Nifty BEES म्हणजे काय ? गुंतवणूक कशी करावी ? Nifty BEES Information In Marathi

Nifty BEES विषयी माहीती -Nifty BEES Information In Marathi

आज अनेक नवीन गुंतवणुकदार स्टाँक मार्केट आणि म्युच्अल फंड मध्ये गुंतवणुक करण्यासोबत अजुन एक ठिकाणी गुंतवणुक करायला अधिक पसंती देत आहेत.

आणि ते म्हणजे निफ्टी बीज.आपल्या सर्वानाच माहीत आहे की कुठल्याही गुंतवणुकदाराला दिर्घकाळासाठी गुंतवणुक करावयाची असेल तर तो दोन पदधतींचा प्रामुख्याने वापर करत असतात.निफ्टी 50 Index Fund आणि Nifty Bees(ETF).

आणि जेव्हा एखाद्या गुंतवणुकदाराला एका दिवसासाठी प्राँफिट कमविण्यापुरता ट्रेंडिंग करायची असेल तर तो इंट्रा डे तसेच आँप्शन ट्रेडिंगचा वापर करून निफ्टीची खरेदी विक्री करत असतो.

आजच्या लेखात आपण निफ्टी बीजविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ETF काय आहे?

ETF म्हणजे Exchange Traded Fund.हा म्युच्अल फंडच्या इंडेक्स फंड प्रमाणेच एक फंड असतो.मात्र हा शेअर बाजारात लिस्टेड होत असतो ज्यामुळे याची खरेदी केली जाते.

याच्या युनिटची मार्केट प्राईज अंडरलाईन अँसेटच्या प्राईजनुसार कमी किंवा जास्त देखील होत असते.

ETF हे नँशनल स्टाँक एक्सचेंजवर सुचिबदध करण्यात येते.जिथुन एखादा गुंतवणुकदार व्यक्ती डिमँटरलाईज्ड फाँरमँटमध्ये खरेदी तसेच विक्री करतो.

Nifty BEES चा Fullform काय होतो?

Nifty BEES चा फुल फाँर्म Benchmark Exchange Traded Scheme असा होतो.

NIFTY BEES म्हणजे काय?

  • NIFTY BEES हा भारतामधला एक पहिला स्टाँक एक्सचेंज फंड म्हणजेच (ETF) Benchmark Exchange Traded Fund म्हणुन ओळखला जात असतो.जो 1992 मध्ये Launched करण्यात आला होता.
  • ज्याची खरेदी आपल्याला आपल्या डिमँट स्टाँक ट्रेडिंग
    अँपवर ओपन केलेल्या अकाऊंटवरून थेट करता येत असते.याची गुंतवणुकदार एखाद्या शेअर प्रमाणे खरेदी विक्री करू शकतात.
  • याचसोबत निफ्टी मध्ये जे काही Effect आपणास पाहायला मिळत असतात त्याचा थेट परिणाम याच्यावर देखील पडताना आपणास दिसुन येत असतो.
  • उदा.जर समजा निफ्टी वर जात असेल तर इथे देखील देखील अप ट्रेंडिंग होताना दिसुन येते पण निफ्टी खाली येत असेल तर इथे देखील डाऊन ट्रेंडिंग पाहायला मिळते.
  • निफ्टी बीजची खरेदी आपण एखाद्या ब्रोकरला हायर करून त्याला फोन लावून करू शकतो.आणि समजा आपल्याला आँनलाईन ट्रेडिंग उत्तम जमत असेल तर आपण स्वता ट्रेडिंगच्या कालावधीत आँनलाईन ट्रेडिंग करून देखील याची खरेदी विक्री करू शकतात.
  • ज्यासाठी आपल्याला आपले स्वताचे एक आँनलाईन ट्रेडिंग अकाऊंट ओपन करणे अनिवार्य असते.निफ्टी बीज हे इतर पोर्टफोलिओ होल्डिंग प्रमाणे को डिमेट अकाऊंटमध्ये ठेवले जात असते.
See also  एसआयपी SIP म्हणजे काय ? STP SWP and SIP Meaning in Marathi

याचा एकच शेअर हा निफ्टी इंडेक्सच्या १/१०० च्या बरोबरीने असतो.NSE आणि BSE या दोन्ही ठिकाणी याचा व्यवहार केला जात असतो.

NIFTY BEES चे फायदे कोणकोणते असतात?

1) Zero तसेच No Risk Investment :

जर आपण कुठल्याही एका सेक्टरमधील म्युच्अल फंडची स्टाँकची खरेदी केली तर एका शेअर्सविषयी खराब न्युजमुळे अनेक वेळा स्टाँक वेगाने खाली येताना आपणास दिसुन येतो.अशा परिस्थितीत आपले खुप मोठे नुकसान होण्याची संभावना असते.

परंतु आपण जर निफ्टी बीजमध्ये गुंतवणुक केली तर आपली रिस्क खुप कमी तसेच नहीच्या बरोबर असते.ज्यामुळे याला NO Risk तसेच Zero Investment असे देखील म्हटले जाते.

याला कारण यात फक्त 50 कंपनींचाच समावेश असतो.ज्या प्रत्येक वर्षी आपल्या परफाँर्मन्सनुसार पुढे जात राहतात.त्यामुळे मार्केट डाऊन गेले तरी देखील निफ्टी मध्ये घसरण होत नसते.

2)याची किंमत कधीच शुन्य होत नाही :

मार्केटमध्ये काही असे शेअर्स उपलब्ध असतात ज्यांची किंमत हजार पासुन ते एक रुपयांपर्यत देखील असलेली आपणास पाहायला मिळते.

अशा परिस्थितीत कोणता स्टाँक खरेदी करायचा आणि कोणता स्टाँक खरेदी नाही करायचा हे आपल्या अजिबात लक्षात येत नसते.यातच कधी स्टाँक हे डिलिस्टेड देखील होऊन जात असतात.

पण इंडेक्स जिरो मध्ये असा कुठलाही प्रकार होत नाही.म्हणुन कुठल्याही गुंतवणुकदाराने स्टाँक खरेदी न करता निफ्टी बीज खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरत असते.आणि यात किंमत कमी झाली किंवा वाढली असे देखील होत नाही आणि रिस्क देखील झिरो असते.

3) आपल्याला दोन वेगळे अकाऊंट ओपन करण्याची कुठलीही आवश्यकता नाही –

जेव्हा आपल्याला खुप कमी रिस्कमध्ये म्युचअल फंडसारख्या ठिकाणी गुंतवणुक करायची असते तेव्हा आपणास KYC करावे लागत असते.

आणि यात आपण एखाद्या एजंटच्या मार्फत काम केले तर त्याला देखील काही कमिशन द्यावा लागत असते.

पण निफ्टी बीजची खरेदी करण्यासाठी आपल्याला कुठलेही वेगळे अकाऊंट लागत नसते.आपण आपल्या डिमँट अकाऊंटदवारे देखील निफ्टी बीजची खरेदी करू शकतो.

See also  Loan व Debt मध्ये काय फरक आहे? Difference in loan and debt

4) Long Term Profit :

आपण जर निफ्टी बीजमध्ये योग्य पदधतीने SIP केले तर आपण दिर्घ काळासाठी एक चांगला प्राँफिट प्राप्त करू शकतो.

निफ्टी चार्ट उघडुन बघितल्यास आपणास हे देखील दिसुन येते की यात कुठलीही रिस्क देखील नसते.

5) No Load Scheme :

निफ्टी बीज हे खुप अधिक Economical असते म्हणजेच यात म्युचअल फंडप्रमाणे नो लोड स्कीम देखील असते.

6) Easy To Use :

निफ्टी बीज हे खुप सोप्पे असते आणि हे National Stock Exchange(NSE) वर लिस्टेड असते यामुळे जसे आपण आपला पोर्टफोलिओ चेक करत असतो तसेच हे चेक करू शकतो.कारण आपण याचे मालक असतो.

7) Liquidity :

यात आपण पाहिजे तेव्हा युनिटसची खरेदी तसेच विक्री देखील करू शकतो.म्हणजेत यात तरलता असते.

8) No Human Error :

यात आपणास कुठल्याही प्रकारचा Human Error दिसुन येत नाही.निफ्टी बीजचा परफाँर्मन्स फक्त S&P CNX निफ्टी इंडेक्समधील शेअर्सचा परफाँर्मन्स तसेच मार्केटची डिमांड आणि पुरवठा यांचा परिणाम असतो.यात इतर कुठलाही फंड मँनेजिंग भेदभाव केला जात नसतो.

9) Diversification :

इतर इंडेक्स फंड प्रमाणे निफ्टी बीज 22 सेक्टरमधील स्टॉक मार्केटला ट्रॅक करते आणि त्यात गुंतवणूक करते. हे एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ देखील तयार करते जे जोखीम कमी करण्यात मदत करते.

9) निफ्टी बीजचा परफाँर्मन्स हा निफ्टी फिफ्टीची प्रतिकृती असते.

Nifty BEES कसे Buy करावे?

निफ्टी बीज खरेदी करण्यासाठी आपण अँजल ब्रोकिंग,पाच पैसा,झिरोदधा अशा इत्यादी कुठल्याही चांगल्या ब्रोकर्सदवारे आपले डिमँट अकाऊंट ओपन करून घेऊ शकतो.

शेअर मार्केटमध्ये आपण जसे लिस्टेड शेअर्स खरेदी करत असतो तसेच इथे आपण आपल्याला लिस्टमध्ये दिसत असलेल्या निफ्टी बीजची खरेदी करू शकतो.

आणि समजा आपले आधीपासुन डिमँट अकाऊंट ओपन असेल तर आपण त्याच अकाऊंटवरून निफ्टी बीजची खरेदी करू शकतो आपल्याला कुठलेही वेगळ अकाऊंट यासाठी ओपन करावे लागणार नाही.

● सगळयात आधी आपल्या अँपवरील आपल्या अकाऊंटवर आय डी पासवर्ड टाकुन लाँग इन करावे.

See also  ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर | How To Use RPLI Premium Calculator In Marathi

● आपला Pin Enter करावा.

● आणि Watch list मध्ये Nifty Bees टाईप करून इंटर करावे.

● मग आपल्यासमोर निफ्टी बीजचे शेअर्सची यादी येत असते यात आपल्याला जो हवा त्यावर टिक करून लिस्टमध्ये अँड करून घ्यावा.Nifty BEES कसे Buy करावे?- How to invest in Nifty BEES

● आणि मग Watch list मध्ये जाऊन निफ्टी बीजवर क्लीक करून आपण View करून पाहु शकतो.

● डाव्या बाजुला आपल्यास बिडर्स दिसत असतात आणि उजव्या बाजुला आँफर करणारयांची आँडर्स दिसत असते.

● आता Buy Option वर ओके करून Quantity,Price Add करून घ्यावी आणि Cnc ला सिलेक्ट करून घ्यावे.(किंवा आपण आपली आँर्डर मार्केट वर देखील लावू शकतोकारण तिथे आपल्याला Manually Price Enter करावी लागत नसते.)

● वरील सर्व प्रोसेस झाल्यावर Swipe To Buy Option वर स्वाईप करावे याने Nifty Bees आपल्या Holding Section मध्ये जाऊन लागतात.

अशा पदधतीने आपण निफ्टीची खरेदी तसेच विक्री करू शकतात.

कोणते Nifty BEES सर्वात Best आहे?

मार्केटमध्ये आपल्याला बँक निफ्टी बीज,निपाँन इंडिया इटिएफ निफ्टी बीज,बँक निफ्टी बीज,निफ्टी बीज,एसबीआय इटीएफ निफ्टी फिफ्टी.

वरील सर्व निफ्टी बीजचे अलग अलग प्रकार आहेत पण या सर्वाचे कार्य एकच असलेले आपणास दिसुन येते.पण वरील सगळयात आपण जर बँक निफ्टीमध्ये गुंतवणुक केली तर तिथे आपल्याला बरेच चढ उतार पाहायला मिळत असतात.

म्हणुन आपण निफ्टी बीजमध्ये गुंतवणुक करणे अधिक उत्तम ठरेल.

कोणत्या Nifty BEES च्या Share ची Price किती आहे?

  • जर आपण एसबीआय इटीएफ निफ्टी शेअर्सची किंमत पाहायला गेलो तर सध्या त्याची किंमत 175.16 इतकी आहे.
  • आणि आपण जर निपाँन इंडिया ईटिएफ निफ्टी बीस बददल सांगायला गेलो तर सध्या त्याची 184.87 इतकी किंमत आहे.
  • आणि एचडीएफसी निफ्टी फिफ्टी विषयी बोलायचे म्हटले तर ती 183.23 इतकी आहे.

Nifty BEES मध्ये किती Returns प्राप्त होतो?

जर आपण Returns बददल बोलायला गेले तर 2016 मध्ये निफ्टी बीजची प्राईज 70 रूपये इतकी होती.आणि जर आपण आजची किंमत बघितली तर निफ्टी बीजची किंमत आत्तापर्यत 195 च्या जवळ आहे.

म्हणजे यात 250 टक्क्यांपेक्षा अधिक Returns मिळालेले आपणास दिसुन येतात.आणि एवढा अधिक Returns देत असुन देखील यात रिस्क झिरो आहे.आणि ही एक खुप मोठी बाब आहे.

कारण झिरो रिस्कमध्ये एवढा रिटर्न आपणास कुठली बँक देखील देत नसते.म्हणुन झिरो रिस्कमध्ये चांगला रिटर्न प्राप्त करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.

Nifty BEES गुंतवणुकीसाठी सुरक्षित आहे का?

हो कारण निफ्टी बीजचे प्रमाण हे बाकीच्या स्टाँक प्रमाणेच आपल्या खात्यात राहत असते.

Comments are closed.