पेटीअमच्या शेअर्समध्ये तेजी- – Paytm shares rise as CLSA maintains Buy rating
पेटीएमच्या शेअर्सने आतापर्यंत बाजारात दहा महिन्यांचा उच्चांक गाठला आहे.
अशा वेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की भविष्यात हया शेअर्समध्ये अधिक तेजी येणार का?हे शेअर्स खरेदी करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार का?
आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.एक्स पर्टचे याविषयी काय मत आहे हेच आपण बघणार आहोत.
पेटीएम शेअर्सचा गेल्या चार महिन्यांतील हा सर्वोत्तम आठवडा राहिला आहे.ह्या व्यावसायिक आठवड्यामध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 13.5 टक्के वाढ झाली आहे असे आपणास दिसून येते.
म्हणुन गुंतवणूकदार पेटीअमच्या व्यावसायिक प्रदर्शनात होत असलेल्या सुधारणेमुळे ह्या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसुन येत आहे.
शुक्रवारच्या दिवशी ९ जुन २०२३ रोजी पेटीयमच्या शेअर्स मध्ये ५.४१ टक्के इतकी तेजी दिसुन आली.विदेशी ब्रोकरेज फर्म बॅक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने पेटीअमच्या शेअर्सची रेटिंग वाढवण्यात आल्यानंतर पेटीएमचे शेअर्स सलग तीन दिवस बढती प्राप्त करत मजबुत होताना दिसुन आले आहेत.
बोफा सिक्युरीटीजने पेटीएमचे शेअर्सची रेटिंग नयुट्रल वरून वाढवत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.तेव्हापासुन ह्या शेअर्सच्या खरेदी मध्ये वाढ झाली आहे.
पेटीएम कंपनीचे शेअर्स ९ जुन रोजी शुक्रवारी ७७८ रूपयांच्या भावावर उघडताना दिसुन आले अणि हे शेअर्सचे भाव दिवसभरात ८२२ रूपयांच्या पातळीवर पोहोचले.
ट्रेंडच्या शेवटी बीएसई वर ५.४१ टक्के इतकी बढती प्राप्त करत ८१३.७५ रूपयांच्या भावावर बंद होताना दिसुन आले.
पेटीएमचे शेअर मध्ये गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.हे २२ आॅगस्ट २०२२ नंतर उच्च स्तरावर ट्रेंड करीत आहे.
२०२३ मध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून ह्या स्टाॅक मध्ये सुमारे 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे.गेल्या सहा महिन्यांत त्यात ५४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असल्याचे दिसून येते.
सध्या,हा शेअर 439.6 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून जवळपास 85 टक्क्यांनी वाढला आहे.ज्याला याने २३ नोव्हेंबर २०२२ ला गाठले होते.
बोफा सिक्युरिटीजने पेटीएमचे रेटिंग वाढवण्यामागे त्याच्या महसूल वाढीच्या तीव्र गती कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.ब्रोकरेजचे असे मत आहे की पेटीयमच्या शेअर्स मध्ये ट्रेंड दवारे पैसे कमविण्याची विपुल क्षमता आहे.
मागील पाच दिवसात ह्या शेअरमध्ये १२ ते १३ टक्के इतकी वाढ झाली आहे.पेटीएमच्या शेअर्स मध्ये ह्या वर्षी ५० टक्के पेक्षा अधिक तेजी दिसून आली आहे.
मागील सहा महिन्यात हा शेअर्स ४७ टक्के इतका वर चढताना दिसुन आला आहे.
गुंतवणूक तज्ञांकडून ह्या शेअर्स मध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.येत्या काही दिवसात हा स्टाॅक ८४० तसेच ८४५ पर्यंत पोहोचेल असे तज्ञांचे मत आहे.
NOTE -The information in this blog is not meant to be an endorsement or offering of any stock purchase. Investments in securities market are subject to market risks, Always Refer your financial consultant advice before Investing.