FIR माहिती ? FIR Information In Marathi
FIR हा एक असा शब्द आहे जो आपणास नेहमी टिव्हीवरील बातम्यांमध्ये,वर्तमानपत्रामध्ये तसेच एखाद्याच्या तोंडुन ऐकायला मिळत असतो.
अमुक व्यक्तीविरूदध तमुक व्यक्तीने एफ आय आर नोंदवली.अमुक व्यक्तीविरूदध पोलिस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आली असे आपणास ऐकायला मिळत असते.
अशा वेळी आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की हे एफ आय आर म्हणजे काय असते?पोलिस स्टेशनमध्ये एफ आय आर कोणाविरूदध आणि का नोंदवली जात असते?
काळजी करू नका मित्रांनो आजच्या लेखात आपण FIR म्हणजे काय त्याचा काय अर्थ काय होतो हे जाणुन घेणार आहोत.
FIR चा फुल फाँर्म काय होतो?
FIR चा फुल फाँर्म first information report असा होत असतो.ज्याला मराठीत प्रथम सुचना रिपोर्ट असे देखील म्हटले जाते.
FIR म्हणजे काय?
- FIR म्हणजे first information report.एफ आय आर हे एक कागदपत्र असते ज्यात पोलिस कुठल्याही गुन्हयाचा एक लेखी अहवाल तयार करत असतात.
- जेव्हा एखादा गुन्हा,अपराध किंवा बेकायदेशीर कुठलीही घटना किंवा प्रसंग घडुन येत असतो.
तेव्हा याबाबद आपण आपल्या राहत्या परिसरातील नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवत असतो.त्यालाच first information report(FIR) असे म्हटले जाते. - प्राथमिक सुचना रिपोर्ट हे एक प्रकारचे लिखित पत्र असते ज्यात भारतात कुठेही एखादा गुन्हा किंवा अपराध घडुन आल्यास तक्रार नोंदवत असलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून गुन्हेगाराविरूदध पोलिस स्टेशनमध्ये एक लिखित गुन्हा दाखल केला जात असतो.
- पोलिस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केल्यानंतर डयुटी आँफिसरची त्यावर सही घेऊन त्याची एक प्रत गुन्हा दाखल करत असलेल्या व्यक्तीकडे दिली जाते आणि दुसरी प्रत पोलिसांकडे रेजिस्टरमध्ये जमा राहत असते.आणि त्यानुसार पोलिस पुढील चौकशी करत असतात.
- आणि सगळयात महत्वाचे म्हणजे एफ आय आर दाखल केल्यानंतर एफ आय आर नंबर हा पोलिसांच्या रजिस्टरमध्ये लिहुन घेतला जात असतो.जेणेकरून भविष्यात देखील पोलिसांना ती फाईल पुन्हा ओपन करता येत असते.
- थोडक्यात कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये घडलेल्या गुन्हा तसेच अपराधाची अहवालामध्ये एक लिखित नोंद केली जाते तेव्हा त्यास FIR असे संबोधिले जात असते.
FIR नोंदवण्याची संपुर्ण प्रक्रिया –
● जेव्हा एखादा व्यक्ती घडलेल्या गुन्हयाची तोंडी माहीती पोलिसांना सांगत असतो तेव्हा पोलिस लिहुन त्याची लिखित पत्रकात नोंद करून घेत असतात.
● आणि मग तक्रार केलेल्या व्यक्तीने दिलेली सर्व माहीती पोलिस त्याला एकदा पुन्हा वाचुन देखील दाखवत असतात.
● मग त्यावर गुन्हा (FIR) नोंदवत असलेल्या व्यक्तीची सही देखील घेतात.जे निराक्षर आहेत ते आपली सही न देता अंगठा देखील देऊ शकतात.
फक्त आपण दिलेली माहीती एकदम योग्य तशीच आहे का त्यात काही लिहिण्यात पोलिसांकडून चुक तसेच फेरफार झाली आहे याची तक्रार करत असलेल्या व्यक्तीने एकदा पडताळणी करून घ्यावी. लहान गुन्ह्यात काही ठिकाणी ऑनलाइन तक्रार दाखलhttps://mumbaipolice.gov.in/OnlineComplaints?ps_id=0 करता येते.
FIR ही कोण दाखल करू शकते?
जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून काही मारहाण होत असते,दमदाटी केली जात असते.किंवा आपल्या घरातील एखादी मौल्यवान वस्तु चोरीला जात असते,कोणाचे अपहरण होत असते इत्यादी गुन्हेगारी प्रकार घडत असतात.तेव्हा सरळ सर्वसामान्य नागरीक पोलिसात जावून याची कायदेशीर लिखित नोंद करत असतो तसेच गुन्हा दाखल करत असतो.
यात ज्याच्यासोबत गुन्हा घडला आहे किंवा ज्याच्या डोळयासमोर गुन्हा घडुन आला आहे असा साक्षीदार व्यक्ती देखील एफ आय आर नोंदवू शकतो.
याचसोबत आपल्या डोळयासमोर न घडलेल्या इतर गुन्हयांबाबत देखील आपणास एफ आय आर दाखल करता येत असते.
FIR कोणाविरुदध दाखल केली जाते?
चोरी,लुट,मारहाण,दमदाटी करणारा एखाद्याला जातीवाचक शिवीगाळ करणारा,एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणारा,कुणाचे तरी अपहरण करणारा तसेच एखाद्या खुनी व्यक्तीविरूदध बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी FIR दाखल केली जात असते.
FIR चे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत?
एफ आय आर दोन प्रकारच्या असतात :
1)cognizable offense :
2) non cognizable offense :
1)cognizable offense :
यात पोलिसांना आरोपी तसेच गुन्हेगाराला कुठल्याही वाँरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार असतो.आणि यात पोलिस कोर्टाच्या आदेशाची वाट देखील बघत नसतात आणि गुन्हयाची चौकशी करत असतात.
2) non cognizable offense :
यात पोलिसांना आरोपी तसेच गुन्हेगाराला कुठल्याही वाँरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार नसतो.आणि यात पोलिसांना कोर्टाच्या आदेशाची वाट देखील बघावी लागत असते यात पोलिस डायरेक्ट कुठल्याही गुन्हयाची चौकशी करत नसतात.
म्हणुन अशा प्रकारात काही गुन्हा अपराध घडुन आल्यास आधी पोलिसांना एफ आय आर दाखल करावी लागत असते.
FIR नोंदवत असताना आपणास पोलिस स्टेशनमध्ये कोणती माहीती पोलिसात द्यावी लागते?
● एफ आय आर दाखल करत असलेल्या व्यक्तीचे नाव
● अपराध घडुन आला तो दिवस त्या दिवसाची तारीख घटना घडुन आली ती वेळ इत्यादी
● जिथे अपराध घडुन आला त्या घटना स्थळाविषयी माहीती
● गुन्हा घडुन आल्याचा एखादा पुरावा
● ज्या व्यक्तीविरूदध गुन्हा दाखल करायचा आहे त्या व्यक्तीचे नाव,पत्ता,काँन्टँक्ट नंबर ओळख पटण्यासाठी फोटो इत्यादी.
FIR दाखल करायला काही चार्ज लागतो का?
एफ आय आर दाखल करायला कुठलाही चार्ज लागत नसतो.
पोलिसांनी तक्रार नोंदवुन घेण्यास नकार दिल्यावर काय करावे?
कुठल्याही पोलिस स्थानकात आपली एफ आय आर दाखल करून घेतली जात नसेल तर आपण याबाबद वरिष्ठ पोलिस अधिकारीकडे तक्रार नोंदवू शकतो.कारण वरिष्ठ अधिकारींचा आदेश पोलिसांना नाकारता येत नसतो.त्यांना त्याचे पालन करावेच लागते.
तरी देखील आपली एफ आय आर दाखल केली जात नसेल तर आपण मानव अधिकार आयोगात याविरूदध तक्रार नोंदवून याबाबद आवाज उठवू शकता.
एखाद्या व्यक्तीने खोटी FIR दाखल केल्यावर काय होते?
एफ आय आर दाखल करणे ही सोय सुविधा सर्व सामान्य नागरीकांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध करून दिली आहे.
परंतु जर एखाद्या नागरीकाने याचा गैरवापर करत खोटी एफ आय आर नोंदवली तर त्याच्या विरूदध पोलिसांची फसवणुक करण्यासाठी,शासनाची दिशाभुल करण्यासाठी गुन्हा दाखल केला जात असतो.तसेच त्याला पोलिसांकडुन तुरुंगात देखील टाकले जाऊ शकते.
म्हणुन आपण एफ आय आर मध्ये चुकीची खोटी तसेच अपुर्ण माहीती देणे टाळायला हवे.
CSS म्हणजे काय ? उपयोग आणि प्रकार – CSS information in Marathi
CSS म्हणजे काय ? उपयोग आणि प्रकार – CSS information in Marathi