सेंद्रिय शेती म्हणजे काय – Organic Farming Marathi

सेंद्रिय शेती म्हणजे काय – Organic Farming Marathi

शेती व्यवसायातून अधिकतम उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, शेणखत/सेंद्रिय खताचा अभाव इ. कारणांमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य तसेच पिकास आवश्यक अन्नद्रव्य मात्रा या आधारे आवश्यक खत मात्रांचा अवलंब करणे शक्य होते.

सेंद्रिय शेती संकल्पना पर्यावरणीय बाबीशी निगडित असणारी संकल्पना आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. सध्याच्या व्यापार केंद्रित शेती व्यवस्थेमुळे शेतीत रासायनिक खते, कीटकनाशके, रासायनिक बुरशीनाशके व तणनाशके या सर्वांचाअवाजवी स्वरूपात भरमसाठ होत आहे

मोठा होणारा वापर व त्यामुळे वाढत चाललेले तापमान व घटत चाललेली जमिनीची सुपीकता तसेच माती व पाणी यांचे वाढत असणारे प्रदूषण इत्यादींचा विचार केला असता एकंदरीत यामधूनसंपूर्ण पृथ्वीवरील सजीवसृष्टीला (मानव, प्राणी, वनस्पती) जैवविविधतेला धोक्याची पूर्वसूचना प्राप्त होत आहे. म्हणून रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती शाश्वत स्वरूपाची व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारी शेतीची उत्तम पद्धती आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचा मुद्दा जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून आहे. सेंद्रिय शेती निसर्गातील विविध तत्त्वावर आधारित आहे. या पद्धतीत रासायनिक खतांचा वापर कमी करून किंवा शक्‍य असल्यास टाळून अथवा तत्सम कृषी उत्पादनावर आधारित उद्योगांमधून निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थाचा  अधिकाअधिक व कार्यक्षम पद्धतीने वापर केला जातो. याकरिता काडीकचरा, धसकटे, जनावरांचे मलमूत्र, अवशेष इत्यादी शेतात अथवा शेतीबाहेर कुजवून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते.

सेंद्रिय शेती म्हणजे काय?

स्थानिक संसाधनाचा वापर करणारी, कमी भांडवली खर्चाची मूळ तत्त्वावर आधारलेली, सेंद्रिय पदार्थाचा सुयोग्य वापराने जमिनीची उत्पादनक्षमता वाढवून ती टिकवून धरण्यावर भर देणारी, जैविक विविधता जोपासणारी, शेतकरी कुटुंबाच्या पोषण विषयक व इतर मूलभूत गरजा पूर्ण करणारी निसर्ग पूरक स्वयंपूर्ण शेती पद्धती म्हणजेच ‘सेंद्रिय शेती” होय.

See also  हरघर तिरंगा योजना तसेच अभियानाविषयी माहीती - Har Ghar Tiranga Abhiyan

सेंद्रिय शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे पाहणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती करताना सर्वांत महत्त्वाचा घटक ‘सेंट्रिय कर्ब’ आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीतील कुजलेला काडी-कचरा (झाडाची पाने/मुळे, प्राणी/प्राण्यांची विष्ठा इत्यादी). जमिनीत असंख्य सूक्ष्म

जीवजंतू वास्तव करीत असतात. त्यात बुरशी, बॅक्टेरिया, अक्टीनोमायसिन यांचा समावेश होतो. हे जीवजंतू सेंद्रिय पदार्थाचे विघटन दोन किंवा तीन अवस्थेत करतात. जसे एखादी गोष्ट जेव्हा मातीत कुजते तेव्हा त्याचे प्रथम

रूपांतर सेंद्रिय कर्बामध्ये होते. त्यानंतर त्याचे ह्युमसमध्ये रूपांतर होते.

सेंद्रिय शेती करण्यासाठी जास्तीत जास्त म्हणजेच पूर्णता सेंद्रिय पदार्थाचा वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती करण्यासाठी सेंद्रिय  खतांचा एकीकृत वापर करावा.

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांवर टिकवून पर्यावरणाचा समतोल राखता येईल. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत,

नागरी कंपोस्ट खत, हिरवळीचे खत व सेंद्रिय द्रव्ये पुरविणारे पदार्थ वापरले जातात. शेतात ताग, धेंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ती जमिनीत गाडली जातात. डाळवर्गीय पिकांमुळे जमिनीत नत्राचे मोठ्या प्रमाणावर स्थिरीकरण होत असल्यामुळे या पिकांचा अंतर्भाव पद्धतीमध्ये केला जातो. सेंद्रिय शेतीमध्ये जैविक कीड नियंत्रण तत्त्वांचा अवलंब करून, कीटकनाशके कमीत कमी वापरावेत.

सेंद्रिय शेतीचे उद्दिष्टे-Organic Farming Marathi

  • सेंद्रिय शेती पद्धतीत सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविणे.अन्नद्रव्य व्यवस्थापनात नैसर्गिक समतोल राखणे.
  • पीक उत्पादनात खर्च कमी आणण्यावर भर देणे
  • पिकांच्या उत्पादन क्षमतेत सातत्य कायम राखणे जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी कर्बाचे प्रमाण वाढविणे
  • सेंद्रिय शेती पद्धतीत स्थानिक संसाधनांचा वापर करणे स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भर देणे
  • विषमुक्त अन्नाची शाश्वती, आर्थिक सुरक्षितता शेताबाहेरील निविष्ठांचा कमीत कमी वापर करणे
  • मिश्र शेती पद्धतीतून जैविक विविधता टिकवणे

सेंद्रिय शेतीचे फायदे-Organic Farming Marathi

  • जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकून राहते. शेती उत्पादनाची प्रत उंचावून साठवणूक क्षमतेत वाढ होते.
  • जमिनीच्या धुपीचे प्रमाण कमी होते.
  • मित्र किडी, उपयुक्‍त जीवजंतू यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊनहानिकारक किडींचा प्रादुर्भाव टाळला जाऊ शकतो.
  • पशुधनाचा शेती मशागतीमध्ये भरपूर प्रमाणात उपयोग करता येतो. सेंद्रिय शेती पद्धतीपासून मिळणाऱ्या कृषी मालात कीटक व बुरशीनाशकाच्या अवशेषांच्या विषाचे प्रमाण नसते.
  • जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा होते.
  • जमिनीचे शुद्धीकरण होऊन पिकात प्रतिकारशक्ती निर्माण होते.
  • सेंद्रिय शेतीमुळे जमिनीवरील वातावरण खेळते राहते तसेच जमिनीचाआम्ल-विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.
  • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते तसेच स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.
  • जमिनीची सुपीकता व सजीवता वाढते आणि जमिनीचा पोत सुधारतो तसेच जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात.
  • पाण्याची ५० टक्के बचत होऊन जमिनीची जलधारणाशक्ती वाढते आणि जमीन क्षारपड होण्यापासून वाचते.
  • सेंद्रिय शेतीमुळे जमिनीत सर्वच प्रकारच्या जीवजंतूंची झपाट्याने वाढ होते आणि सर्वच रासायनिक क्रिया प्रक्रियांचे नियंत्रण होते.
  • सेंद्रिय शेतीमुळे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जातो. जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर शेतकरी करू शकतात. हिरवळीच्या खताचे पीक शेतात वाढवून फुलोऱ्यापूर्वी जमिनीत गाडणे. (उदा. ताग/बोरू, धेंचा चवळी इत्यादी).
  • हिरवळीच्या खताचे पीक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्यांच्या कोवळ्या फांद्या व पाने शेतात आणून जमिनीत मिसळणे. (उदा. गिरिपुष्प, सुबाभूळ, शेवरी इत्यादी) पिके जमिनीत अन्नपुरवठ्याबरोबरच
  • जमिनीतील कर्ब नत्र गुणोत्तर समान ठेवण्यास मदत करतात.
  • तसेच सच्छिद्रता वाढल्याने जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या वाढते. तसेच आपण सेंद्रिय शेतीसाठी जैविक खतांचा म्हणजेच रायझोबियम, अँझोला, अझॅटोबॅक्टर, निळे हिरवे शेवाळ यांचा वापर करून मातीतील जीवसृष्टी संपन्न करू शकतो.
  • सेंद्रिय शेती करीत असताना काही तत्वे आपण जोपासली पाहिजे व मुख्य म्ह्णजे निसर्गाप्रती प्रेम व आवड असणे आवश्यक आहे. निसर्गाने आपल्याला हे सर्व दिले आहे म्हणून आपणही निसर्गाचा काही देणं लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणे महत्वाचे आहे.
  • सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असते तरी ते सकस असते. सेंद्रिय शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खर्च कमी होऊ शकतो.
See also  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याविषयी संपुर्ण माहीती– Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi

माहिती संदर्भ – शेतकरी नियतकालिक

3 thoughts on “सेंद्रिय शेती म्हणजे काय – Organic Farming Marathi”

Comments are closed.