मनाची एकाग्रता  – आनंदी जीवन आणि यशाची गुरुकिल्ली – 9 सोप्या टिप्स  – Manachi Ekagrata

मन  –  गुरुकिल्ली –  Manachi Ekagrata

 ह्या जगात सर्वाधिक जलद आणि वेगवान जर काही आहे ते म्हणजे आपले मन.आपले मन ही एक अशी गोष्ट आहे जे कधीही एका ठिकाणाहुन दुसरया ठिकाणी जात असते.

कारण आपले मन ही एक अशी गोष्ट आहे जिला कुठलेच बंधन नसते.ना वेळेचे,ना जागेचे म्हणुन हे मन कधीही एका ठिकाणाहुन दुसरे ठिकाणी जात असते.

पण याचा एक खुप मोठा तोटा असतो तो म्हणजे आपले मन विचलित झाल्याने आपण एका ठिकाणी एकाग्रतेने कार्य करू शकत नसतो.

सतत आपले चंचल मन इथे तिथे भरकटत राहत असते.याने आपण एकाग्रतेने कोणतेही एक कार्य मन लावून करू शकत नाही.

म्हणुन आपण आपल्या मनावर ताबा मिळविणे फार गरजेचे असते.त्याला विचलित होऊ न देता एका ठिकाणी एकाग्र करणे फार आवश्यक ठरत असते.

आजच्या लेखात आपण मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी काय करायला हवे हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपले मन वारंवार विचलित होणार नाही आणि आपल्या एकाग्रता क्षमतेत देखील वाढ होण्यास मदत होईल.

 

मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवे?

मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण विविध उपाययोजना करू शकतो.

 

 आज आपण काही अशा उपाय तसेच मार्गांविषयी जाणुन घेणार आहोत ज्यांचा अवलंब केल्याने आपले मन जे वारंवार इकडे तिकडे भरकटत राहते तसेच सतत विचलित होत राहते ही समस्या कायमची दुर होऊन जाईल.

 

कारण ह्या उपाययोजनांचा अवलंब केल्याने आपला माईंड अधिक वेळ एका ठिकाणी कार्यरत राहण्यास खुप मदत होते.

 

चला तर मग जाणुन घेऊया ह्या सर्व उपायांविषयी अधिक सविस्तरपणे.

 

1) बौदधिक खेळ खेळणे :

2) मर्यादित आणि पुरेशी झोप घेणे :

See also  गाय नेहमी अन्न खात असताना रवंथ का करत असतात

3) नियमित व्यायाम करणे :

4) निसर्गाच्या सहवासात राहणे :

5) गाणे ऐकणे :

6) मेडिटेशन करणे :

7) आहाराकडे सुदधा लक्ष देणे :

8) मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करू नये :

9) स्वताला डेंजर झोन मध्ये टाकणे :

 

 

1)बौदधिक खेळ खेळणे :

आपल्या एकाग्रता क्षमतेत वाढ करण्याचा सर्वात पहिला उपाय म्हणजे बौदधिक खेळ खेळणे.कारण बौदधिक खेळ खेळल्याने आपली बुदधी अधिक तल्लख बनते.तसेच बौदधिक क्षमतेत पण वाढ होते.

 

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे बुदधीबळ,सुडोकु,कोडे सोडवणे असे बुदधीला ताण देणारे विचार करायला लावणारे खेळ जर आपण रोज खेळले तर याने आपली एकाग्रता वाढते याला कारण असे खेळ बौदधिक कौशल्याचे असल्याने आपण हे खुप लक्षपुर्वक आणि सजगपणे खेळत असतो.ज्याने आपले काँनसिनट्रेशन लेव्हल देखील वाढण्यास मदत होते.

 

2) मर्यादित आणि पुरेशी झोप घेणे :

आपल्याला जर आपले शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखायचे असेल तर आपण मर्यादित पण शरीराला आवश्यक एवढी झोप घेणे पण गरजेचे आहे.

कारण रोज,सतत रात्री अर्धवट झोप झाल्याने दुसरया दिवशी आपल्याला अनफ्रेश जाणवत असते.डोके दुखत असते.आणि कोणत्याही कामात आपले मन देखील लागत नाही.म्हणजेच आपली कोणतेही कार्य पुर्ण करण्यासाठी लागणारी एकाग्रता क्षमता याने भंग होत असते.

 

म्हणुन आपण रात्री पुरेशी झोप घेणे फार गरजेचे आहे आणि समजा रात्री आपली झोप पुर्ण होत नसेल,किंवा लवकर झोप लागत नसेल ज्याने आपली झोप पुर्ण होत नाही आणि दुसरया दिवशी याचा आपल्या कामावर परिणाम होत असेल तर ही समस्या दुर करण्यासाठी आपण ह्या समस्येचे कारण शोधायला हवे.

 

कारण रात्री अपरात्रीपर्यत मोबाईलवर चँट करत बसणे,टिव्ही पाहत बसण्याच्या रोजच्या सवयीमुळे देखील आपली झोप पुर्ण होत नाही आणि याचा परिणाम आपल्या एकाग्रतेवर होत असतो.

 

3) नियमित व्यायाम करणे :

आपल्याला जर आपले शारीरीक आणि मानसिक स्वास्थय उत्तम राखायचे असेल तर आपण रोज सकाळी व्यायाम करायला हवा.रोज व्यायाम केल्याने आपले शरीर फिट राहते.आणि आपला मुड,मन देखील प्रफुल्लित आणि फ्रेश राहते ज्याने आपण कोणतेही काम मोठया उत्साहाने आणि जोशाने मन लावून एकाग्रतेने करू शकतो.

See also  JKBOSE इयत्ता ८ वी निकाल २०२३ जाहीर | JKBOSE Class 8th Result 2023 PDF Download

 

4) निसर्गाच्या सहवासात राहणे :

आपल्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण आपला जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सहवासात व्यतित करायला हवा.

 

हिरवेगार वृक्ष,पक्षी,डोंगर,दरी नदया अशा निसर्गमय वातावरणात वेळ व्यतित केल्याने आजुबाजुची हिरवळ पाहुन आपले मन एकदम ताजे तवाने आणि प्रफुलल्लित होऊन जात असते.

 

म्हणुन आपण कामातुन वेळ काढुन एखाद्यावेळी किंवा काम झाल्यावर रोज आपला थोडा वेळ निसर्गाच्या सोबत घालवायलाच हवा.

 

याने आपला दिवसभराचा कामाचा थकवा निघुन जातो आणि दुसरया दिवशी आपल्याला पुन्हा फ्रेश मुडसोबत मोठया उत्साहाने आणि एकाग्रतेने आपले कार्य करता येते.

 

5) गाणे ऐकणे :

रोज दिवसभर काम करून तसेच अभ्यास करून आपले शरीर आणि मेंदु दोघे खुप थकुन जात असतात.अशा परिस्थितीत आपले शरीर आणि मेंदु यांना रिलँक्स करण्यासाठी आपण अधुनमधून छोटा ब्रेक घेत एखादे सुमधुर संगीत ऐकले तर याने आपला सर्व थकवा निघून जात असतो.

 

आणि आपल्याला पुन्हा फ्रेश फिल होत असते.ज्याने आपण आपले काम पुन्हा एकाग्रतेने करू शकतो.

 

6) मेडिटेशन करणे :

मेडिटेशन करणे हा आपल्या एकाग्रतेत वाढ करण्याचा एक सर्वात उत्तम उपाय आहे.म्हणुन आपल्या एकाग्रतेत वाढ करण्यासाठी डाँक्टर तसेच फिटनेस एक्सपर्ट देखील आपल्याला मेडिटेशन करण्याचा सल्ला देत असतात.

 

कारण जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपण एकदम ध्यान मुद्रेत जात असतो आणि आपल्या डोक्यात चाललेले सर्व विचार,तसेच आपल्या प्रत्येक श्वासाकडे देखील एकाग्रतेने लक्ष केंद्रित करत असतो.याने आपली फोकस करण्याची क्षमता एकाग्रता वाढते.

 

म्हणून मेडिटेशन हा एक उत्तम उपाय आहे आपल्या एकाग्रतेत वाढ करण्याचा.

 

7) आहाराकडे सुदधा लक्ष देणे :

आपण आपल्या एकाग्रता क्षमतेत वाढ करण्यासाठी आपल्या रोजच्या आहाराकडे देखील लक्ष देणे फार गरजेचे आहे.कारण आहाराचा देखील शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो.

See also  सतिष कौशिक यांच्याविषयी माहिती | Satish kaushik information in Marathi

म्हणुन आपण आपल्या आहारात हाय कँलरी फुडचा समावेश करणे टाळायला हवे.कारण याचा परिणाम आपल्या एकाग्रता क्षमतेवर होत असतो.

याचसोबत आपण जर उपाशी राहिलो तर याने देखील भुकेपोटी आपले मन अभ्यासात तसेच कामात एकाग्र होत नसते.

म्हणुन आपण पुरेसा आणि आपल्या एकाग्रतेत वाढ होईल अशा पौष्टिक आहाराचेच सेवण करायला हवे.

 

8) मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करू नये :

एकाच वेळेला जर आपण दोन कामे करून मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न केला तर याने आपली उर्जा दोन भागात विभाजित होऊन जाते.ज्याने आपण दोघांपैकी एक काम देखील पुर्ण ताकद लावून तसेच मन एकाग्र करून पुर्ण करू शकत नसतो.

म्हणुन आपण एकावेळेला एकच काम मन एकाग्र ठेवून करणे फार गरजेचे आहे.

9) स्वताला डेंजर झोन मध्ये टाकणे :

 जेव्हा वेळ आपल्या जगण्या मरण्याची येत असते तेव्हा आपण जिव गमावण्याच्या भीतीने तसेच आपल्याला काही ईजा दुखापत होईल या भीतीने आपला मेंदु खुप सावध आणि सजग राहत असतो.आणि अत्यंत सजगतेने एखादे कार्य करत असतो.

उदा.मी साधी भाजी पोळी खातो तेव्हा एकाग्रतेने चावून अन्न न खाता खुप घाईघाईत जेवण करायचो पण एकेदिवशी घरात जेव्हा मासे बनवले तेव्हा मी जेवणाचा प्रत्येक घास खुप एकाग्रतेने खात होतो कारण त्या माशात खुप काटे होते ज्यातील चुकुन एकही काटा माझ्या आतडयात तसेच शरीरात गेल्याने माझ्या जीवाला पोहचण्याची शक्यता होती.त्यामुळे माझा मेंदु पुर्ण सजगतेने एक एक घासाकडे एकाग्रतेने लक्ष देवून त्याचे सेवण करायला मला सांगत होता

 

यातुन आपल्या हे लक्षात येते की जेव्हा आपण डेंजर झोनमध्ये असतो तेव्हा आपल्या सेफ्टीसाठी आपला मेंदु खुप जागरूक असतो आणि तेव्हा आपली एकाग्रता क्षमता अधिक पटीने वाढलेली असते.

अतिचिंता ? Panic attack विषयी माहीती

Comments are closed.