहे की 50 हजार फुट पेक्षा अधिक उंचीवर असताना देखील ह्या विमानात इंधन भरले जाऊ शकते.

See also  गोवा बनले मोफत आयव्ही एफ सुविधा देणारे देशातील पहिले राज्य - Goa govt announced free IVF treatment for women

● हे लढाऊ विमान लेझर गाईडेड अणि क्लस्टर मिसाईल बाँम्ब अणि राँकेट देखील वाहुन नेऊ शकते.

● ह्या लढाऊ विमानाच्या साहाय्याने आपण एका वेळेला किमान 10 बाँम्ब डागु शकतो.

● भारताने तयार केलेले हे तेजस विमान जगातील इतर देशातील लढाऊ विमानांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे.

● भारताचे तेजस विमान कोरिया अणि चीन देशातील फायटर जेटच्या तुलनेमध्ये अधिक उत्तम आहे.

● तेजस ह्या विमानादवारे हवेतुन हवेत अणि हवेतुन पृथ्वीवर,हवेतुन पाण्यात हल्ला करणारे शस्त्रास्त्र देखील ठेवले जाऊ शकतात.

● हे विमान कमी जागेवरून देखील उंच भरारी घेण्यास सक्षम आहे.

● हे लढाऊ विमान किमान तेरा हजार पाचशे किलोग्रँम इतके वजन सहज पेलवु शकते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा