Share Market –  80 महत्वाचे शब्द आपल्याला माहीत असायलाच हवेत – Share Market important terms beginner should know

Share Market –  80 महत्वाचे शब्द – 80 Share Market important terms beginner should know

जे गुंतवणुकदार स्टाँक मार्केटमध्ये नवीनच आलेले असतात.आणि नवशिकाऊ ट्रेडर्स असतात त्यांना स्टाँक मार्केटमध्ये प्रवेश केल्यावर काही असे नवीन Terms ऐकायला तसेच वाचायला मिळत असतात जे याआधी त्यांनी कधी कुठे ऐकलेले नसतात आणि जे Terms स्टाँक मार्केटमध्ये नेहमी वापरले जात असतात.

• पण स्टाँक मार्केटमध्ये नवीनतम असल्यामुळे बहुतेक ट्रेडर्सला काही अशा महत्वाच्या टर्मसचा काय अर्थ होतो हे अजिबात माहीत नसते.

• त्यातच आपण इंटरनेटवर सर्च केल्यावर तिथे देखील अशा महत्वाच्या Terms विषयी काही माहीती आपल्याला उपलब्ध होत नसते.

• आणि जर आपल्याला एक यशस्वी आणि एक्सपर्ट ट्रेडर बनायचे असेल तर स्टाँक मार्केटमध्ये वापरले जाणारे असे सर्व महत्वाचे Terms आणि त्यांचे अर्थ आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे.

• म्हणुन आजच्या लेखात आपण काही अशा Terms विषयी जाणुन घेणार आहोत जे स्टाँक मार्केटमध्ये नेहमी वापरले जात असतात.

• आणि जे Terms समजायला स्टाँक मार्केटमध्ये नवीन आलेल्या गुंतवणुकदारांना नेहमी अडचणींचा सामना करावा लागत असतो.

Share Market -महत्वाचे Terms कोणत्या आहेत? 80 Share Market important terms beginner should know

Share Market मध्ये वापरले जाणारे काही महत्वाचे Terms पुढीलप्रमाणे आहेत :

1)Share Stock शेअर्स किंवा स्टाँक :

शेअर्स किंवा स्टाँक हा म्हणजे गुंतवणुकदाराने एखाद्या कंपनीत घेतलेला एक हिस्सा असतो.गुंतवणुकदाराकडे यात जितके शेअर्स असतात.तो त्या कंपनीच्या तेवढया हिस्सा तसेच वाटयाचा हिस्सेदार असतो.

शेअर्सची किंमत ही नेहमी कमी जास्त होत असते.त्यात चढ उतार येतच असतात.

गुंतवणूकदार जे शेअर्स कलेक्ट करत असतो त्याच्या कलेक्शनला स्टाँक असे म्हणतात.

2) Share Holder :

जेव्हा गुंतवणुकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असतो तेव्हा तो त्या कंपनीचा शेअर होल्डर म्हणजेच हिस्सेदार बनत असतो.

 

3) Buying :बाईंग म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे किंवा त्या कंपनीचा हिस्सेदार बनणे असते.बाईंग म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे

4) Selling :गुंतवणूकदाराचे गुंतवणुकीचे ध्येय साध्य झाल्यानंतर तो आपले शेअर्स दुसरयाला विकत असतो त्यालाच सेलिंग असे म्हटले जाते.

तसेच तोटा कमी करण्यासाठी इतर कोणाला ते शेअर्स विकुन त्यापासुन मुक्ती मिळविणे असते.

 

5) Portfolio :

गुंतवणुकदार आपल्या खरेदी केलेल्या सर्व शेअर्सचा एक संग्रह तयार करत असतो ज्याला पोर्टफोलिओ असे म्हणतात.

गुंतवणुकदाराकडे कोणत्या कंपनीचे शेअर्स आहेत?आणि ते किती आहेत हे पोर्टफोलिओ मध्ये त्याला कळत असते.

गुंतवणुकीतील रिस्क आणि प्राँफिट या दोघांना मँनेज करण्यासाठी गुंतवणुकदार एक चांगला पोर्टफोलिओ तयार करत असतात.

6) IPO :Initial Public Offeringजेव्हा एखादी प्रायव्हेट लिस्टेड कंपनी शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी पहिल्यांदा आपले शेअर्स गुंतवणूकदारांना पब्लिकली आँफर करत असते तेव्हा त्याला Initial Public Offering (Ipo) असे म्हणतात.

आयपीओ हा प्रायमरी मार्केटदवारे होत असतो.

 

 

 

 

7) Intraday :

जेव्हा गुंतवणुकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून त्यात प्राँफिट प्राप्त करून त्याच दिवशी ते विकुन देत असतो त्याला Intraday Trading असे म्हणतात.

म्हणजेच इथे गुंतवणुकदार शेअर्स हे फक्त मार्केटमधून प्राँफिट प्राप्त करण्यासाठी खरेदी करत असतो.गुंतवणुकीसाठी नव्हे.

8) Delivery :

जेव्हा गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी करत असतो आणि तेच शेअर्स एका दिवसापेक्षा अधिक काळासाठी

Delivery

म्हणजे आठवडाभर,महिनाभरासाठी वर्षासाठी होल्ड करून ठेवत असतो ते कोणाला विकत नसतो तेव्हा त्यास Delivery असे म्हणतात.थोडक्यात एका दिवसापेक्षा अधिक काळ जेव्हा गुंतवणुकदार आपले शेअर्स होल्ड करून ठेवतो तेव्हा त्यास Delivery असे म्हटले जाते.

9) Broker :

ब्रोकर हा एक असा व्यक्ती असतो तसेच एखादी संस्था असते जी स्टाँक एक्सचेंजमध्ये रेजिस्टर मेंबर असते आणि यांच्याकडे लायसन्स देखील असते ज्यात ते आपल्या क्लाईंटच्या (गुंतवणुकदाराच्या) वतीने मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी तसेच विक्री करत असतात.
ज्याबदले त्यांचा क्लाईंट त्यांना काही चार्ज पे करत असतो.

10) Dividend :

गुंतवणुकदाराने ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले असतात त्या कंपनीला जेव्हा एखादा प्राँफिट होत असतो तेव्हा तो मिळवलेला प्राँफिट कंपनी रिइन्व्हेस्ट करत असते किंवा आपल्या कंपनीतील शेअर होल्डर्सला तो त्यांच्या वाटयानुसार वाटुन देत असते.त्याला Dividend असे म्हटले जाते.

See also  क्रेडिट नोट अणि डेबीट नोट म्हणजे काय?तसेच या दोघांमधील फरक - Meaning and Difference between credit note and debit note in Marathi

11)Bull Market : Bull Market

ह्या Term चा वापर मार्केटची स्थिती सांगण्यासाठी केला जात असतो.

म्हणजे यात जेव्हा एखाद्या शेअर्सची किंमत वाढत असते आणि गुंतवणुकदारांना मार्केटची स्थिती पाहुन असे वाटते की भविष्यात ह्या किंमतीत अजुन वाढ होईल तेव्हा अशा परिस्थितीला Bull Market म्हटले जाते.

यात शेअर्सच्या खरेदीचे प्रमाण अधिक वाढुन जात असते.

12) Bear Market :Bear Market

जेव्हा एखाद्या शेअर्सचे प्राईज डाऊन होत असतात.आणि गुंतवणुकदारांना मार्केटची स्थिती पाहुन असे वाटते की भविष्यात ह्या किंमतीत अजुन घट होईल तेव्हा अशा परिस्थितीला Bear Market म्हटले जाते.

यात लोकांना असे वाटते की भविष्यात शेअर्सची किंमत अजुन कमी होईल म्हणुन मार्केटमध्ये शेअर्सची विक्री वाढुन जात असते.

 

13) Blue Chip Share :

हे अशा कंपनीचे शेअर्स असतात जी कंपनी मार्केटमध्ये फार जुन्या कालावधीपासुन आहे जी फार दिग्दज देखील आहे आणि त्या कंपनीची फाइनान्शिअल कंडिशन देखील खुप स्ट्राँग आहे.मार्केट कँपिटलाईझेशन हाय आहे.

ज्या कंपनीचे शेअर्सची किंमत कधीही कमी होत नाही आणि त्यात गुंतवणुकदाराला चांगले रिटर्न्स देखील प्राप्त होत असतात.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे यात गुंतवणुकीची रिस्क कमी असते.

13) Stock Exchange :

स्टाँक एक्सचेंजमध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्रीचा व्यवहार होत असतो.भारतात दोन मोठे प्रमुख स्टाँक एक्सचेंज आहेत नँशनल स्टाँक एक्सचेंज आणि बा़ँम्बे स्टाँक एक्सचेंज.

14) Share Market 80 महत्वाचे शब्द INDEX

स्टाँक मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या कंपनींमध्ये कुठल्या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढते आहे किंवा त्यात घट होत आहे हे गुंतवणुकदाराला Index वरून कळते.

15) Squaring Off :

गुंतवणुकदाराने मार्केटमधील एखादा स्टाँक खरेदी केलेला आहे आणि तो त्याला विकायचा असेल त्यापासुन त्याला मुक्त व्हायचे असेल तर गुंतवणुकदार त्यातुन Exit करण्यासाठी Squaring Off करत असतात.

16) Rally :

जेव्हा एखादा शेअर लागोपाठ तेजीत किंवा मंदीत असतो आणि एकाच दिशेने त्याची स्थिती असते तेव्हा स्टाँक मार्केटने रँली दाखवली आहे तसेच एखाद्या शेअर्सने रँली दाखवली आहे असे म्हटले जाते.

17) Crash :

एखाद्या न्युज घडलेल्या आर्थिक नुकसानदायी घटना प्रसंग तसेच इतर कोणत्याही गोष्टीमुळे एखादा स्टाँक अचानक डाऊन होत असतो तेव्हा त्याला त्या स्टाँकचे मार्केट क्रँश झाले असे म्हटले जाते.

18) Correction :

जेव्हा स्टाँक तेजीत असतात तेव्हा त्यात कधी वाढ तर कधी घट असे बदल होत असतात.तेव्हा त्या स्थितीला Correction असे म्हणतात.

19) Bonus Share :

समजा एखाद्या गुंतवणुकदाराने एखाद्या बँकेचे शेअर्स खरेदी करून ठेवले आहेत.तेव्हा ती बँक तसेच कंपनी तिचे काही शेअर्स त्या गुंतवणुकदाराला कुठलेही चार्ज न घेता विदाउट एनी काँस्ट गिफ्ट म्हणुन देत असते तेव्हा त्याला Bonus Share म्हणतात.

20) Margin :

गूंतवणुकदाराला शेअर्स खरेदी करण्यासाठी ब्रोकरकडुन लिमिटच्या स्वरूपात काही पैसे दिले जात असतात.त्याला Margin असे म्हणतात.

21) Nifty :

National Stock Exchange मध्ये जे स्टाँक खाली किंवा वर जात असतात त्याला Nifty वाढला किंवा घसरला असे म्हटले जात असते.

22) Sensex :

Bombay Stock Exchange मध्ये जो शेअर बाजार निर्देशांक असतो जो खाली किंवा वर जात असतो त्याला सेंसेक्स असे म्हणतात.

23) Ltp :

Ltp म्हणजेच Last ट्रेडिंग केलेली Price असते.

समजा एखादी इक्विटी आहे जिची किंमत आता शंभर रुपये आहे पण याच्या अगोदर त्या शेअर्सची खरेदी गुंतवणुकदाराने 98 रूपये मध्ये केली होती तर ती त्याची Last Trade Price मानली जाते.

24) CMP :

Cmp ही Current Price असते.म्हणजे शेअर्सची आता जी प्राईज चालु आहे ती त्याची Current Maximum Price असते.

25) Circuit :

शेअर मार्केटमध्ये स्टाँक एक्सचेंजमध्ये Upper Limit तसेच Lower Limit चे एक Circuit स्टाँक एक्सचेंजकडुन लावले जात असते.

शेअर्सची किंमत ठाराविक मर्यादेपेक्षा जास्त डाऊन किंवा अप होऊ नये यासाठी त्यावर एक फिल्टर लावले जात असते.त्याला Circuit असे म्हटले जाते.

26) Market Cap :

मार्केट कँप म्हणजेच मार्केट कँपिटलाइझेशन असते.मार्केट कँप म्हणजे एखाद्या कंपनीच्या उपलब्ध शेअर्सची सध्या मार्केटमध्ये असलेली Value असते.

शेअर बाजाराकडुन ठरवण्यात आलेली एखाद्या कंपनीची मार्केट Value.

27) Primary Market :

जेव्हा एखाद्या कंपनीकडुन स्टाँक एक्सचेंजद्वारे आपल्या कंपनीचे काही शेअर्स विकुन गुंतवणुकदारांकडुन काही रक्कम जमा केली जाते तेव्हा त्या कंपनीला आपला आयपीओ सादर करणे अनिवार्य असते त्यालाच Primary Market म्हटले जाते.

28) Secondary Market :

सेकंडरी मार्केटमध्ये गुंतवणुकदाराला इशुअर कंपनीच्या हस्तक्षेपाविना देखील आपल्या मालकीच्या शेअर्सची खरेदी विक्री करता येत असते.

यात गूंतवणुकदारामध्ये शेअर्सची ट्रेडिंग होत असते.

29Ask Bid Price :Bid Price

Bid म्हणजेच बोली लावणे.लिलाव करणे असा होतो बिड प्राईज ही ती Maximum किंमत असते ज्यात Group Of Buyers एखादी Securities खरेदी करण्यास तयार होत असतात.

30) Ask Price:

Ask Price ही ती प्राईज असते ज्यात Sellers ला आपल्या Securities विकायच्या असतात.

31) Large Cap :

See also  ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? What is Operating System in Marathi

कुठल्याही कंपनीचे वर्गीकरण हे शेअर बाजारात तिच्या मार्केट कँपवरून निर्धारीत केले जात असते.

जर एखाद्या कंपनीचे मार्केट कँपिटलाईझेशन हे दहा अरब डाँलर पेक्षा अधिक असेल तर ती लार्ज कंपनी म्हणुन शेअर मार्केटमध्ये ओळखली जाते.

32) Mid Cap :

ज्या कंपनीचे मार्केट कँपिटलाईझेशन हे दोन हजार करोड पासुन 10000 करोड पर्यत असेल अशी कंपनी शेअर बाजारात Mid Cap कंपनी म्हणुन ओळखली जाते.

अशा कंपनी भविष्यात Large Cap बनण्याची मार्केटमध्ये अधिक संभावना दर्शवली जात असते.

33) Small Cap :

ज्या कंपनीचे मार्केट कँपिटलाईझेशन दोन हजार करोड पेक्षाही कमी असेल अशा कंपन्यांना Small Cap कंपनी म्हणुन मार्केटमध्ये ओळखले जात असते.

यात मार्केटमध्ये आलेल्या नवीनतम कंपन्यांचा अधिक समावेश असतो.

34) Asm

Asm म्हणजेच Additional Surveillance Measure.

सेबीकडुन गुंतवणुकदारांना देण्यात आलेली ही एक सुरक्षा असते.शेअर बाजारातील हेराफेरीला आळा घालण्यासाठी सेबीने तयार केलेली ही एक श्रेणी मानली जाते.

एखाद्या स्टाँकची किंमत मुलभुत सुचींचे समर्थन करत नसल्यास त्यांना Asm List मध्ये ठेवले जाते.

35) Eps:

Eps चा अर्थ Earning Per Share असा होतो.ईपीएसमध्ये हे सुचित केलेले असते की एखादी कंपनी तिच्या स्टा़ँकच्या प्रत्येक शेअरवर किती पैसे कमावते.

36) PE Ratio :

Price To Earning Ratio गुंतवणुकदारास हे सांगत असतो की एखाद्या कंपनीचे शेअर्स हे ईपीएसच्या तुलनेमध्ये शेअर बाजारात कोणत्या मुल्यामध्ये ट्रेड होत आहे.

यात गुंतवणुकदाराला हे कळत असते की त्याने किती रूपये मार्केटमध्ये शेअर्सवर लावले तर किती रूपये रूपये त्याला त्याबदले मिळतील.

37) Roe

Roe चा फुल फाँर्म Return Of Equity असा होतो.यात आपल्याला एखाद्या कंपनीचा प्राँफिट मेझर करता येत असतो.

शेअर होल्डरने कंपनीत गुंतवणुक केलेल्या आपल्या पैशांत कंपनीला काय रिटर्न्स प्राप्त होत आहेत हे यात कळत असते.

38) ROCE :

जेव्हा एखादी कंपनी व्यापारासाठी उद्योगासाठी कर्ज घेत असते त्या कर्जाचा कंपनीकडुन चांगल्या पदधतीने विनियोग केला जातो आहे की नाही हे जाणुन घ्यायला Return Of Capital Employee चा उपयोग केला जात असतो.

म्हणजेच कंपनीकडुन व्यापार उद्योगासाठी उपयोग केली जाणारी रक्कम आणि त्यावर कंपनीला प्राप्त होत असलेले रिटर्न्स हाच Return Of Capital Employee असतो.

39) Cash Reserve Ratio :

Cash Reserve Ratio ही एक ठेवीची टक्केवारी असते जी प्रत्येक बँकेने आरबीआयकडे रोख स्वरूपात राखीव ठेवणे गरजेचे असते.

मोठया मुबलक प्रमाणात पैसे काढताना बँकेस रोखीव संकटांचा सामना करता यावा यासाठी बँकेकडुन ही टक्केवारी रोख स्वरूपात आर बी आयकडे राखीव ठेवण्यात येते.

40) Net Profit :

एखाद्या कंपनीचे Total Income मधून जेव्हा आपण तिचा सर्व खर्च बाजुला काढतो त्यानंतर जी रक्कम बाजुला उरते ती त्या कंपनीचा नेट प्राँफिट म्हणण्यात येते.

41) Operating Profit Margin Ratio :

हा एक असा रेशो आहे ज्याच्यादवारे एखाद्या कंपनीला तिच्या Operations द्वारे काय प्राँफिट प्राप्त होतो आहे हे आपण जाणुन घेऊ शकतो.

42) Ebitda :

Ebita चा फुल फाँर्म Earning, Before Interest, Taxes, Depreciation, Amortization असा होता.

इंटररेस्ट,टँक्सेस,डिप्रेसिएशन,अमाँरटीझेशन हे Deduct करण्याच्या आधीच्या Earning ला Ebitda असे म्हटले जात असते.

43) Pbt :

Pbt म्हणजेच Profit Before Tax असतो.असा प्राँफिट ज्यात टँक्स जमा करणे अजुन बाकी आहे त्याला Profit Before Tax म्हटले जाते.

44) Short Term Trading :

जेव्हा एखादा गुंतवणुकदार सहा महिना किंवा एक वर्षाच्या थोडया कालावधीसाठी आपली गुंतवणुक करत असतो तेव्हा त्यास Short Term Trading म्हटले जाते.

45) Long Term Trading :

जेव्हा एखादा गुंतवणुकदार सहा महिना किंवा एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी आपली गुंतवणुक करत असतो तेव्हा त्यास Long Term Trading म्हटले जाते.

46) Ask Bid Spread :

बिड आस्क स्प्रेड ही एक रक्कम असते ज्याद्वारे मागणी किंमत मार्केटमधील मालमत्तेसाठी बोली किंमत ओलांडत असते.

यात विकत असलेल्या व्यक्तीस बोली किंमत प्राप्त होत असते.तर खरेदी करणारयास मागणी किंमत दिली जात असते.

47) Limit Order :

लिमिट ऑर्डर हा ऑर्डरचा एक प्रकार असतो जो खरेदी किंवा विक्री करण्यासाठी ठेवलेल्या किमतीवर अंमलात आणला जात असतो.

48) Market Order :

ही सुदधा एक आँर्डर आहे जी मार्केट Value नुसार शक्य तेवढया लवकर अंमलात आणली जाते.

49) Day Order :

जी Buy Order तसेच Sell Order आपण Place करत असतो.त्य आँर्डरची Validity ही तोपर्यतच असते जोपर्यत मार्केट क्लोज होत नाही.

50) Volatility :50) Volatility :

शेअर बाजारात शेअर्सचे प्राईज नेहमी कमी जास्त होत असतात म्हणजे त्यात एक प्रकारचा चढ तसेच उतार येत असतो ज्याला Volatility असे म्हटले जात असते.

51) Going Long

लाँग हा शब्द गुंतवणुकदाराने सिक्युरीटीज आणि डेरीव्हिटिव्हज खरेदी केल्यानंतर त्याची किंमत भविष्यात वाढेल ही अपेक्षा ठेवून जे काय खरेदी केले त्याचे वर्णन करतो.

See also  सात बारा(7/12) म्हणजे काय ? प्रत्येक जमीनमालकासाठी अत्यंत म्हत्वाच! - 7/12 information in Marathi

52) Averaging Down :

जेव्हा गुंतवणुकदार एखादा स्टाँक विशिष्ट किंमतीवर खरेदी करत असतो पण स्टाँकची किंमत वाढणे सोडुन कमी व्हायला लागते अशा परिस्थितीत स्टाँकची प्राईज कमी झाल्यावर पुन्हा स्टाँक कमी किंमतीत खरेदी केल्यावर त्याचे Average Stock Price Down होत असते.यालाच Averaging Down असे म्हणतात.

53) Ponzy Scheme:

पाँजी स्कीम हा एक धोखाधडीयुक्त गुंतवणूक घोटाळा आहे म्हणुन ओळखला जातो.ज्यात गुंतवणुकदारांना कमी रिस्क मध्ये हाय रिटर्न्स देण्याचा चा उल्लेख करण्यात येतो.

54) Debentures :

डिबेंचर हे एक प्रकारचे कर्ज घेण्याचे साधन तसेच माध्यम आहे जे भौतिक मालमत्तेद्वारे सुरक्षित नसते.

डिबेंचर हे मध्यम तसेच दीर्घकालीन कर्जाचे एक स्वरूप आहे ज्याचा वापर मोठ्या कंपन्या पैसे उधार घेण्यासाठी करत असतात.

55) Bond :

ही एक कर्जाची श्रेणी मानली जाते.यात इन्व्हेस्टर एखाद्या घटकास कर्ज देत असतो.जे कर्ज फिक्स Time Period साठी फिक्स किंवा अनिश्चित इंटररेस्टमध्ये असते.

बाँण्डने एखाद्या घटकास निधी उभारता येतो भांडवली गरजा पुर्ण करता येत असतात.

56)Trading Volume:

एखाद्या फिक्स टाईम पिरीयडमध्ये जेवढे शेअर्स सेल आणि बाय केले जात असतात.त्या सर्व शेअर्सची आपण संख्या मोजत असतो आणि हीच शेअर्सची मोजलेली एकुण संख्या Trading Volume असते.

57) Liquidity :

लिक्विडीटी म्हणजे तरलता ज्यात कुठल्याही प्राँपर्टी सिक्युरीटीजची खरेदी विक्री अत्यंत सहजपणे करता येणे म्हणजे त्याची लिक्विडीटी असते.

तरलता म्हणजे कुठल्याही मालमत्तेचे किंवा Securitiesचे मार्केट मधील मुल्यावर परिणाम न होऊ देता तयार रोख रकमेमध्ये रूपांतर करता येणे असते.

58) Face Value:

फेस व्हँल्युव्ह हे एखाद्या कंपनीच्या स्टाँक शेअर्सची दर्शवली जाणारी प्रारंभिक किंमत तसेच मुल्य असते.

59) Equity Share :

हे साधारण काँमन शेअर्स असतात आणि यात प्रत्येक गुंतवणुकदार अंशता मालिक असतो.

60) Nifty 50 :

निफ्टी 50 हा नँशनल स्टाँक एक्सचेंजवर सुचीबदध करण्यात आलेला प्रमुख 50 शेअर्सचा निर्देशांक म्हणुन ओळखला जातो.

61) Demat Account :

डिमँट अकाऊंट हे ट्रेडिंगसाठी म्हणजेच शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी गुंतवणुकदारांकडुन वापरले जात असते.डिमँट अकाऊंटमध्ये गुंतवणुकदाराचे शेअर्स असतात.

62) Arbitrage Fund :

Arbitrage Fund म्हणजे एकाच कालावधीत दोन वेगवेगळया मार्केटमध्ये स्टाँकच्या अलग अलग किंमतींमध्ये असलेल्या तफावतीचा फायदा उठविण्याची रणनीती.

63) Sebi :

Sebi हे एक सिक्युरीटी एक्सचेंज बोर्ड आँफ इंडिया ही एक संस्था आहे जी शेअर बाजारावर लक्ष ठेवण्याचे नियंत्रण करण्याचे काम करते.

64) Derivatives :

Derivative म्हणजे अशी मालमत्ता जी एका दुसरया मालमत्तेवर अवलंबुन आहे.आणि डेरिव्हीटीव्ह ज्यावर मुख्यपणे आधारलेले असते त्यास डेरिव्हीटिव्हची मुख्य मालमत्ता संबोधिले जाते.

65) Annual Report :

Annual Report हा एक वार्षिक अहवाल असतो जो कुठल्याही कंपनीकडुन वर्षातुन एकदा सादर केला जात असतो.आणि हाच अहवाल कंपनीकडुन ज्या शेअर होल्डरने त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहे त्यांना पाठविला जात असतो.

66) Initial Margin :

Initial Margin ही खरेदी किंमतीची टक्केवारी असते.जी मार्जिन खाते वापरताना रोख भरावी लागत असते.

67) Growth Stock :

Growth Stock असे स्टाँक असतात ज्यांचे मार्केटमध्ये इतर स्टाँकच्या तुलनेत अधिक जलद गतीने रेट वाढताना आपणास दिसून येत असते.

68) Value Stock :

हा स्टाँकचा एक असा प्रकार आहे जो त्याच्या मुलभुत गोष्टींच्या तुलनेत फार कमी किंमतीत व्यवहार करत असतो.

69) Future Trading :

कोणत्याही शेअर्सची खरेदी तसेच विक्रीचा व्यवहार हा रिअल टाईममध्ये होत असतो.फ्युचर ट्रेडिंग हे भविष्यात खरेदी तसेच विक्री करण्याचे काँन्ट्ँक्ट असते.

70) Option Trading :

हे मंथली तसेच विकली विकत घेता येणारे तसेच विक्री केले जाणारे काँन्ट्ँक्ट असते.

आँप्शन ट्रेडिंगचे दोन प्रकार असतात काँल आणि पुट.

71) Put Call Option :

जेव्हा मार्केट वर जात असते काँल आँप्शन बाय केले जाते आणि पुट हे सेल केले जात असते.

आणि जेव्हा मार्केट खाली जाणार असते तेव्हा काँल आँप्शन सेल केले जाते आणि पूट आँप्शन बाय केले जात असते.

72) Preference Share :

कंपनीकडुन काही खास गुंतवणुकदारांना जे शेअर दिले जात असतात त्याला Preference Share असे म्हणतात.आणि Preference ज्यांच्याकडे असतात अशा गुंतवणुकदारांना Preferred Share Holder म्हटले जाते.

73) Kerb Trading :

ज्यावर सेबीकडून बंदी घातली गेली आहे.आणि त्याची स्टाँक एक्सचेंज आणि स्टाँक मार्केटच्या अधिकारींकडे नाहीये अशा Illegal व्यवहारास Kerb Trading म्हटले जाते.

74) Junk Bond :

हे असे बाँण्ड असतात ज्यात अधिक जास्त प्रमाणात रिस्क असते आणि यांच्या क्रेडिट रेटिंगचे प्रमाण देखील कमी असते.

यात कधी चांगले रिटर्नस मिळतात तर कधी मिळत सुदधा नसतात.

75) Open Interest :

Open Interest Contract म्हणजे दिवसाच्या अखेरीस मार्केटमधील भागधारकांकडुन सेटल करण्यात आलेली एकूण करारांची संख्या असते.

76) Absolute Return :

Absolute Return म्हणजे एखाद्या मालमत्तेने ठरलेल्या विशिष्ट कालावधीत दिलेले Returns असते.

Absolute Return मध्ये एखाद्या मालमत्तेतुन ठरलेल्या विशिष्ट कालावधीत प्राप्त झालेला Profit आणि Loss मोजला जात असतो.

77) Hot Money :

जो पैसा Short Term Profit साठी वापरला जातो त्याला Hot Money म्हटले जाते.

78) Margin Call :

जेव्हा एखाद्या शेअर्सची किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी पडत असते.तेव्हा ब्रोकरकडून इन्व्हेस्टरला अतिरीक्त मार्जिन जमा करण्यास सांगितले जाते.त्यालाच Margin Call म्हटले जाते.

79) Internal Rate Of Return :

कोणत्याही गूंतवणुकीतुन मिळणारे Returns म्हणजेच इंटरनल रेट आँफ रिटर्न.

ही एक कुठल्याही गुंतवणुकीच्या रिटर्नच्या दराची गणना करण्याची पदधत असते.

80) Sector :

स्टाँक मार्केटमध्ये रिअल ईस्टेट,बँकिंग,कंझ्युमर गुडस पावर असे विविध सेक्टर असतात ज्यात गुंतवणुकदार गुंतवणुक करू शकतो.

4 thoughts on “Share Market –  80 महत्वाचे शब्द आपल्याला माहीत असायलाच हवेत – Share Market important terms beginner should know”

  1. उपयुक्त माहीत पण मार्केट मध्ये उदाहरण देवून सांगितली तर बरे होईल
    धन्यवाद

  2. उपयुक्त माहीत पण मार्केट मध्ये उदाहरण देवून सांगितली तर बरे होईल
    धन्यवाद

Comments are closed.