राष्ट्रीय पंचायत राज दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व इतिहास काय आहे? – National Panchayati Raj Day

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

राष्ट्रीय पंचायत राज दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व इतिहास काय आहे?

आपले महाराष्ट्र राज्य हे पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे भारत देशातील नवव्या क्रमांकाचे राज्य म्हणून ओळखले जाते.’

National Panchayati Raj Day

वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यासाठी एका समितीचे गठन देखील करण्यात आले होते.

आपल्या भारत देशातील जेवढेही अंतर्गत कारभार आहेत ते सर्व भारत देशात कार्यरत असलेल्या पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातूनच राबविण्यात येत असतात.

पंचायत राज व्यवस्थेतुन ग्रामीण भागातील कारभाराला प्रारंभ केला जात असतो.भारतातील पंचायत राज व्यवस्थेला बळकट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी दरवर्षी २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस भारतात साजरा केला जातो.

भारतात पंचायत राज व्यवस्था कशी सुरु झाली?हया मागचा इतिहास काय आहे?

भारतात पंचायत राज व्यवस्था सुरू करण्याचे श्रेय लाॅर्ड रिपन ह्या इंग्रज अधिकारीला जाते.हयाच मुळे त्याला भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा जनक असे देखील म्हणतात.

इंग्रज अधिकारी लाॅर्ड रिपन हयाने १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या होत्या यानंतर त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे पंचायत राज व्यवस्था असे नामकरण केले होते.

यानंतर २४ एप्रिल १९९३ रोजी ७३ वी घटनादुरुस्ती करून झाल्यावर ह्या पंचायत राज व्यवस्थेला अधिकृतरित्या घोषित देखील केले होते.

यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राजस्थान राज्यातील बगदरडी नावाच्या एका गावात १९५९ मध्ये प्रथमतः ह्या व्यवस्थेला आरंभ केला.

See also  आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस २०२३ । International Day of Zero Waste 2023 In Marathi

पुढे २०१० मध्ये पंतप्रधान पदावर विराजमान झालेल्या मनमोहन सिंग यांनी अशी घोषणा केली की हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जाणार.

तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

प्रथमत पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार कोणत्या राज्याने केला?

राजस्थान ह्या राज्याने प्रथमतः पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केला होता.यानंतर १९५९ मध्येच आंध्र प्रदेश राज्यात १ नोव्हेंबर रोजी दुसरी पंचायत राज व्यवस्था सुरू केली गेली.

महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था कशी लागु करण्यात आली होती?

महाराष्ट्र राज्यात प़ंचायत राज व्यवस्था लागु करण्यासाठी १९६० दरम्यान एक समितीचे गठन करण्यात आले होते जिचे नाव वसंतराव नाईक असे होते.

ह्या वसंतराव नाईक समितीकडुन शासनाकडे एक अहवाल सादर करण्यात आला होता.हा अहवाल वसंतराव नाईक समितीने १५ मार्च १९६१ रोजी सरकारकडे पाठवला तसेच शासनासमोर सादर केला होता.

यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीत हा सादर केलेला अहवाल १ एप्रिल १९६१ रोजी शासनाने स्वीकारला पण याला शासनाकडुन लगेच तत्काळ मंजुरी दिली गेली नव्हती.

यानंतर महाराष्ट्र राज्यात १ मे १९६२ ला ही पंचायत राज व्यवस्था लागु केली गेली.यानंतर वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशी नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती अधिनियम १९६१ ची निर्मिती केली गेली.

महाराष्ट्र हे पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे कितवे राज्य आहे?

महाराष्ट्र हे पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे नववे राज्य आहे.

पंचायत राज व्यवस्थेची रचना –

पंचायत राज व्यवस्थेची रचना त्रिस्तरीय प्रकारे करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती अशी त्रिस्तरीय रचना पंचायत राज व्यवस्थेची केली गेली आहे.पंचायत राज व्यवस्था मध्ये देखील इतर निवडणुकां प्रमाणे दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात.

ह्या पंचायत राज व्यवस्था मधील निवडणुकीत अनुसूचित जमाती मधील उमेदवारांना जास्त आरक्षण प्रदान केले जाते.

See also  फळांची,सुक्या फळांची आणि भाज्यांची नावे- Names of all fruits, dry fruits, and vegetables in Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा