पसायदानाचा अर्थ – Pasaydan meaning in Marathi
१)आता विश्वात्मके देवे
येणे वागयज्ञे तोषावे
तोषोनी मज द्यावे
पसायदान हे
अर्थ -ज्ञानेश्वरीचे लेखन पुर्ण झाल्यानंतर जो विश्वाचा आत्मा आहे
सर्व धर्मातील विश्वात्मक देव आहे त्याला ज्ञानेश्वर विनंती करीत आहे की त्यांनी ह्या वाडमय यज्ञाने प्रसन्न व्हावे.वागमयरूपी यज्ञ केला आहे त्याने संतुष्ट व्हावे.अणि मला संतुष्ट होऊन हे प्रसादाचे दान द्यावे.
ज्ञानेश्वरांनी त्यांचे सदगुरू निवृतीनाथ यांना विश्वात्मक ही उपाधी येथे दिली आहे.
२)जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो
भुता परस्पर पडो
मैत्र जीवांचे
अर्थ –
सर्वप्रथम दृष्टांचे दृष्टपण सुटून जावो त्यांच्यात सत्कर्माची आवड निर्माणा व्हावी असे झाल्यास कोणाचे कोणाशी शत्रुत्व राहणार नही.सर्व प्राणीमात्रांमध्ये मैत्रीचा व्यवहार संबंध निर्माण होईल.
मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वता जबाबदार आहे त्याने स्वता स्वताचा उदधार करावा असे यातुन ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे.
३)दुरीतांचे तिमिर जावो
विश्व स्वधर्म सुर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो
प्राणीजात
अर्थ -पापरूपी अंधाराचा नाश होऊन ह्या संपुर्ण विश्वाने आत्मयाचा धर्म पाहावा संपुर्ण विश्वाने स्वधर्मरूपी सुर्याच्या प्रकाशात स्वताला पाहावे.
जेव्हा आपणास आत्मसाक्षात्कार प्राप्त होत असतो तेव्हा आपोआप आपल्या ईच्छा शुदध पावन होतात.शुदध झालेल्या ईच्छा आपोआप परमेश्वराला मान्य होतात.प्रत्येक प्राण्याला तो जी काही ईच्छा करेल ते प्राप्त व्हावे.
सत्व रज अणि तम ह्या तीन गुणांच्या कमी अधिक प्राबल्यामुळे मनुष्याचे आचरण तयार होते.रज तमच्या जोराने काम अणि त्यामुळे लोभ मोह मत्सर हे शत्रु अधिक बलवान होत असतात.अणि मनुष्य पापाचरण करण्यास प्रवृत्त होत असतो.
म्हणजेच जेव्हा आपणास आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा आपोआप आपल्या मनातील सर्व वाईट ईच्छा गळुन पडतात.अणि जे चांगले आहे सर्व जगासाठी कल्याणकारी आहे तीच ईच्छा फक्त शेवटी आपल्या मनात शिल्लक राहते.
म्हणजे आपण फक्त जगाच्या कल्याणाची ईच्छा करतो.
४)वर्षत सकळ मंडळी
ईश्वरनिष्ठांची मांदीयाळी
अनवरत भुमंडळी
भेटतु भुता
अर्थ –
ह्या सर्व पृथ्वीतलावर मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संताचा जमाव ह्या पृथ्वीवर होवो.ह्या भुमंडळावर असे संत अवतरीत व्हावे सर्व प्राणीमात्रांना असे संत भेटावे.
५)चला कल्पतरूंचे आरव
चेतना चिंतामणीचे गाव
बोलते जे अर्णव
पीयुषाचे
अर्थ -ईश्वरनिष्ठांचे वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज यांनी तीन काव्यमय उपमा दिल्या आहे.
कल्पतरू जो आपल्या सर्व कल्पणा पुर्ण करतो असा वृक्ष.जे चालणारे कल्पतरूंचे बगीचे आहे.
जो सचेत अशा चिंतामणीचे गाव आहे.चिंतामणी म्हणजे असा मणी जो आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करतो.
अर्णव म्हणजे सागर अणि पीयुष म्हणजे अमृत अमृतांचे बोलणारे समुद्र अशी उपमा दिली आहे.
तिन्ही उपमांचे विश्लेषण –
कल्पतरू हे एक असे वृक्ष असते जे आपण मागतो ते आपणास देते पण त्यासाठी आपल्याला स्वता त्याच्याकडे जावे लागते.
सज्जन पुरूष हा कल्पतरू आहेच शिवाय तो स्वता आपल्याकडे येत असतो.अणि आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करतो.
संत हे आपणास आपण ज्याचे चिंतन करतो तेच देतात.अणि संत हे देताना योग्य अणि अयोग्य याचा विवेक बाळगत असतात.
अमृताचा एक थेंब आपणास अमरत्व प्रदान करतो संत हे अमृताचा बोलणारा सागर आहे म्हणुन तो पुर्ण समाजाला बोलून अमर करू शकतो.
६) चंद्रमे जे अलांछन
मार्तड जे तापहीन
ते सर्वाही सदा सज्जन
सोयरे होतु
अर्थ –
येथे संतांची तुलना चंद्र अणि सुर्याशी करण्यात आली आहे.ज्याला कुठलाही डाग नाही असा चंद्र संत आहे.चंद्रावर डाग आहे पण संतांचे चरित्रय पुर्णपणे निर्मळ आहे.
संत हा चंद्राप्रमाणे शीतल अणि आनंद देणारे असतात.सुर्य हा दाहक असतो पण संत हे सुर्यासारखे समस्त ज्ञानाचा प्रकाश आपणास देतात पण ते सुर्यासारखे दाहक नसतात.
७) किंबहुना सर्वसुखी
पुर्ण होऊनी तिही लोकही
भजीजो आदी पुरूखी
अखंडीत
अर्थ –
तिन्ही लोकातील सर्वानी सुखी होऊन आदीपुरूषाची अखंडीत सेवा भक्ती करून त्यांनी परमेश्वराला प्रसन्न करावे.अशी प्रार्थना ज्ञानेश्वर माऊली करतात.
दृष्ट पुरूषांची दुर्बुदधी नाहीशी होऊन त्याला सत्कर्मात रती रती उत्पन्न होईल.
पापाचा अंत होईल.पापाचा अंधार दुरू होऊन स्वधर्माचा सुर्य उगवेल.चारित्र्यवान पुरूष सर्व प्राणीमात्रांचे सोयरे होतील.समाजातील सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय समाजाचे कल्याण उदधार होणार नही.
८) आणि ग्रंथोपजीविये
विशेष लोकी ईये
दृष्टा दृष्ट विजय
हो आवे जी
अर्थ -हे ग्रंथ ज्यांचे जीवन बनले आहे.असे जे विशेष लोक आहेत त्यांना दृष्ट अदृष्ट गोष्टींवर विजय प्राप्त होवो.असे मागणे ज्ञानेश्वर महाराज मागतात.
९) येथ म्हणे श्रीविश्ववेश्वरावो
हा होईल दानपसावो
येणे वरे ज्ञानदेवो
सुखिया झाला
अर्थ -तेव्हा विश्वाचे राजे म्हणाले या प्रसादाचे दान मिळेल ह्या वरामुळे ज्ञानेश्वरांना आनंद झाला.
निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरांनी विश्वाचा राजा असे संबोधिले आहे.
श्रोत्यांनी मन लावून या ग्रंथाचे श्रवण केले अणि तसेच आचरण केले तर ते सर्व जण सुखी होतील
ही ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा पुर्ण होवो.असा आर्शीवाद निवृतीनाथ यांनी ज्ञानदेवांना दिला त्यामुळे ज्ञानदेव सुखी झाले.
पसायदान व त्याचा अर्थ अतिशय सोप्या भाषेत सांगितलं आहे
धन्यवाद
माझ्या माऊलीची बराबरी कुठेच होवू शकत नाही.हे सत्य आहे..
विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी मागितलेली प्रार्थना आहे.
निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान, मुक्ताबाई अशी संत, तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तींना माझा साष्टांग दंडवत आहे.