एक्स बीबी १.१६ व्हेरीएंट म्हणजे काय?याची लक्षणे कोणकोणती आहेत? -X BB Variant

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

एक्स बीबी १.१६ व्हेरीएंट म्हणजे काय?याची लक्षणे कोणकोणती आहेत?

एच थ्री एनटु इंफलुएनजा व्हायरस नंतर आता नवीन व्हायरसने आपल्या सर्वांच्या जीवनात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

X BB – एक्स बीबी १.१६ हा कोरोनाचा नवीन व्हेरीएंट आहे जो भारतामध्ये सध्या वेगाने पसरत असल्याची बातमी न्युज मध्ये आपणास पाहायला तसेच ऐकायला मिळत आहे.

आजच्या लेखात आपण जाणुन घेणार आहोत की हा एक्स बीबी १.१६ व्हेरीएंट म्हणजे काय नेमके काय आहे हा कसा पसरतो याची लक्षणे कोणकोणती आहेत?

काय सांगितले जाते आहे तज्ञांकडून एक्स बीबी १.१६ विषयी -X BB Variant

एक्स बीबी १.१६ हा नवीन कोरोना व्हेरीएंट ओमिक्राॅन व्हेरीएंटचे पुनर्संयोजन असलेल्या एक्स बीबी प्रमाणेच आहे असे सांगितले जात आहे.हा व्हेरीएंट इतर व्हेरीएंट पेक्षा अतिशय वेगाने पसरतो.

हा व्हेरीएंट आपल्या प्रतिकारशक्तीवर देखील परिणाम करण्याची दाट शक्यता असते.

एक्स बीबी १.१६ हा व्हेरीएंट आतापर्यंत दहापेक्षा अधिक देशांमध्ये आढळुन आला आहे पण आतापर्यंत भारतात याचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याचे सांगितले जाते आहे.सध्या याचे ७० पेक्षा अधिक रूग्ण आढळुन आले आहेत.

एक्स बीबी १.१६ हा व्हेरीएंट आतापर्यंत युके, अमेरिका,ब्रुनेई,सिंगापुर,चीन अशा अनेक देशांमध्ये हा व्हेरीएंट आतापर्यंत आढळुन आला आहे.

एक्स बीबी १.१६ हा व्हायरस एक्स बीबी १.१५ पेक्षा १४० टक्के अधिक अधिक वेगाने पसरतो असे वैज्ञानिकांचे मत आहे.

अणि सध्या भारतात कोरोनाच्या जेवढया केसेस समोर येता आहे त्याचे कारण एक्स बीबी १.१६ हेच आहे असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.

एक्स बीबी १.१६ –

आतापर्यंत आढळुन आलेल्या पाॅझिटिव रूग्णांमध्ये गुजरात,कर्नाटक,महाराष्ट्र राज्यातील कोरोना पाॅझिटिव रेट अधिक आहे.असे देखील सांगितले जाते आहे.

See also  उन्हाळ्यात महिलांनी आहारासंबंधित घेण्याची काळजी

महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या बघता न्युज चॅनलवर असे देखील सांगितले जात आहे की हया नवीन स्ट्रेनची उत्पत्ती महाराष्ट्र राज्यातच झाली आहे.

कारण सुरूवातीलाच महाराष्ट्र राज्यात ह्या व्हेरीएंटचे एकाच दिवसात १५५ रूग्ण आढळून आले होते.महाराष्टाच्या खालोखाल तेलंगणा मध्ये देखील याचे १०० रूग्ण आढळून आले होते.

जर इतर राज्यात असलेले याचे पाॅझिटिव्हीटी रेट बघितले तर राजस्थान,तामिळनाडू,मध्य प्रदेश,जम्मु काश्मीर,मध्य प्रदेश अशा इतर राज्यात याचे पाॅझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के इतके आढळुन आले आहेत.

अणि ह्या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसुन येत आहे.

एक्स बीबी १.१६ ची लक्षणे –

आतापर्यंत एक्स बीबी १.१६ ची कुठलीही विशेष लक्षणे आढळुन आली नाहीयेत.यात आतापर्यंत जुनीच लक्षणे पाहावयास मिळाली आहे.

  • डोके दुखणे
  • स्नायु दुखी
  • घसा खवखवणे
  • अंगात अशक्तपणा जाणवणे
  • खोकला येणे
  • नाकातुन पाणी वाहणे
  • पोट दुखणे
  • जुलाब होणे
  • वरील सर्व लक्षणे चार ते पाच दिवस आढळून येत असतात.

सध्याची रूग्णसंख्या किती?

असे सांगितले जाते आहे की भारतात याचे आतापर्यंत ६१० रूग्ण आढळून आले आहे.अकरा राज्यात ह्या व्हेरीएंटने प्रवेश केला असल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात अणि गुजरात मध्ये याचे प्रत्येकी १६४ रुग्ण आढळल्याचे सुत्रांकडून कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील पुणे, मुंबई,नगर,सांगली,ठाणे अशा विविध ठिकाणी याचे रूग्ण आढळून आले आहे.

या नवीन व्हेरीएंट मुळे कोरोनाची चौथी लाट येते की काय असा प्रश्न आता सर्वांना पडला असेल पण डाॅक्टरांचे यावर असे मत आहे की हया नवीन व्हेरीएंट मुळे कोरोनाची रूग्णसंख्या काही दिवसांसाठी वाढेल पण हळहळु ही संख्या कमी देखील होईल

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा