डिस्काउंट ब्रोकर की फुलहाऊस ब्रोक कोणता निवडावा : Difference in discount broker and full service broker
आपल्यापैकी खुप जणांच्या मनात ह्या शंका असतात की स्टाँक ब्रोकर हा नेमका कोणता आणि कसा असायला हवा? आणि त्यात पण तो Full Service असायला हवा की Discount असलेला असायला हवा?या दोघांचे फायदे तसेच तोटे काय असतात?
Full Service Broker नेमकी कशाला म्हटले जाते आणि Discount Broker कशाला म्हटले जाते असे अनेक प्रश्न आपल्या मनात घोळत असतात.
आपल्या मनात घोळत असलेल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणुन घेणार आहोत.सोबतच या दोघांमध्ये कोणता फरक आहे हे देखील समजुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जेणेकरून आपल्या मनात या दोघांविषयी पुन्हा कुठलीही शंका उत्पन्न होणार नाही.
Full Service Broker कशाला म्हणतात? – What is mean by Full Service Broker
आपल्यापैकी खुप जण आपले डिमँट अकाऊंट ओपन करत असतात पण बहुतेक जणांना फुल सर्विस विषयी काही माहीतच नसते.
फुल सर्विस ब्रोकरलाच ट्रेडिशनल ब्रोकर असे देखील म्हटले जात असते.कारण हा एक जुना ब्रोकर आहे जो पुर्वपरंपरेपासुन चालत आलेला आपणास दिसुन येतो. हे ब्रोकर्स लोकांना सल्ला देण्याचे काम करत असतात.
यात ते आपल्याला काँल करून,नोटस देऊन, वेगवेगळया टीप्स देऊन,रिसर्च रिपोर्ट देत असतात,ट्रेन करत असतात आणि ट्रेडिंग करण्यासाठी तसेच स्टाँक सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला मदत करीत असतात.
थोडक्यात हे आपल्याला पुर्ण सुविधा पुरविण्याचे काम करत असतात.म्हणुन यांना Full Service Broker असे म्हटले जाते.
उदा.स्टाँक,कमोडीटी,करंसी इत्यादी.
Full Service Broker कोणकोणते आहेत? List of Full Service Broker
फुल सर्विस ब्रोकरचे अनेक प्रकार आहेत.कारण भारतात खुप सर्विस ब्रोकर्स हे सेबीच्या अंतर्गत रेजिस्टर आहेत.
- आणि आपल्याला ही एक गोष्ट माहीत आहे की सेबी मध्ये रेजिस्टर केल्याशिवाय ब्रोकर मध्ये कोणी आपले ब्रोकरेज सर्विस,देऊ देखील शकत नाही.
भारतात असलेले नावाजलेले जुने ज्यावर लोकांचा आधीपासुन विश्वास आहे असे Full Service Broker पुढीलप्रमाणे आहेत:
- AxisDirect
- Edelweiss
- Geojit
- HDFC Securities
- ICICIdirect
- IIFL Securities
- Kotak Securities
- Motilal Oswal
- SBI Securities
- Sharekhan
इत्यादी.
Full Service Broker चे फायदे कोणकोणते असतात? – Benefits of Full Service Broker
Full Service Broker चे फायदे पुढीलप्रमाणे असतात:
- फुल सर्विस ब्रोकरच्या प्रत्येक शहरात मोठमोठया शाखा आहेत.यांचे जागोजागी स्वताचे फ्रेंचाईजी नेटवर्क देखील असते.ज्यामुळे हे आपणास Door To Door वैयक्तिक सेवा(Personal Services) देखील पुरविण्याचे काम करत असतात.
- कोणता स्टाँक खरेदी करायचा?किती किंमतीत खरेदी करायचा? कोणता स्टाँक विकायचा आणि तो किती किंमतीत विकायचा?याबाबद सल्ला देण्याचे मार्गदर्शन करण्याचे काम फुल सर्विस ब्रोकर करत असतात.
- फुल सर्विस ब्रोकर्सची स्वताची एक रिसर्च टीम असते जी मार्केटविषयी प्राँपर रिसर्च करते आणि कोणते शेअर्स चांगले आहे जे आपण खरेदी करायला हवे हे देखील आपणास सुचवत असते.
- याचसोबत आपण ट्रेडिंगमध्ये नवीनतम असल्यास हे आपणास ट्रेनिंग देखील देण्याचे काम करत असतात.
- हे आपल्याला रिलेशनशीप मँनेजरची सुविधा देखील पुरवितात जो आपल्या पर्सनल काँन्टँक्ट मध्ये राहुन अकाऊंटविषयी ट्रेडिंगविषयी गुंतवणुकीविषयी आपल्याला काहीही Problem असल्यास आपणास मदत करत असतो.
- आज आपण सर्वच जण मोबाईल लँपटाँप कंप्युटरचा वापर करून आँनलाईन ट्रेडिंग करणे अधिक पसंद करतो पण समजा एखाद्याला आँनलाईन ट्रेडिंग करणे शक्य नसेल तर अशा परिस्थितीत आपण काँल करून देखील ट्रेडिंग करू शकतो.यासाठी आपल्याला त्यांना काँल करावा लागतो.मग ते आपल्याला शेअर्सची खरेदी विक्री करून देत असतात.हा सुदधा एक उत्तम फायदा फुल सर्विस ब्रोकरचा असतो.
- फुल सर्विस ब्रोकर हे आपल्याला बेस्ट ट्रेडिंग साँफ्टवेअर प्रोव्हाईड करण्याचे काम देखील करते.
- जर आपण अकाऊंट ओपन करत असलो तर हे आपल्या घरी येत असतात.तसेच त्यांच्या आँफिसमध्ये घेऊन जात असतात.फाँर्म फिल करण्यात काही अडचण असल्यास आपणास व्यवस्थित समजावून सांगत असतात.
- ट्रेर्डिंगसाठी Higher Margins आपल्याला देत असतात.
Full Service Broker चे तोटे कोणकोणते असतात? disadvantage of Full Service Broker
फुल सर्विस ब्रोकरचे जसे अनेक फायदे आहेत तसेच याचे काही तोटे देखील आहेत जे आपल्याला माहीत असणे खुप गरजेचे आहे.
Full Service Broker चे तोटे पुढीलप्रमाणे असतात :
फुल सर्विस ब्रोकर्सचे ब्रोकरेज चार्जेस हे खुप जास्त असतात.कारण फुल सर्विस ब्रोकर आपल्याला एक्सट्रा आणि पर्सनल सर्विसेस देखील प्रोव्हाईड करत असते.
- तसेच काही फुल सर्विस ब्रोकर्स आपल्याकडुन अकाऊंट ओपनिंगचे अकाऊंट मेंटेंनंसचे AMC चार्जेस खुप जास्त घेत असतात.
Discount Broker म्हणजे काय? What is mean by Discount Broker
डिस्काऊंट ब्रोकर ही भारतात आलेली एक नवीन संकल्पणा मानली जाते.कारण डिस्काऊंट ब्रोकर हे अमेरिका सारख्या पाश्चिमात्य देशात भारतापेक्षा अधिक वापरले जाते.
कारण अमेरिकेत डिस्काऊंट ब्रोकर्सचे प्रमाण फार अधिक आहे कारण अमेरिकेसारख्या देशात आँनलाईन ट्रेडिंग अधिक चालते.म्हणुन तिथे खुप जुन्या काळापासुन डिस्काऊंट ब्रोकर्स आहेत.कारण तेथील लोक आधीपासुन गुंतवणुक करत आले आहे.
पण डिस्काऊंट ब्रोकर हे भारतात 2010 पासुन येण्यास सुरूवात झाली आहे.
डिस्काऊंट ब्रोकर हा आपल्याला खुप कमीत कमी रेटमध्ये खरेदी आणि विक्री करायची संधी देत असतो.
हे ब्रोकर्स आपल्या प्रतिस्पर्धीपेक्षा कमीत कमी किंमतीत सर्व सुविधा कस्टमरला देण्याचा प्रयत्न करीत असतात.
शेअर बाजार नेमका कसा काम करतो? बाजार त नेमकं काय होत
Discount Broker कोणकोणते आहेत? – List of Discount Broker
डिस्काऊंट ब्रोकरची काही नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- 5paisa
- Alice Blue
- Angel Broking
- Fyers
- Groww
- Master Trust
- Paytm Money
- ProStocks –
- SAMCO
- Upstox
- Zerodha
Discount Broker चे फायदे कोणकोणते असतात? – Benefits of Discount Broker
डिस्काऊंट ब्रोकर्सचे अनेक फायदे असतात जे पुढीलप्रमाणे आहेत :
- खुप कमी ब्रोकरेज मध्ये आपल्याला यात खरेदी विक्री करता येत असते कारण हे आपल्याला कमी ब्रोकरेज प्रोव्हाईड करत असतात.
- हे आपल्याला फुल सर्विस ब्रोकर्सच्या तुलनेत जास्त Margins देत असतात.इंट्रा डे ट्रेडिंग करत असलेल्यांना याचा अधिक फायदा होतो.
- काही डिस्काऊंट ब्रोकर आपल्याला फ्री आँफ काँस्ट डिलिव्हरी देत असतात.जर आपण कुठलाही इक्विटीमधले घेतलेला शेअर्स कँरी फाँरवर्ड करत असु तर हे आपल्याला त्यांचे ब्रोकरेज लावत नसतात.
- काही डिस्काऊंट ब्रोकरेज आपल्याकडुन AMC Charge देखील घेत नसतात,ज्यात कोणी लाईफटाईम फ्री देते तर कोणी नाँमिनल चार्ज घेत असतात.
Discount Brokerage चे तोटे कोणकोणते असतात? – Disadvantages Discount Broker
Discount Brokerage चे काही तोटे देखील असतात जे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.
- यांच्याकडे कस्टमरला आँफलाईन सर्विस देण्यासाठी विविध शहरात कुठल्याही शाखा नसतात.ज्यामुळे आपल्याला यात आँनलाईनच डाँक्युमेंटेशन करावे लागत असते.
- यात खुप काही गोष्टी आपल्याला स्वता आँनलाईन कराव्या लागत असतात.
- खुप डिस्काऊंट ब्रोकर्स फी चार्ज करीत असतात काँल आणि ट्रेडिंगसाठी म्हणजेच काँल करून ट्रेडिंग करायला बाय आणि सेल करायला सांगितले तर ते आपल्याकडून चार्ज घेत असतात.कारण त्यांच्याकडे आँफलाईन ट्रेडिंगचे एवढे रिसोर्सेस नसतात त्यामुळे हे चार्ज घेत असतात.
- सगळयाच स्क्रीप्टला हे मार्जिन देत नसतात.काही स्क्रीप्टला हे खुप कमी मार्जिन देत असतात.
आपण कोणता Service Broker निवडायला हवा? – How to select share market broker properly
या दोघांमधील कुठलाही सर्विस ब्रोकर निवडताना आपण पुढील गोष्टी बघायला हव्यात.
1) आपली गरज काय आहे ?
आधी आपली Requirement काय आहे ठरवुन घ्यायला हवे.
आधी आपण आपली Requirement काय आहे ठरवुन घ्यायला हवे म्हणजे आपण जर आपले एखादे डिमँट अकाऊंट ब्रोकरकडे ओपन करतो आहे तर आधी आपण हे बघायला हवे की आपण ते कशासाठी ओपन करतो आहे?
यात आपल्याला ब्रोकरेज कमी हवा आहे का आपल्याला रिसर्च रिपोर्ट ट्रेनिंग वगैरे सारख्या सर्विसेस हव्या आहेत हे आधी ठरवायला हवे.
आपण नवीन असाल तर फुल सर्विस ब्रोकर आपल्याला चांगला ठरतो कारण तो आपल्याला सर्व माहीती देत असतो तसेच पर्सनल सर्विसेस देखील देत असतो.जे डिस्काऊंट ब्रोकर आपल्याला देत नाही.म्हणुन आपण अनुभवी असु तर डिस्काऊंट ब्रोकर अधिक फायदेशीर ठरतो.
म्हणजेच आधी आपण आपली Requirement काय आहे कशासाठी आपण आपले डिमँट अकाऊंट ओपन करतो आहे हे जाणुन घ्यायला हवे यानंतर आपल्याला ब्रोकर निवडायला अधिक सोपे जाईल.
2) डिमँट अकाऊंट कशासाठी ओपन करतो
आपण शेअर मार्केटमध्ये अकाऊंट कशासाठी ओपन करतो आहे ट्रेडिंगसाठी की इनव्हेस्टमेंटसाठी हे ठरवायला हवे :
म्हणजेच आपण जर शेअर मार्केटमध्ये अकाऊंट ओपन करतो आहे तर ते ट्रेडिंगसाठी करतो आहे का लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हे आपण आधी फिक्स करायला हवे.
म्हणजेच आपण शेअर खरेदी करून ते लगेच विकणार आहे का का लाँर्ग टर्मसाठी घेणार आहे हे आपण ठरवायला हवे.
जर आपण ट्रेडिंगसाठी घेतले तर आपल्याला रोज ट्रेड पडत राहतील जिथे आपल्याला डिस्काऊंट ब्रोकर अधिक फायदेशीर ठरेल.
आणि नवीन असु आणि आपल्याला नाँलेजची आवश्यकता असेल तर आपण फुल सर्विस ब्रोकर निवडु शकतो.
3) ब्रोकरेज चार्जेस :
कोणता ब्रोकरेज अकाऊंट ओपनिंगचे किती चार्ज घेतो आहे हे आपण तुलना करून बघायला हवे.
4) वार्षिक देखबाल खर्च –AMC :
काही ब्रोकर्सचे अँन्युअल मेंटेंनंस चार्ज खुप असतात म्हणुन आपण ते देखील बघायला हवे की आपल्याला
अँन्युअल मेंटेंनंस चार्ज किती लागतो आहे.म्हणजे पुढच्या वर्षापासुन आपल्या अकाऊंटमधुन किती पैसे कट होणार आहे हे आपणास कळत असते.
काही काही लोकांचे चार चार डिमँट अकाऊंट ओफन असतात म्हणजेच अकाऊंटला शेअर्स असतात फक्त पाच हजाराचे आणि चार चार डिमँट अकाऊंट ओपन केले आणि AMC आपल्याला वर्षाला चारशे लागतो आहे.
तर मग आपल्याला त्यात प्राँफिट कमी मिळणार?आणि AMC मधुन पैसे जास्त कट होणार असे होऊ नये म्हणुन आपण AMC Charge किती राहील हे ठरवुन घ्यायला हवे.
5) भविष्यात लागत असलेल्या सर्विसेस डाँक्युमेंटेशन :
भविष्यात जर आपल्याला डाँक्युमेंटेशन सर्विसची गरज पडली जसे की माँडिफिकेशन वगैरे मग अशा वेळी आपल्याला आँनलाईन करणे जमेल का नाही का आँफलाईन जमेल याचा देखील आपण एकदा विचार करायला हवा.
6) साँफ्टवेअर :
जे साँफ्टवेअर आपण अकाऊंट ओपन करताना युझ करणार आहे ते अँडव्हान्स आहे का?त्याच्यात तेवढ नाँलेज आहे का ट्रेडिंग किंवा इनव्हेस्टिंगसाठी हे चेक करायला हवे.
7) कधीही टाँप 5 मधील ब्रोकरचीच निवड करावी :
कधीही आपण ब्रोकर निवडताना आपल्याला गरज असलेल्या डिस्काऊंट किंवा फुल सर्विस या दोघांपैकी कशातही कोणतेही टाँप 5 मधीलच ब्रोकर निवडायला हवा मग तो डिस्काऊंट असो किंवा फुल सर्विस ब्रोकर असो कारण इतर कुठलाही ब्रोकर्स आपण निवडला तर त्यांचा एवढा मार्जिन तसेच बिझनेस नसतो म्हणुन आपण ब्रोकर निवडताना टाँप 5 निवडायला हवा.
8) भारतातील टाँप टेन ब्रोकरमध्ये एकच डिस्काऊंट ब्रोकर असतो:
एक फँक्ट आहे की भारतातील भारतातील टाँप टेन ब्रोकरमध्ये एकच डिस्काऊंट ब्रोकर आहे तो म्हणजे झिरोदधा बाकी सर्व फुल सर्विस ब्रोकर आहेत.
दोन्ही ब्रोकर हे चांगलेच आहेत फक्त आपली Requirement काय आहे त्या नुसार आपण ब्रोकर निवडायला हवा.
Comments are closed.