399 रुपयांमध्ये 10 लाखाचा अपघाती विमा भारतीय डाक विभाग – Post office Accident Insurance Scheme
मित्रांनो आपल्याला प्रत्येकालाच आपल्या स्वताच्या जीवाची,आपल्या कुटुंबाच्या जीवाची काळजी असते.
म्हणुन आपण भविष्याच्या दृष्टीकोनातुन वेगवेगळया महत्वाच्या विमा पाँलीसी खरेदी करत असतो.
आज आपण पोस्ट खात्याने आपल्यासाठी म्हणजे देशातील सर्वसामान्य अणि गरीब जनतेसाठी सुरू केलेल्या अशाच एका नवीन लाभदायी विमा योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
या योजनेत आपल्याला फक्त 399 रूपये दरवर्षी भरायचे आहेत.अणि याबदल्यात आपणास 10 लाखाचा विमा प्राप्त होणार आहे.
या योजनेदवारे आपणास जर आपला अपघातामध्ये मृत्यु झाला तर 10 लाख रूपये मिळणार आहे.
जर आपणास अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आले तरी देखील 10 लाख दिले जाणार आहे.
याव्यतीरीक्त मुलांचा शिक्षणाचा खर्च,दवाखाना तसेच ओपीडी इत्यादीचा खर्च असे अनेक फायदे ह्या योजनेत सहभागी होऊन आपणास प्राप्त करता येणार आहे.
ह्या विमा योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ प्राप्त व्हावा यासाठी पोस्ट खात्यातील कर्मचारींकडुन देखील ह्या विमा योजनेत सहभागी होण्याचे नागरीकांना आवाहन केले जात आहे.
या अपघाती विम्यामध्ये एकुन दोन प्लँन असणार आहे प्रतिवर्ष 299 रूपये विमा,399 रूपयांचा प्रतिवर्ष विमा त्यासाठी वयोमर्यादा वगैरे काय असेल ह्या इत्यादी बाबींविषयी आपण आजच्या लेखादवारे जाणून घेणार आहोत.
डाक विभागाने सुरू केलेल्या ह्या नवीन योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे?
1)जर आपला अपघाती मृत्यु झाला तर आपल्या कुटुंबाला 10 लाख रूपयांचा विमा ह्या योजनेदवारे प्राप्त होईल.
2) जर अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले तरी देखील आपणास 10 लाख रूपयाचा विम्या ह्या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
3) 60 हजारापर्यतचा दवाखान्याचा खर्च देखील दिला जाणार आहे.रूग्णालयात दिगल न होता आपण घरीच उपचार केला तरी देखील आपण ह्या योजनेअंतर्गत 30 हजारापर्यत क्लेम करू शकतो.
4) मुलांच्या शिक्षणासाठी देखील खर्च दिला जाणार आहे.जर आपल्या घरामध्ये एकुण दोन मुले असतील तर दोघांच्या शिक्षणासाठी ह्या योजनेअंतर्गत आपणास प्रत्येकी एक लाख इतका दिला जाणार आहे.जर समजा आपल्याला दोन पेक्षा अधिक मुले असतील तर आपणास ह्या योजनेअंतर्गत शैक्षणिक खर्चाचा लाभ प्राप्त होणार नाही.
5) जर आपण आजारपणात प्रकृती खराब असल्याने दवाखान्यात अँडमिट झालेले असाल तर आपणास दहा दिवसासाठी दररोज हजार रूपये प्रमाणे दवाखान्याचा खर्च दिला जाईल.
जर आपण दहा दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी दवाखान्यात अँडमिट झालेले असाल तर त्याचा कुठलाही खर्च आपणास दिला जाणार नाही.म्हणजेच आपणास फक्त दहा दिवसाचा दवाखान्याचा खर्च दिला जाईल.
6) या विमा योजनेअंतर्गत आपणास 30 हजारापर्यतचा ओपीडीचा खर्च दिला जाणार आहे.
7) अपघातामुळे जर आपण पँरलाईज झाले असाल तर आपणास इथे 10 लाख मिळणार आहे.
8) दवाखान्याचा प्रवास खर्च सुदधा आपल्या सर्व कुटुंबाला मिळुन 25 हजारपर्यत दिला जाणार आहे.
9) विमा धारकाचा जर अपघातात मृत्यु झाला तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी सुदधा पाच हजार दिले जाणार आहेत.
आपण ही विमा योजनेची गूंतवणुक कधीपर्यत करू शकतो?यासाठी वयोमर्यादेची अट काय आहे?
आपण ही विमा योजनेची गुंतवणुक 18 ते 65 वयापर्यत करू शकतो.म्हणजेच 18 ते 65 ह्या वयोगटातील नागरीकांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपले चालु खाते असावे लागेल.अणि आपले खाते नसेल तर आपण नवीन खाते उघडु शकतात.
299 च्या योजनेत नागरीकांना कोणते लाभ प्राप्त होणार नाहीत?
जर आपण 399 च्या योजनेत भाग न घेता 299 च्या योजनेत सहभागी झालात तर आपणास खालील लाभ प्राप्त होणार नाहीत-
-मुलांच्या शिक्षणासाठी दिला जाणारा प्रत्येकी एक लाखाचा खर्च
-दवाखान्यात असल्यावर दिला जाणारा प्रतीदिन एक हजार हा खर्च दिला जाणार नाही.
-कुटुंबाला दिला जाणारा दवाखान्याचा वाहतुक प्रवास खर्च सुदधा दिला जाणार नाही.
-विमा धारकाच्या अंत्यसंस्काराचा पाच हजार रूपये खर्च दिला जाणार नाही.
399 चा प्लँन सर्वसामान्य नागरीकांसाठी खुप महाग आहे का?
मित्रांनो खर पाहायला गेले तर दर महिन्याला मोबाईलचा रिचार्ज करायला,चैनचंगळ करायला,गुटख्याच्या पुडया खायला,सिगारेट ओढायला तसेच मुव्ही बघायलाच,रोज टपरीवर बसुन चहापाणी करायला,मित्रांसोबत पार्टी करायला आपण हजार दोन हजार असेच सहज खर्च करून टाकत असतो.
मग आपल्या अणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी जर दर वर्षाला 399 रूपये आपणास भरावे लागता आहे तर हे आपल्यासाठी काहीच जड नसायला हवेत.असे माझे स्वताचे वैयक्तिक मत आहे.
डाक विभागाने ही योजना का सुरू केली आहे?
विमा धारकास दहा लाखापर्यतचे कव्हर प्राप्त करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ह्या योजनेचे फायदे –
शहरी तसेच ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय लोकांना ह्या विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही?
नौदल,हवाई तसेच पोलिस दलातील व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
कोण कोणत्या परिस्थितीत नागरीक ह्या योजनेमधील लाभ मिळवु शकणार नाहीत-
आरोग्या संदर्भात कुठलीही पुर्व विद्यमान स्थिती असलेली व्यक्ती.जसे की आजार अपंगत्वामुळे अपघात
आत्महत्या तसेच मादक पदार्थाचे सेवण केल्याने अपघात झालेली तसेच प्रकृती बिघडलेली व्यक्ती.
बाळंत पण तसेच गर्भधारणेमुळे नुकसान झाल्यास
खाण कामगार,बांधकाम कामगार ड्राईव्हींगचा व्यवसाय करणारी व्यक्ती असेल
विषारी अणि स्फोटक औषध तयार करणारया कंपनीमधील कामगार
योजनेचा कालावधी किती असणार आहे?
ह्या योजनेचा एकुण कालावधी हा एक वर्ष इतका असेल एक वर्षानंतर विमा धारकास आपल्या बिमाचे नुतनीकरण पोस्ट आँफिसमध्ये जाऊन करावे लागेल.
ही विमा योजना टाटा ईआयपी कंपनीची आहे जिच्यासोबत इंडियन पोस्ट बँकेने करार करून ही योजना सुरु केली आहे.
Nice insurance
Good job post office
Attak आला तर लाभ मिळेल काय
Solapur hospital
पोस्ट आफिस मध्ये 18वेळा गेलो तरीही माझी पालीसी रीनीव्ह झाले नाही लीग राहत नाही म्हणून सांगतात ***
सुरेश रोकडे भंडारा 4441904
I am interested