अमेझॉन च्या भयानक जंगलात ४ मुलांनी दिली तब्बल ४० दिवस मृत्यूशी झुंज – Amazon forest rescue in Marathi

अॅमेझाॅनच्या भयानक जंगलात ४ मुलांनी दिली तब्बल ४० दिवस मृत्यूशी झुंज Amazon forest rescue in Marathi

Four missing Children have been found alive 40 days after Amazon jungle plane crash.

कोलंबिया येथील अॅमेझाॅनच्या भयावह अशा जंगलातून चाळीस दिवसांच्या प्रदिर्घ कालावधी नंतर चार मुलांची सुटका झाली आहे.

४० दिवस मृत्यूशी दिलेल्या झुंजेमुळे ह्या मुलांनी सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.हया मुलांनी केलेली ही कामगिरी खरच कौतुकास्पद अणि कोलंबिया देशासाठी आनंददायी आहे असे येथील राष्ट्रपती गुसतावा पेटरो म्हणाले आहेत.

१ मे रोजी ही चारही मुले आपल्या आईसोबत विमानाने प्रवास करत होती.पण अचानक विमान जमिनीवर कोसळले अणि ह्या विमान दुर्घटनेत चारही मुलांच्या आईचा अणि वैमानिकाचा मृत्यू झाला.

कोसळलेले हे विमान जगातील सर्वात भयानक जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझाॅन जंगलामध्ये जाऊन कोसळले.

पण अपघातानंतर ही चारही मुले अॅमेझाॅनच्या जंगलातुन गायब होती विमान कोसळले त्या ठिकाणी त्यांचे शव आढळुन न आल्याने ह्या चारही मुलांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.

ह्या शोध मोहीम मोहीमेत सैनिक तसेच स्थानिक नागरीक देखील समाविष्ट झाले होते.हया अॅमेझाॅनच्या भयानक जंगलात हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी रिसकयु आॅपरेशन राबविण्यात आले होते.

ह्या मुलांना अॅमेझाॅनच्या विशाल अणि भीतीदायक घनदाट जंगलातुन शोधुन काढणे हे ह्या रेसक्यु टीम करीता खुप चॅलेंजिंग काम होते.कारण इथे श्वास घेण्यास देखील त्रास होतो.

असे म्हणतात की अॅमेझाॅन हे इतके विशाल अणि भयानक घनदाट जंगल आहे की इथे एखादा व्यक्ती हरवला तर तो लवकर सापडणे अत्यंत कठिण आहे.

त्यातच इथे वन्य प्राणी बिबट्या वाघ सिंह यांची भीती तसेच दहशतवादी ड्रग्ज तस्करी करणारया टोळके अडडे करून लपलेले असल्याची देखील भीती आहे.

अशा परिस्थितीत देखील ज़ंगलात हरवलेल्या ह्या चारही मुलांनी तब्बल ४० दिवस जिवंत राहुन दाखवले आहे.हया चाळीस दिवसांच्या प्रदिर्घ कालावधी नंतर रेसक्यु टीमने त्यांना जंगलातुन शोधुन काढले आहे.

See also  आंतरराष्ट्रीय युवा दिवस का साजरा केला जातो?ह्या दिवसाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? international youth day history and importance

रेसक्यु टीमला जसजसे सुगावे मिळत गेले तसतसे त्याचा पाठलाग करत रेसक्यु टीमने मुलांचा शोध घेतला मग ते मुलांच्या पायाचे ठसे असो किंवा त्यांचे कपडे लत्ते असो अणि अखेरीस ही मुले रेसक्यु टीमच्या हाती लागली आहेत.

अॅमेझाॅनच्या जंगलात ४० दिवस जिवंत राहुन दाखवणारी ही चारही मुले हयुटोटो ह्या स्वदेशी गटसमुहातील आहे.हया मुलांना बालपणापासून फाॅरेस्ट स्किल्स शिकवण्यात आले होते.

घनदाट जंगलात हरवल्यावर जंगलात कसा उदरनिर्वाह करायचा वन्य प्राणी यांच्या पासुन आपला बचाव कसा करायचा जंगलात कसे राहायचे हे सर्व ट्रेनिंग ह्या मुलांना लहानपणापासूनच देण्यात आली आहे असे ह्या चारही मुलांच्या आजोबांनी सांगितले आहे.

ह्या मुलांच्या आजोबांनी असेही सांगितले की ह्या चारही मुलांना बालपणापासून शिकार कशी करायची मासे कसे पकडायचे त्यांच्यापासून खायला अन्न कसे बनवायचे हे शिकविण्यात आले आहे.

रेसक्यु आॅपरेशन केलेली ही मुले अशक्त झाली आहे त्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अॅमेझाॅनचे जंगल जगातील सर्वात भयानक जंगल म्हणून का ओळखले जाते इथे जायला लोक का घाबरतात?

अॅमेझाॅन हे जगातील सर्वात मोठे विशाल अणि घनदाट असे रहस्यमयी स्वरुपाचे जंगल आहे.

ह्या भयानक जंगलात अनेक जंगली हिंस्र प्राणी वाघ सिंह बिबट्या इत्यादी जीव जंतु देखील आहेत.इथले एखादे लहान किडे चावले तरी माणसाचा जीव जाईल इतके भयानक विषारी इथले प्राणी अणि प्रत्येक जीव जंतु आहे.

हे जंगल एवढे घनदाट आहे जो ह्या जंगलात फिरायला जाईल तो पुन्हा लवकर सापडणार नाही.हया जंगलात ड्रग तस्करी करणारया टोळके अडडे करून लपुन राहतात असे म्हटले जाते.

इथल्या घनदाट जंगलामुळे सुर्याची किरणे देखील जमिनीला गाठु शकत नाही.इथे अडकलेला व्यक्ती फोन देखील लावू शकत नाही कारण इथे नेटवर्कची सुविधा उपलब्ध नाहीये.

असे म्हटले जाते की आपल्या पृथ्वीला प्राप्त होत असलेल्या आॅक्सिजन पैकी २० टक्के आॅक्सिजन एकटे हे जंगल पुरवते.

See also  एक महिला मासे खाल्यानंतर लगेच गेली कोमात!! मासे खाताना तुम्ही करू नका ह्या चुका –Woman loses limbs after battling bacterial infection from Tilapia

ह्या जंगलात १७ हजार झाडांच्या प्रजाती उपलब्ध आहेत.५०० पेक्षा अधिक आदिवासी प्रजाती आहेत.ह्यातल्या काही प्रजाती अशा आहे ज्यांना बाहेरच्या व्यक्तीने त्यांच्या क्षेत्रात जाणे मान्य नाही म्हणून बाहेरून ह्या प्रजातीच्या हददीत जो व्यक्ती जातो त्याला हे जिवंत येऊ देत नाही.