तारक मंत्र म्हणजे काय?याचे फायदे कोणकोणते असतात?हा मंत्र कधी जपावा? -Tarak Mantra

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

तारक मंत्र म्हणजे काय?याचे फायदे कोणकोणते असतात?हा मंत्र कधी जपावा?

तारक मंत्राचा अर्थ याच्या नावातच दडलेला आहे तारक म्हणजे संकटातुन अडचणीतुन तारणारा असा होतो.
म्हणजेच आपणास आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातुन अडचणीतुन तारणारा मंत्र असा ह्याचा अर्थ होतो.

तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे.जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहे कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहे.अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात.

हा तारक मंत्र स्वामी समर्थ यांनी आपणास दिलेली अनमोल अशी भेट आहे.हया तारक मंत्रात खुप ताकद आहे ह्या तारक मंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातुन अडचणीतुन हा मंत्र तारत असतो.

ह्या मंत्राचा जप केल्याने आपणास मानसिक बळ प्राप्त होते.ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटते आहे.अशा व्यक्तींने ह्या मंत्राचा नेहमी जप करायला हवा.

ज्यांचे एखादे काम अडले आहे किंवा काही नैराश्य आले आहे त्यांनी हा तारक मंत्र म्हटल्यास त्यांचे अडलेले काम पुर्ण होते.

मनात नैराश्याची आलेले भावना नाहीशी होते.अणि आशेचा एक नवीन किरण आपल्या मनात निर्माण होत असते.

आपण एकटे पडलो किंवा उदास असाल किंवा रडु वाटत असेल तेव्हा आपण ह्या मंत्राचा जप करावा.हया मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व उदासिनता एकटेपणा नाहीसे होईल.

हा मंत्र कधीही अणि केव्हाही म्हटला तरी चालतो.हया मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई धावत येते अणि आपणास कुठल्याही संकटातुन अडचणीतुन तारते.

ह्या मंत्राचा जप केल्याने नैराशयात दुःखात देखील मनात आत्मविश्वास शक्तीचा संचार होतो मनात आशेचा किरण निर्माण होतो.हया मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपणास सहजपणे प्राप्त करता येते.

See also  हक्क दर्शक ॲप विषयी माहिती - Haqdarshak App Information in Marathi

तारक मंत्राचा अर्थ काय होतो?

हे मना तु निशंक हो निर्भय हो
स्वामी नामाची स्वामी बळाची प्रचंड
शक्ती तुझ्यामागे उभी आहे

महाराज श्रुतगामी आहेत
त्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही
ते स्वता प्रारब्ध घडवतात
त्यांच्या आज्ञेशिवाय काळ देखील
तुम्हाला हात लावु शकत नाही

स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की
आपल्या मनाला आपणास सांगावे लागेल की
तु उगाच भितो आहेस हे भय पळुन जाऊ दे
स्वामी असताना कशाला तुला हे भय असायला हवे

नको घाबरू तु असे बाळ त्यांचा ह्या ओळीत सर्व काही सामावले आहे स्वामी आहे म्हणून आपण आपल्या महाराजांना हाक मारत असतो.

स्वामी आपल्या बाळाला एकटे कसे पडु देतील.
आपल्या बाळाला थोडे काही झाली तर आईचा जीव कळवळुन उठतो
स्वामी आहे तर ह्या सर्व विश्वाची माऊली आहे

आई ही आई असली तरी देखील तिच्याजवळ
प्रेम व्यक्त करावे.याशिवाय आईला ती आपल्या मुलांसाठी जे काही करते त्याची जाणीव मुलांना देखील आहे हे कळणार नसे.

तसेच महाराजांवर असलेले आपले प्रेम श्रदधा,आपुलकी
स्वामींचे नामस्मरण करून आपणास स्वामींजवळ व्यक्त करायची आहे.महाराजांना याव्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही.

महाराजांनी आतापर्यंत आपल्याला जे सांभाळल जे काही संकटातुन तारले आहे
ते आपणास अजिबात विसरायचे नाहीये.

आपणास मनाला सांगायचे आहे की हे मना तु कुठलीही शंका न करता निशंक हो कुठलीही भिती न करता निर्भय हो
कारण स्वामी माऊली कायम आपल्या पाठीशी उभे आहे.

तारक मंत्र म्हणजे काय

तारक मंत्राचा जप करण्याचे फायदे –

तारक मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते.

आपले एखादे अडकलेले कार्य देखील पुर्ण होते.आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात.

जीवणात कशाचीही कमतरता भासत नसते.आपली प्रगती होते.

मृत्युचे भय आपणास वाटत नाही.

संकटाचा सामना करायला मानसिक बळ प्राप्त होते.

See also  Anywhere Cashless फीचर ऑफर करणारी आयसीआयसीआय लोम्बार्ड पहिली कंपनी | ICICI Lombard Anywhere Cashless feature In Marathi

तारक मंत्राचा नियमित जप केल्याने आपण महाराजांना प्रिय होतो.आपल्यावर महाराजांची सदैव कृपा राहत असते.महाराजांचा हात सदैव आपल्या पाठीशी असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा