सेंसेक्स विषयी माहीती – BSE Sensex – What is Sensex –
आपल्याला नेहमी वर्तमानपत्रात वाचायला मिळते तसेच टिव्हीवर न्युजमध्ये ऐकायला मिळते की सेंसेक्स इतक्या अंकांनी खाली घसरला किंवा इतक्या अकांनी आज वर गेलेला पाहावयास मिळाला आहे.
पण जरी आपल्याला हे शब्द रोज वर्तमानपत्रात वाचायला मिळतात तसेच टीव्हीवर न्युज चँनलवर रोज ऐकायला मिळतात.पण आपल्यापैकी बहुतेक जणांना सेंसेक्स म्हणजे नेमकी काय असते?हे माहीतच नसते.
ज्यामुळे आपल्या मनात हे जाणुन घेण्याची उत्कंठा निर्माण होत असते की सेंसेक्स हे नेमके असते तरी काय?
म्हणुन आजच्या लेखात आपण सेंसेक्सविषयी अधिक सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात सेसेंक्सविषयी जाणुन घेण्याची जी उत्सुकता आणि कुतुहल निर्माण झाले आहे ते पुर्ण होण्यास नक्कीच मदत होईल.
माहिती घ्या
Sgx Nifty म्हणजे काय ? SGX Nifty Marathi Mahiti
सेंसेक्स म्हणजे काय? — What is Sensex
सेंसेक्स हा एक शेअर बाजार निर्देशांक असतो.ज्याला भारतातील शेअर मार्केटचा बेंचमार्क इंडेक्स म्हणुन ओळखले जाते.
- सेंसेक्स हा बाँम्बे स्टाँक एक्सचेंजचा शेअर बाजार निर्देशांक आहे.
- सेंसेक्सचे प्रमुख काम हे ज्या कंपन्यांचा बाँम्बे स्टाँक एक्सचेंजमध्ये समावेश होतो त्या तेजीमध्ये आहे की मंदीमध्ये आहे हे दर्शवणे असते.
- सेन्सेक्समध्ये कुठल्या कंपनीचे शेअर वर चालले आहे तसेच कुठल्या कंपनीचे शेअर खाली येत आहे
- कोणती कंपनी नफ्यात चालली आहे कुठली कंपनी तोटयात चालली आहे ह्या सर्व बाबींचे चित्र सेंसेक्स मध्ये दर्शविले जाते.
सेंसेक्सची सुरूवात कधी झाली होती?
- सेंसेक्सची सुरूवात ही दिपक मोहोनी यांनी केली होती ज्याची एक जानेवारी 1986 मध्ये सुरूवात झाली होती.तेव्हापासुन सेंसेक्समध्ये भारतातील तीस प्रमुख कंपनींचा यात समावेश केला जाऊ लागला.
सेंसेक्स नेहमी वर तसेच खाली का जात असतो?
- सेंसेक्स मध्ये भारतातील तीस मुख्य कंपन्यांचे शेअर्स असतात.त्यामुळे ह्या तीस कंपनींपैकी काही कंपनीचे शेअर्स मध्ये वाढ झाल्यावर सेंसेक्स वर जाताना आपणास दिसुन येतो.
- पण याच ठिकाणी ह्या तीस कंपन्यांमधील एकाही कंपनीच्या शेअर्सचे भाव कमी झाले तर सेंसेक्स आपल्याला खाली येताना दिसुन येत असतो.
सेंसेक्समध्ये भारतातील कोणत्या प्रमुख तीस कंपन्यांचा समावेश होत असतो?
- सेंसेक्समध्ये भारतातील तीस प्रमुख अशा कंपन्यांचा समावेश होत असतो.
- पण समजा भविष्यात ह्या कंपनींमधील एखाद्या कंपनीच्या आर्थिक स्थितीत बिघाड झाल्यास त्या कंपनीचे नाव सेंसेक्समधुन काढुन त्याठिकाणी नवीन कंपनीचे नाव अँड केले जात असते.
बाँम्बे स्टाँक एक्सचेंजमधील सेन्सेक्समध्ये भारतातील पुढील तीस प्रमुख कंपन्यांचा समावेश होत असतो:
NO | Scrip Code | COMPANY | कंपनी नाव | ISIN No. |
1 | 500820 | Asian Paints Ltd | एशियन पेंटस | INE021A01026 |
2 | 532215 | Axis Bank Ltd | अँक्सिस बँक | INE238A01034 |
3 | 500034 | Bajaj Finance Ltd | बजाज फायनान्स | INE296A01024 |
4 | 532978 | Bajaj Finserv Ltd | बजाज फिन्सर्व | INE918I01018 |
5 | 532454 | Bharti Airtel Ltd | भारती एअरटेल | INE397D01024 |
6 | 500124 | Dr Reddy’s Laboratories Ltd | डों रेड्डी लॅब | INE089A01023 |
7 | 532281 | HCL Technologies Ltd | एचसीएल टेक | INE860A01027 |
8 | 500180 | HDFC Bank Ltd | एचडी एफ सी | INE040A01034 |
9 | 500696 | Hindustan Unilever Ltd | हिंदुस्थान युनिलिव्हर | INE030A01027 |
10 | 500010 | Housing Development Finance Corp | एचडी एफ सी FIN | INE001A01036 |
11 | 532174 | ICICI Bank Ltd | आयसी आयसी आय बँक | INE090A01021 |
12 | 532187 | IndusInd Bank Ltd | इंदुस लँड बँक | INE095A01012 |
13 | 500209 | Infosys Ltd | इन्फोसीस | INE009A01021 |
14 | 500875 | ITC Ltd | आयटीसी | INE154A01025 |
15 | 500247 | Kotak Mahindra Bank Ltd | कोटक महींद्रा बँक | INE237A01028 |
16 | 500510 | Larsen & Toubro Ltd | लार्सन टर्बो | INE018A01030 |
17 | 500520 | Mahindra & Mahindra Ltd | महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनी | INE101A01026 |
18 | 532500 | Maruti Suzuki India Ltd | मारूती सुझूकी | INE585B01010 |
19 | 500790 | Nestle India Ltd | नेसले | INE239A01016 |
20 | 532555 | NTPC Ltd | एनटीपीसी | INE733E01010 |
21 | 532898 | Power Grid Corp of India Ltd | पाँवर ग्रिड काँपर्रेशन | INE752E01010 |
22 | 500325 | Reliance Industries Ltd | रिलायन्स इंडस्ट्री | INE002A01018 |
23 | 500112 | State Bank of India | एस बी आय | INE062A01020 |
24 | 524715 | Sun Pharmaceutical Industries Ltd | सन फार्मा | INE044A01036 |
25 | 532540 | Tata Consultancy Services Ltd | टीसीएस | INE467B01029 |
26 | 500470 | Tata Steel Ltd | टाटा स्टील | INE081A01012 |
27 | 532755 | Tech Mahindra Ltd | टेक महिंद्रा | INE669C01036 |
28 | 500114 | Titan Co Ltd | टायटन | INE280A01028 |
29 | 532538 | UltraTech Cement Ltd | अल्ट्राटेक सिमेंट | INE481G01011 |
30 | 507685 | Wipro Ltd | INE075A01022 |
सेंसेक्सचे कोणकोणते उपयोग असतात? सेसेंक्सचे पुढीलप्रमाणे अनेक फायदे होत असतात.
- सेंसेक्सद्वारे आपण एका नजरेत बीएस ई म्हणजे बाँब्बे स्टाँक एक्सचेंज आणि त्यात समाविष्ट कंपन्या कशा पदधतीने कार्य करीत आहे,त्यांच्यात कोणती कंपनी नफ्यात चालली आहे कोणती कंपनी तोटयात चालली आहे हे जाणुन घेऊ शकतो.
- शेअर बाजारात तेजी चालु आहे का मंदी याविषयी आपल्याला माहीती प्राप्त होत असते.
- देशाची अर्थव्यवस्था कशापदधतीने कार्य करीत आहे हे कळत असते.
सेंसेक्सच्या कँल्क्युलेशनमध्ये फक्त भारतातील तीस प्रमुख कंपन्यांचाच समावेश का केला जातो?
- सेंसेक्सच्या कँलक्युलेशनमध्ये भारतातील तीस प्रमुख कंपन्यांचाच समावेश केला जात असतो कारण भारतातील ह्या तीस प्रमुख कंपन्याच्या शेअर्सची शेअर बाजारात खरेदी विक्री अधिक प्रमाणात होत असते.
- ह्या तीसही कंपन्यांचा भारतातील सगळयात मोठया कंपनींमध्ये समावेश केला जातो.
- या तीसही कंपन्यांचे मार्केट कँप खुप अधिक प्रमाणात आहे.
- ह्या तीसही कंपन्या आपापल्या क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्या आहेत.
सेंसेक्समध्ये समाविष्ट होत असलेल्या तीस कंपन्यांची निवड कोण करते?
- सेंसेक्समध्ये समाविष्ट असलेल्या तीस प्रमुख कंपन्याची बाँम्बे स्टाँक एक्सचेंज कमिटीद्वारे केली जाते.या कमिटीत सरकार,बँक,अर्थतज्ञांचा देखील समावेश असतो.
बाँम्बे स्टाँक एक्सचेंज कमिटी तीस कंपन्यांची निवड कोणत्या आधारावर करत असते?
- बाँम्बे स्टाँक एक्सचेंज कमिटी अशा कंपनीची निवड करते ज्या कंपनीचे शेअर्स बाँम्बे स्टाँक एक्सचेंजवर किमान एक किंवा एकापेक्षा अधिक वेळेस लिस्टेड असतील.
- ज्या कंपनीचे शेअर मागील वर्षात रोज खरेदी तसेच विक्री केले गेले असेल अशाच कंपनीची निवड बीएसई कमिटी करत असते.
- ज्या कंपन्या दैनंदिन सरासरी व्यापार व्यवसायाच्या संख्येनुसार तसेच मुल्यानुसार पहिल्या दीडशे कंपनींमध्ये समाविष्ट असतील अशाच कंपनींची निवड बीएस ई कमिटी द्वारे केली जात असते
- ज्या तीस कंपन्या 13 विविध उद्योग क्षेत्रातील आहेत अशाच कंपन्याची निवड बीएस ई कमिटी द्वारे केली जात असते.
सेंसेक्सचे कँलक्युलेशन कसे केले जाते?
सेंसेक्समध्ये ज्या तीस कंपन्या समाविष्ट असतात त्यांच्या बाजार भांडवलाची आधी मोजणी केली जात असते.
- यासाठी कंपनीने जे शेअर्स इशू केले आहेत त्या शेअर्सच्या संख्येला शेअर्सच्या दराने गुणायचे असते.मग यातुन जो आकडा आपल्याला मिळत असतो त्याला बाजार भांडवल असे म्हटले जाते.
- मग यानंतर त्या सर्व कंपन्यांचा फ्री फ्लोट स्ट्रक्चर काढला जात असतो.म्हणजे कंपनीने जे शेअर इशु केले आहेत आणि जे बाजारात ट्रेंडिंग करण्यासाठी उपलब्ध असतात त्यांची टक्केवारी काढली जाते.
- सेंसेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सर्व तीस प्रमुख कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कँपिटलाईझेशन जोडुन झाल्यावर त्याला बेस व्हँल्युने भागायचे असते म्हणजेच त्यांचा भागाकार करायचा असतो आणि बेस इंडेक्स व्हँल्युने गुणावे देखील लागते.म्हणजेच त्याचा गुणाकार देखील करायचा असतो.
- सेंसेक्समध्ये शंभरची बेस इंडेक्स व्हँल्युह वापरली जात असते.
Comments are closed.