मायकोरायझा-VAM Biofertlizer वनस्पतीवर्गातील बहुतांश वनस्पती च्या मुळावर जगताना आढळतात. सर्व प्रकारची अन्नधान्य, फळझाडे, मसाला पिके व भाजीपाल्याची पिके यांच्यासाठी मायकोरायझा जिवाणू खत अत्यंत महत्त्वाचे आहे.
मायकोरायझा म्हणजे बुरशीयुक्त मुळे.
- या बुरशी वनस्पतीच्या मुळांवर बाहेरून वास्तव्य करतात किंवा मुळा च्या आत जावून जमिनीमध्ये सूक्ष्मअन्नद्रव्ये पुरवितात.
- तसेच पाण्याअभावी मुळांचे सरक्षण करतात,
- झाडांना नत्र, स्फुरद, पालाश आणि पाणी उपलब्ध करून देतात.
- मायकोरायझा बुरशीची ६ प्रकार आहेत. उदा. ऑक्युलोस्पोरा, गिगॅसस्पोरा, स्क्लेरोसिस्टिस, एन्ट्रोफॉस्फोरा, स्कुटॅलोस्पोरा
- त्यापैकी ग्लोमस कुळातील मायकोरायझा सर्वत्र आढळतो. विशेषत:मायकोरायझामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पन्न वाढते.
- जमिनीतील उपलब्ध पाण्याचा थेंब न् थेंब पिकांना मिळवून दिल्यामुळे दुष्काळ काळातही पिके जगवली जातात.
मायकोरायझा वापराचे फायदे
- स्फुरद, नत्र, गंधक तसेच तांबे, जस्त, मॅग्नेशियम आणि लोह यांची उपलब्धता मुळालगत वाढवितो. ज्यामुळे खत वापरात ५० टक्के बचत होऊ शकते.
- पिकांची वाढ आणि उत्पन्न वाढविते तसेच हरितद्रव्ये तयार करण्याची संश्लेषण क्रिया गतिमान करून झाडातील आवश्यकसंजीवके वाढवून फलधारणा वृद्धिंगत करते.
- मुळावरील आवरणामुळे जवळचे किंवा लांबचे जमिनीतील पाणी शोषण्याचे प्रमाण वाढवितेआणि त्यामुळे कमी पाण्यातही पिकाला वाचविले जाते.
- जमिनीची प्रत राखते, सुधारते त्याचबरोबर जमिनीची उत्पादनक्षमता वाढवून सशक्त पीक निर्माण झाल्यामुळे मुळावाटे येणारे बुरशी, अणूजीव, सूञ्रकृमीमुळे होणाऱ्या रोगास अवरोधन करते.
- सर्व प्रकारच्या पिकांच्या मुळांवर वाढत असल्यामुळे त्याचा वापर चारा पिकांवर देखील उपयुक्त आहे.
- मोठया प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या इतर जिवाणू खतांसोबत उदा. रायझोबियम, अँझोटोबॅक्टर, अँसिटोबॅक्टर यांच्यासोबत संयुक्तपणे मायकोरायझाचा वापर अतिशय उपयुक्त आढळला आहे.
- विविध तापमानावर व जमिनीतील तसेच हवामानातील होणाऱ्या अचानक बदलांपासून वाचविण्याचे कार्य मायकोरायझा करते.
- सर्व प्रकारच्या वनस्पती, पिकांसाठी तसेच मानव आणि प्राणिमात्र-पशुपक्षी यांना पूरक असे हे जिवाणू संवर्धक आहे.
मायकोरायझा-VAM बियाण्याची प्रक्रिया
- थोडा गुळाचा वापर करून व्हॅम मिसळलेल्या द्रावणाची बियाणांवर शिंपडणी करून सावलीत २-३ तास बी सुकवून नंतर पेरणी केल्यास उगवणक्षमता वाढते.
- १ एकरासाठी लागणाऱ्या बियाण्यास १ ते २ किलो व्हॅमची प्रक्रिया उपयुक्त आढळली. तीच मात्रा जमिनीत कंपोस्ट खतासोबत मिसळून देण्याकरिता एकरी १० किलो व्हॅम कल्चर किंवा व्हॅम संवर्धन उपयुक्तआहे.
- विशेषतः ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूर, तूर, हरभरा, सूर्यफूल यासाठी सरींमधून पेरताना १० किलो प्रतिएकर व्हॅम प्रभावी आढळले आहे.
- भाजीपाल्यासाठी वांगी, टोमॅटो, मिरची, दोडके, कलिंगड, काकडी, ऊस, तुती यासाठी प्रतिएकर ५ किलो व्हॅम.
- भेंडी, गवार, मका, करडई, कपाशी साठी प्रतिएकरी १० किलो.
- कांदा, घेवडा, वाटाणा, भात, गहू, नाचणी, ज्वारी यासाठी प्रतिएकरी १५ किलो व्हॅम जमिनीतून द्यावे.
- काजू, नारळ, सुपारी, मसाला पिके, भाजीपाला आणि ऊस इत्यादींच्या रोपवाटिकांमध्ये व्हॅमचा वापर निश्चितपणे रोपवाटिकेत होणारी मर कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
- त्यासाठीगादी वाफ्यामध्ये रोप तयार करण्यास बी पेरण्यापूर्वी प्रतिएकर ५ किलो व्हॅम वरील पृष्ठभागात मिसळणे आवश्यक आहे.
- लागवडीपूर्वी सर्व रोपांची मुळे २० ते २५ ग्रॅम व्हॅम ५ किलो गांडूळखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून गादी वाफ्यावर ओळीत लावून त्यावर रोपे लावल्यास ती जोमदार होतात.
- वनिकी रोपांच्या पिशव्यांमध्ये किंवा कुंड्यांमध्ये १० ते १५ ग्रॅम व्हॅम ५० किलो गांडूळखत, कंपोस्ट किंवा मातीत मिसळून मुळाल्यात मिसळल्यामुळे रोपांची मर कमी होते.
मायकोरायझा मला पाहिजी please
नमस्कार , आपल्याला मिळेल Om Bio-fertilizer
Survey No. 1226/2, Near IOC Petrol Pump, Wada Road, Armori, Wadsa Road, Nagpur-440010, Maharashtra, India
Call Us
+91 9423565242
Our Email
[email protected] ह्यांना कॉनटॅक्ट करा
Send me details of micorizza
Please give me details of micorizza