एक गँस सिलेंडर जास्तीत जास्त दिवस वापरण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स tips for saving cooking gas in Marathi

एक गँस सिलेंडर जास्तीत जास्त दिवस वापरण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स tips for saving cooking gas in Marathi

खुप घरगृहिंनींची महिलांची अशी तक्रार असते की आमचा गँस सिलेंडर घेतल्यानंतर जास्त दिवस टिकत नाही तो लवकर संपुन जातो.

अणि त्यातच गँस सिलेंडर दिवसेंदिवस खुप महाग देखील होत आहे.अशा परिस्थितीत आपण काय करावे हा प्रश्न आपणा सर्वाना खासकरून घरगृहिणींना पडलेला असतो.

म्हणुन आजच्या लेखात आपल्या ह्या अडचणीवर समस्येवर आम्ही काही उपाय सांगणार आहोत.

जे आपण केले तर नक्कीच आपला गँस सिलेंडर देखील जास्तीत जास्त दिवस टिकेल.तो लवकर संपणार नाही.

गँस सिलेंडर लवकर संपु नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी?

घरातील गँस सिलेंडर लवकर संपु नये यासाठी आपण पुढील काळजी घ्यायला हवी-

1)नवीन गँस सिलेंडर घेताना आधी त्याचे वजन चेक करा

जेव्हा आपण नवीन गँस सिलेंडर घेतो तेव्हा सर्वप्रथम आपण त्या गँस सिलेंडरचे वजन करून पाहायला हवे.वजन बरोबर नसेल तर तो गँस सिलेंडर रिटर्न करून त्याजागी दुसरा पुर्णपणे भरलेला गँस सिलेंडर घ्यायचा.
याने तो गँस सिलेंडर आपणास जास्त दिवस टिकतो.

खुप जणांचा गँस सिलेंडर लवकर संपण्याचे हेच एक कारण असते की ते गँस सिलेंडर घेत असताना त्याचे वजन नीट चेक करत नाही तो पुर्णपणे भरलेला आहे की नाही हे बघत नाही.

2) ज्या दिवशी नवीन गँस सिलेंडर जोडला तो दिवस कँलेंडरमध्ये टिपुन ठेवा –

ज्या दिवशी आपण नवीन गँस सिलेंडर विकत घेतला अणि जोडला त्या दिवसाची तारीख टिपुन ठेवावी किंवा आपल्या घरातील कँलेडरमध्ये त्या तारखेची नोंद करून ठेवावी.

याने आपणास हे लक्षात येण्यास मदत होईल की आपला गँस सिलेंडर नेमकी किती दिवसात संपतो आहे?एकुण किती दिवस पुरतो आहे?

समजा आपला गँस सिलेंडर लवकर संपत असेल तर लगेच आपल्या निदर्शनास येऊन जाईल.

See also  अग्नीवीर लेखी परीक्षेसाठी जाताना उमेदवारांना कोणकोणते महत्वाचे कागदपत्र लागणार आहे? । Documents required for Agniveer Recruitment Written exam in Marathi

3) गँसचे बर्नर अधुन मधुन स्वच्छ करत राहा –

आपण आपल्या गँसचे बर्नर सुदधा अधुनमधुन स्वच्छ करत राहायला हवे.याने गँस योग्य प्रमाणात वापरला जात असतो.

गँस बर्नरमध्ये जर काही घाण अडकली असेल तर गँसची फ्लेम निळी न येता पिवळी येत असते.अशा वेळी आपण समजुन जावे की बर्नरमध्ये काहीतरी घाण कचरा अडकला आहे.

अशा वेळी आपण गँसचा बर्नर स्वच्छपणे धुवून घ्यायला हवे.यासाठी तो गँसचा बर्नर गरम पाण्यात गरम ठेवायचा त्यातुन थोडासा लिंबाचा रस पिळुन घ्यायचा.

मग त्यात इनोची एक पुर्ण पाऊच ओतायची.दोन तास ते असच राहु द्यायचे.

मग दोन तीन तासानंतर एखाद्या लिक्विड सोपने तसेच ब्रशने हा बर्नर घासुन पाण्यात धूवून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा.

खुप वेळेस दुध ओतु गेल्याने किंवा अन्न सांडल्याने बर्नरचे छिद्र बुजले जात असते.ज्याने पुरेसा गँस पेटत नसतो.बर्नरची ज्योत ही मंद आचेवर असते.याने अन्नपदार्थ शिजायला खुप वेळ लागत असतो अणि गँस देखील अधिक वाया जात असतो.

4) स्वयंपाक करत असताना गँस सतत कमी जास्त करणे टाळावे –

स्वयंपाक करत असताना गँस जर आपण सतत कमी जास्त केला तर आपला बराच गँस वाया जात असतो.

म्हणुनच आपण स्वयंपाक करताना सर्व स्वयंपाकाची पुर्वतयारी भाजी चिरणे,लसुन सोलणे भाजीत टाकायला लागणारा मसाला मीठाची बरणी आधीच वर काढुन ठेवायचे,तेलाची कँन वर काढुन ठेवायची,इत्यादी सर्व तयारी आधीच करून घ्यायला हवी.

याने फोडणी देत असताना आपणास गँस कमी जास्त करावा लागत नसतो.

5) गँसच्या नळीत कुठेही लिकेज असल्यास त्वरीत दुरूस्त करून घेणे –

समजा आपल्या गँसच्या नळीत कुठे लिकेज होत असेल तर त्वरीत आपण तो लिकेज दुरूस्त करायला हवा.याने लिकेजमुळे आपला गँस वाया जात नही अणि लिकेजमुळे उदभवणारा कुठलाही जीवाचा धोका सुदधा उदभवणार नाही.

See also  गणेश चतुर्थीसाठी घरगुती डेकोरेशन आयडीया Ganesh chaturthi decoration idea at home

रेग्युलेटर तसेच गँसची नळी नेहमी वेळोवेळी बदलायला हवी.गँसचा वापर करून झाल्यानंतर गँसचे रेग्युलेटर व्यवस्थित काळजीपुर्वक नीट बंद करावे. रेग्युलेटर नेहमी चेक करत राहावे.कारण रेग्युलेटर खराब असल्याने देखील गँस गळतो अणि वाया जात असतो.

6) स्वयंपाक करायला स्वच्छ भांडी वापरणे –

स्वयंपाक करताना आपण नेहमी स्वच्छ भांडयाचा वापर करायला हवा कारण भांडे जर तेलगट वगैरे असेल तर ते लवकर तापत नाही याने इंधन अधिक वाया जात असते.पण याचठिकाणी भांडे स्वच्छ असेल तर भांडे लवकर तापते अणि अन्न शिजायला जास्त वेळ पण लागत नसतो.

7) उघडे तोंड असलेले भांडे वापरू नये –

जर आपण अन्न शिजायला उघडे तोंड असलेले भांडे न वापरता अन्न झाकुन ठेवले तर अन्नपदार्थ वाफेच्या मदतीने लवकरात लवकर शिजत असतात.

पण जर भांडे उघडे ठेवले तर अन्न शिजायला खुप वेळ लागतो अणि आपला गँस पण अधिक वाया जात असतो.

स्वयंपाक करताना गँस वाया न जाण्यासाठी टिप्स –

● कुठलीही भाजी शिजवायच्या किमान एक तास अगोदर ती फ्रिजमधुन बाहेर काढुन ठेवायची याने भाजी लवकर शिजण्यास मदत होत असते.कारण फ्रिजमधील थंड पदार्थ लगेच शिजवायला टाकले तर ते गरम होण्यास अधिक वेळ लागत असतो.याने आपला गँस पण खूप वाया जातो.

● स्वयंपाक करताना अधिकतम प्रमाणात आपण कुकर वापरायला हवा याने दाळ तसेच भात भाजी लवकर शिजत असतात.याने आपल्या गँस सिलेंडरची बरीच बचत होत असते.

● दाळ अणि तांदुळ शिजवायला टाकायाच्या आधी कमीत कमी ते अर्धातासा साठी भिजत ठेवावे याने ते लवकर शिजत असतात.

● स्वयंपाक करत असताना जेवढी भाजी असेल तेवढेच भांडे वापरायचे कमी भाजी असल्यास छोटे भांडे वापरावे याने आपला गँस वाया जात नाही.कारण गँसचा धग सर्व भांडयाचा तळ व्यापत असतो याने गँसची उष्णता पुर्णता वापरली गेल्याने गँस वाया जात नसतो.

See also  आई.पी रेटिंग काय आहे -स्मार्टफोन वाटरप्रूफ आहे का ? Ingress Protection Rating Marathi

● भांडे छोठे असेल अणि गँस मोठया प्रमाणात असल्यास भांडे करपण्याची शक्यता असते.अणि अन्न पदार्थ कमी अणि भांडे खुप मोठे असले तरी त्याची आच सर्व भांडयांत पोहचत नसते.याने गँस अधिक वाया जात असतो.

●घरातील सर्व सदस्यांकरता एकाच वेळी स्वयंपाक करण्यावर भर द्यावा. योग्य नियोजन केल्यास वारंवार स्वयंपाक करण्याचं टाळता येऊन गॅस चा अपव्यय टाळता येईल व वेळचा ही बचत होते

● प़्रत्येकासाठी सेपरेट चहा करण्यात अधिक गँस वाया जात असतो.त्यापेक्षा एकाच वेळी सर्वाचा चहा करावा याने वेळ अणि आपला गँस दोघांची बचत होत असते.

सीएनजी म्हणजे काय ? CNG full form in Marathi