सुहाणी शाह यांचा जीवन परिचय | Suhani Shan biography in Marathi
सुहाणी शाह कोण आहेत?
सुहाणी शाह ह्या एक महिला जादुगार तसेच माईंडरीडर आहेत. माईड रीडर म्हणजे लोकांच्या अंतर्मनात काय चालले आहे हे वाचणे अणि ओळखणे हेच काम जादुगर सुहानी शाह करतात.
खुप कमी कालावधीत आपल्या हया जादु करण्याच्या कौशल्यामुळे सुहाणी शाह यांनी हे एवढे नावलौकिक प्राप्त केले आहे.
सर्व जण तिला दिमाग पढनेवाली लडकी म्हणून ओळखतात.सुहाणी शाह ह्या एक प्रसिद्ध युटयुबर देखील आहेत.
भारतातील सर्वात मोठे अणि प्रसिद्ध प्रेरणादायी मोटीव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांच्या शो मध्ये देखील मुलाखतीसाठी सुहाणी शाह जाऊन आल्या आहेत.
भागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्यावर केलेल्या टिकेमुळे सर्वप्रथम ह्या लोकांमध्ये चर्चेत आलेल्या दिसुन आल्या होत्या.
Suhani Shan biography in Marathi
सुहाणी शाह यांचा जन्म कधी अणि कोठे झाला?
२९ जानेवारी १९९० मध्ये उदयपुर राजस्थान मध्ये सुहाणी शाह यांचा जन्म झाला होता.
सुहाणी शाह यांचे शिक्षण किती झाले आहे?
सुहाणी शाह यांनी आपले प्राथमिक शिक्षण गुजरातमधुन पुर्ण केले आहे.जादुचे प्रयोग करण्यामध्ये सुहानी शाह यांना अधिक रूची असल्यामुळे त्यांनी त्यांचे पहिली पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढचे शिक्षण अर्धवट सोडत जादूचे प्रयोग करण्यामध्ये आपले करीअर करायचे असे ठरवले अणि आपले पॅशन फाॅलो केले.
सुहाणी शाह यांचे करिअर –
फक्त सात ते आठ वर्षांची असताना लहाणपणापासूनच सुहाणी शाह ही जादुचे प्रयोग करू लागली होती.२० ते २५ वर्षांपासून त्या आपल्या जादुच्या प्रयोगाद्वारे लोकांचें मनोरंजन करू राहील्या आहे.
२२ आॅक्टोंबर १९९७ मध्ये त्यांना प्रथमत जादुचे प्रयोग सादर करण्यासाठी अहमदाबाद मध्ये शाबासकी मिळाली होती.यानंतर त्यांनी अधिक जोमाने आपल्या करीअरला सुरूवात केली होती.
सुहाणी शाह यांनी आतापर्यंत मोठमोठ्या सेलिब्रिटी सोशल मिडिया इंन्फ्लुएनसर तसेच बाॅलिवुड अभिनेता अभिनेत्रींसोबत आपल्या मॅजिकचा माईडरींडींगचा प्रयोग केला आहे.
उदा, संदिप माहेश्वरी,करीना कपूर,सायना नेहवाल,झाकीर खान, बादशाह
दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार २०२३ विषयी माहिती
सुहाणी शाह यांना प्राप्त झालेले पुरस्कार –
आपल्या जादुच्या प्रयोगात केलेल्या उत्तम कामगिरीसाठी सुहाणी शाह यांना आॅल इंडिया मॅजिक असोसिएशन कडुन बेस्ट मॅजिशियनचा जादुची परी हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
Suhani Shan biography in Marathi
सुहाणी शाह यांची एकुण नेटवर्थ–
सुहाणी शाह आपल्या युटयुब चॅनलच्या माध्यमातून ३० ते ४० लाख इतकी कमाई करतात.त्यांच्या युटयुब चॅनल वर आतापर्यंत ३५.३ लाख इतके सबस्क्राईबर झाले आहे.तिने तिचे युटयुब चॅनल २००७ मध्ये सुरू केले होते.
युटयुबवर तिचा एक शो आहे ज्याचे नाव दॅटस माय जाॅब आहे.हया शो मध्ये ती सर्व सेलिब्रिटी सोबत गप्पा गोष्टी करते.गेस्टला हिंट वगैरे देऊन काहीतरी ओळखायला सांगते.हया शो मध्ये मोठमोठे युटयुबर्स तसेच बाॅलिवुड स्टार देखील आतापर्यंत येऊन गेले आहेत.
याचसोबत त्या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून सुदधा चार ते पाच लाखाची कमाई करतात.याचसोबत सुहाणी शाह ह्या वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये देखील जादुचे प्रयोग करण्यासाठी जात असतात त्यातुन देखील त्यांची भरपुर कमाई होते.
सुहानी शाह ह्या एक लाईफ कोच काॅपोरेट ट्रेनर हिप्रोथेरपीस्ट देखील आहेत.सुहाणी शाह यांचे युटयुब व्यतीरीक्त टविटर इंस्ट्राग्राम वर देखील मिलियन मध्ये फाॅलोवर आहेत.
सुहाणी शाह यांचे वय किती आहे?
२०२३ मध्ये सुहाणी शाह यांचे वय ३३ आहे.
सुहाणी शाह ह्या कोणत्या धर्माच्या आहेत?
सुहाणी शाह यांचा धर्म हिंदु आहे.
सुहाणी शाह यांची राशी कोणती आहे?
सुहाणी शाह यांची रास कुंभ आहे.
सुहाणी शाह कोणत्या देशातील नागरिक आहेत?
सुहाणी शाह ह्या भारत देशातील नागरिक आहेत.
सुहाणी शाह विवाहीत आहे का?
सुहाणी शाह ह्या अविवाहित आहेत.
सुहाणी शाह यांच्या वडिलांचे नाव काय आहे?
चंद्रकांत शाह असे सुहाणी शाह ह्यांच्या वडिलांचे नाव आहे.
सुहाणी शाह यांच्या आईचे नाव काय आहे?
सुहाणी शाह ह्यांच्या आईचे नाव स्नेहलता शाह असे आहे.
सुहाणी शाह यांच्या भावंडांचे नाव काय आहे?
सुहाणी शाह ह्यांना एक मोठा भाऊ आहे.
सुहाणी शाह यांच्या बाॅयफ्रेंडचे नाव काय आहे?
सुहानी शाह यांचा सध्या कोणताही बाॅयफ्रेंड नाहीये.
सुहानी शाह यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे?
सुहानी शाह यांनी एक पुस्तक देखील लिहिले आहे ज्याचे नाव अनलिश युअर हिडन पावर असे आहे.
ह्या पुस्तकात त्यांनी आपल्या जादुच्या कलेविषयी माहीती दिली आहे.अणि लोकांच्या मनातील गोष्टी विचार कसे ओळखायचे ह्या विषयी सायकोलाॅजीकल ट्रिक त्यांनी आपल्या पुस्तकातून सांगितल्या आहेत.
सुहाणी शाह यांचा रंग,उंची,केसांचा डोळयांचा रंग–
सुहाणी शाह यांचा रंग गोरा आहे.सुहाणी शाह यांची उंची पाच फूट पाच इंच इतकी आहे.सुहाणी शाह केसांचा अणि डोळयांचा रंग काळा आहे.
Suhani Shan biography in Marathi