मराठी भाषेतील पहिला तसेच पहीली | First in Marathi language
१)मराठी भाषेतील पहिला आद्य गद्य ग्रंथ –
मराठी भाषेतील पहिला गद्य आत्मचरित्रपर ग्रंथ लिळाचरित्र हा आहे.लिळाचरित्र म्हाइंभटट याने लिहिले होते.
२) मराठी भाषेतील पहिली कवयित्री –
मराठी भाषेतील पहिली कवयित्री म्हंदबा उर्फ म्हदाईसा ही आहे.
३) मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी –
मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही आहे.बाबा पदमनजी यांनी ही कादंबरी लिहिली होती.
४) मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी –
मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी ही मोचनगड आहे.ही कादंबरी रा.भी गुंजीकर यांनी लिहिली होती.
भारतातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी – Indian Nobel Prize Winner List In Marathi
५) मराठी भाषेतील पहिली प्रादेशिक कादंबरी –
मराठी भाषेतील पहिली प्रादेशिक कादंबरी पाणकळा आहे ही कादंबरी र वा दिघे यांनी लिहिली होती.
६) मराठी भाषेतील पहिली पत्रात्मक कादंबरी –
मराठी भाषेतील ६१ पत्रांवर आधारीत लिहिली गेलेली पहिली पत्रात्मक कादंबरी इंदु काळे सरला भोळे ही आहे.यात इंदु काळेने सरला भोळे हिला लिहिलेली पत्र आहेत.ही कादंबरी वा.म जोशी यांनी लिहिली आहे.
७) मराठी भाषेतील पहिली कथा –
मराठी भाषेतील पहिली कथा काळ तर मोठा कठिण आला ही होती.ही कथा कृष्णराव भालेकर यांनी लिहिली होती.
८) मराठी भाषेतील पहिले संत कवी-
मराठी भाषेतील पहिले संत कवी संत नामदेव हे आहेत.
९) मराठी भाषेतील पहिले पंत कवी –
मराठी भाषेतील पहिले पंत कवी श्रीधर पंत हे आहेत.
१०) मराठी भाषेतील पहिले तंत कवी –
मराठी भाषेतील पहिले तंत कवी होनाजी बाळा आहेत.
भारतातील सर्वात श्रीमंत मंदीरे – Richest Temples In India
११) मराठी भाषेतील सुनित काव्य प्रकार सर्वप्रथम आणणारे –
कवी केशवसुत यांनी मराठी भाषेतील सुनित काव्य प्रकार सर्वप्रथम आणला होता.
१२) मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र –
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण होते.हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते.
१३) मराठी भाषेतील पहिले मासिक-
मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन आहे.
१४) मराठी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते
–मराठी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते वि. स खांडेकर हे आहेत.वि स खांडेकर यांच्या ययाती हया ग्रंथाला हा पुरस्कार देण्यात आला होता.
१५) मराठी भाषेतील पहिले नाट्यछटाकार –
मराठी भाषेतील पहिले नाट्यछटाकार दिवाकर हे आहेत.
१६) मराठीतील आद्य चरित्रकार –
मराठीतील आद्य चरित्रकार म्हाईंभटट हे आहेत.
१७) मराठी भाषेतील पहिली भाषांतरीत कादंबरी –
मराठी भाषेतील पहिली भाषांतरीत कादंबरी यात्रिकक्रमण ही आहे.
१८) मराठी भाषेतील पहिले विडंबनात्मक काव्य –
मराठी भाषेतील पहिले विडंबनात्मक काव्य संगीत हजामत यांनी लिहिले.
१९) मराठी भाषेतील पहिले नाटक –
मराठी भाषेतील पहिले नाटक थोरले माधवराव पेशवे हे आहे.
२०) मराठी भाषेतील पहिली गीताटिका –
मराठी भाषेतील पहिली मराठी गीताटिका भावार्थ दिपिका ही आहे.
२१) मराठी भाषेतील आद्य कवी –
मराठी भाषेतील आद्य कवी मुकुंदराज आहे.
२२) मराठी भाषेतील पहिला शिलालेख –
मराठी भाषेतील पहिला शिलालेख रायगड जिल्ह्यातील अक्षीचा शिलालेख आहे श्रवणबेळगोळ येथे देखील श्री गोमटेशवराच्या पुतळ्याच्या पायथ्याशी एक शिलालेख आहे.
भारतातील टाॅप 10 आयटी कंपन्या । Top 10 IT Companies In India
२३) मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र-
मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश हे आहे.
२४) मराठी भाषेतील पहिली ग्रामीण कवयित्री –
मराठी भाषेतील पहिली ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी आहे.
२५) मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार –
मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार ताराबाई शिंदे आहे.
२६) मराठी भाषेचा वाढदिवस –
मराठी भाषेचा वाढदिवस २७ फेब्रुवारी रोजी असतो.
२७) मराठी भाषेचे पाणिनी –
मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर हे आहेत.
२८) मराठी भाषेची लिपी –
मराठी भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे.
२९) मराठी भाषेचे शिवाजी –
मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आहेत.
३०) मराठी भाषेतील आद्य पदयात्मक रचना असलेला ग्रंथ–
मराठी भाषेतील आद्य पदयात्मक रचना असलेला ग्रंथ विवेक सिंधु आहे जो मुकुंदराजांनी लिहिला होता.
उन्हाळ्यात महिलांनी आहारासंबंधित घेण्याची काळजी
३१) मराठीचे बजरंग –
मराठीचे बजरंग पु ल देशपांडे यांना म्हटले जाते.
३२) मराठीतील निसर्ग कन्या –
मराठीतील निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी आहे.
३३) आधुनिक मराठी कवितेचे जनक –
आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत आहेत.
३४) मराठी नवकाव्याचे जनक –
मराठी नवकाव्याचे जनक बा सी मर्ढेकर हे आहेत.
३५) मराठीतील सौंदर्य वादी भावकवी –
मराठीतील सौंदर्य वादी भावकवी बा भ बोरकर आहे.
३६) जपानी भाषेतुन मराठी भाषेत आलेला काव्य प्रकार –
जपानी भाषेतुन मराठी भाषेत आलेला काव्य प्रकार हायकु आहे.शिरिष पै मराठीतील चारोळ्या
३७) मराठीतील प्रेमाचे शाहीर –
मराठीतील प्रेमाचे शाहीर गोविंदाग्रज राम गणेश गडकरी हे आहेत.
३८) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान पुरस्कार –
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार ज्ञानपीठ आहे.
३९) पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेता-
पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जी शंकर कुरप यांना ओताकझाक ही मल्याळी कादंबरी लिहिण्यासाठी मिळाला होता.
४०) ज्ञानपीठ पुरस्कार विजेता महाराष्ट्रातील व्यक्ती –
वि स खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रीयन पहिले व्यक्ती आहे.ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील दुसरे व्यक्ती कुसुमाग्रज तिसरे व्यक्ती होते वि दा करंदीकर अणि चौथे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे आहे.
४१) मराठी चित्रपट सृष्टीचे जनक –
दादासाहेब फाळके हे मराठी चित्रपट सृष्टीचे जनक आहेत.
४२) मराठी चित्रपट नगरी –
कोल्हापूरला मराठी चित्रपट नगरी म्हणून ओळखले जाते.
४३) मराठी भाषेतील पहिले व्याकरणकार –
मराठी भाषेतील पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर हे आहेत.
४४) मराठी भाषेतील पहिले मुद्रित व्याकरण –
मराठी भाषेतील पहिले मुद्रित व्याकरण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे आहे.हे गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलेले आहे.
४५) मराठी भाषेतील पहिले नाटक –
मराठी भाषेतील पहिले नाटक सीता स्वयंवर हे आहे हे विष्णु दास भावे यांनी लिहिलेले आहे.
४६) मराठीत विराम चिन्हांचा प्रथम वापर –
मराठीत विराम चिन्हांचा प्रथम वापर मेजर कॅन्डी यांनी केला होता.
४७) मराठीतील पहिली स्त्री नाटककार –
मराठीतील पहिली स्त्री नाटककार सोनाबाई केळकर आहे.
४८) मराठीतील पहिली स्त्री कथाकार –
मराठीतील पहिली स्त्री कथाकार काशीबाई कानिटकर आहे.
४९) मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार –
मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार साळुबाई तांबेकर आहे.
५०) मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी –
मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी बळीबा पाटील आहे.ही कादंबरी कृष्णराव भालेकर यांनी लिहिली आहे.