आत्ताची सर्वात मोठी बातमी!
जुन्या पेंशनच्या मागणीसाठी सात दिवस संपात सहभागी झालेल्या १८ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सात दिवसांचे वेतन कापले जाणार
राज्य सरकारी,निमसरकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर इतर कर्मचारी वर्गासाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
राज्य सरकारी,निमसरकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर इतर कर्मचारी वर्गाचा तब्बल सात दिवसांचा पगार कापला जाणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की जुन्या पेंशनच्या मागणीसाठी १८ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांदवारे १४ मार्च ते २० मार्च दरम्यान जो संप ठेवला गेला होता.
त्यात जे कर्मचारी सहभागी होते.त्यांची सेवा खंडित केली जाणार नाही पण हे सर्व कर्मचारी संपकाळात तब्बल सात दिवस कामावर गैरहजर होते म्हणून ह्या महिन्यातील सात दिवस कामावर गैरहजर असल्याने त्यांच्या सात दिवसांच्या वेतनात कपात केली जाणार आहे.
संपादरम्यान कर्मचारी जे सात दिवस कामावर गैरहजर होते हा कालावधी असाधारण कालावधी म्हणुन गृहित धरण्यात आलेला आहे.म्हणुन आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सात दिवसांचे वेतन दिले जाणार नाही.
शासनाच्या ह्या ठोस निर्णयामुळे तोंडाचे पाणी पळालेल्या सर्व कर्मचारींच्या संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आता मदतीसाठी थेट धाव घेतली आहे.शिल्लक रजा मंजूर करा अणि सेवा नियमित करा अशी मागणी आता कर्मचारी करू लागले आहेत.
कारण साधारण रजा मंजुर झाल्यास कर्मचारी वर्गाच्या सेवेत कुठलाही खंड पडत नसतो पण असाधारण रजा मंजूर झाल्यास कर्मचारींना मोबदल्यामध्ये त्यांचा पगार सुद्धा दिला जात नसतो.
यावरून असे दिसून येते आहे की सात दिवसांच्या संपात सहभागी झालेल्या सर्व १८ लाख कर्मचारी वर्गाचा सात दिवसांचा पगार कापला जाणार आहे.
आता सर्वांचे याच गोष्टीकडे लक्ष लागलेले आहे की कर्मचारी वर्गाच्या मागणीला शिंदे फडणवीस सरकार मान्य करते किंवा नाही कर्मचारींचा सात दिवसाचा कापलेला पगार त्यांना दिला जातो किंवा नाही.
अणि सरकारच्या निर्णयावर कर्मचारी वर्गाचा काय प्रतिसाद प्रतिक्रिया असणा